मी आणि माझा मित्र घरी चाललो होतो. पण नेहमीचा रस्ता खूपच खराब होता. त्यामुळे माझ्या मित्राने पर्यायी रस्त्याने जाण्यासाठी गाडी वळवली. तेवढ्यात मी म्हटलं
"अरे नेहमीच्या रस्त्याने जाऊया" मी
तर त्याने सांगितलं की, "तो रस्ता खूप खराब आहे"
मग मी म्हटलं की, "तो रस्ता केलाय...(मध्ये पॉज घेतला) थोडा बाकी आहे अजुन.
मित्राने माझ्या शब्दवर विश्वास ठेवत नेहमीच्या रस्त्याने गाडी घेतली. थोड्याच वेळात खराब झालेल्या रस्त्याचा भाग समोर आला.
माझ्या मित्राने माझ्याकडे बघितलं, "कुठे केलाय रे रस्ता?"
मग मी म्हटलं, "अरे तुला बोललो ना रस्ता केलाय थोडा, बाकी आहे अजून."
त्याने फक्त माझ्याकडे एक लुक टाकला, नक्कीच मला शब्दांच्या लाखोल्या भेटल्या असतील आणि आम्ही त्या सुंदर अशा रस्त्याने नाचत नाचत घरी गेलो.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा