तो प्रश्न

people need to understand

                 मेघना आणि परागचा लग्न होऊन तसे आता 4 वर्ष होत आले होते. सगळा काही सुरळीत चालू होत. दोघांचा संसार हवा तसा नवीन गोष्टी शिकत धडपडत चालू होता.

                नवीन नवीन लग्न झाले, नवीन गाव, नवीन वातावरण यात मेघनाला जुळवून घायला फार त्रास झाला, तिची तब्येत खराब राहू लागली. समुद्रकिनारांचा भागमुळे दमट वातावरण सतत उलट्या काही नाही काही चालू असायचा.

                    अशाच एका दिवशी तिचा आयुष्यात सुरावत झाली “त्याप्रश्नांची" तेही तीच्या जवळच्या लोकांपासून बिमार असल्यामुळे “ काय ग आहे का काही ? " सुरवातीला खरंच तिला कळतं न्वहत पण हळू हळू त्या प्रश्नाचा त्रास काय हे जाणवत होता. अशानी संबंध खराब झाले ते झालेच.


                 अशातच परागच्या चुलत भावाचे लग्न आले, म्हणून ते दोघं गावी गेले. मेघनाची अशी पहिलीच पूर्ण सासरच्या परिवारा सोबत भेट झाली होती. लग्नाचा दिवशी दोघं छान तयार होऊन लग्नाला गेले सगळं छान चालू होत आणि अचानक कोणी तरी काकूंनी मेघनाला बोलता बोलता विचारल "काय ग तू कधी लावते नंबर " क्षणभर तिला काहीच समजला नाही काय बोलावे. सकाळ पासून खुश, हसत, आनंदी असलेली मेघना एकदम काय बोलू काय नको म्हणून फक्त हसून बाजूला झाली.

                      खरंतर तिच्या मनात काय वादळ उठला असेल तिलाच माहीत आणि मनातून राग येत असून अशा बायकांना काय बोलावे कोणत्या भाषेत समजून सांगावे कठीण होऊन जाते पण त्या एक प्रश्नात ती तर दुखी झाली ना, तिला तर त्रास झाला ना हा विचार कोणी कधी हा प्रश्न विचारायचा आधी का करत नाही, आणि किती सहज विचारतात बायका “ हा प्रश्न " पण तिचे लग्न होऊन इतके वर्ष झाले तरी तिला कोणाला कधी अस विचारावे वाटले नाही…..


                खरच किती सहज विचारला जातो हा प्रश्न बिनदिककतपणे जस की आपण काय बोलतोय काहीच नाही जणू लग्न झालेले पोरीला हा प्रश्न विचारणे बायकांचा हक्क आहे


“ काय ग तू कधी देते good news "
“ तू पण लाव बाई आता लवकर नंबर"
“ आता तू काय म्हातारी झाली की नंबर लावते का "
“ आता परत आलो की घरात पाळणा हळू द्या "

                 तुम्ही एखद्या समारंभात गेला तर हाच प्रश्न किती लोक किती प्रकारे विचारतील याचा विचार सोडाच. आपण परत येताना विचार करतो काय गरज होती तुला जायची. तसाच मेघना आणि पराग २ वर्ष पासून या सुखद क्षणची वाट पाहत होते. सगळे नॉर्मल असून दवाखाना करून सगळा असताना पण काही जमत नव्हते मग डॉक्टरनी औषधमध्ये बदल केले सुरवातीला सगळा चांगला चालले होते. सगळा नॉर्मल पण रिझल्ट काहीच नाही अशातच या सगळ्या गोष्टींमध्ये २ वर्ष होत आले, मग मेघनाची चिडचिड वाढली हळू हळू दर महिन्याला जाऊन टेस्ट करणे, वाट पाहणे या मुळे दोघ शांत राहायचा कितीही प्रयत्न करायचे पण भांडण वाढत होते. त्यात समाज, नातेवाईक सगळे विचारून मानसिक अत्याचार करत होत.

               कधी दोघांचे भांडण, काही कारण नसताना पण चिडचिड एकदा मेघना नियमित डॉक्टरची भेट होती त्या दिवशी काही कारणं मुळे मेघना घरातल्या लोकांना समोर परागवर ओरडली. त्यावेळी पासून तिने विचार करायला सूर्वात केली आपण काय करतोय, आणि इतका प्रेम करणार नवरा त्याचावर असा आवाज चढवला काही दिवस दोघात एक शांतता होती पण या सगळ्यात त्या दोघांनी एक निर्णय घेतला आता सगळा बंद करायचा आणि नॉर्मल राहायचं, या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा होतील म्हणून काय आपण दोघांनी रोज अस मरायचा का ? मग त्या दिवसापासनच हळू हळू त्यांनी एकमेकांचा साथीनी या मानसिक ताणातून थोडा का होईना मोकळा श्वास घेतला. आज पण लोक विचारतात पराग शांत पणे बोलतो पण मेघनची काही प्रमाणात चिडचिड होतेच….


             खरच हा प्रश्न विचारणे इतका गरजेचं आहे का ? त्यामुळे पुढचा मानसिकरीत्या दुखावला जात आहे हे पण भान राहत नाही लोकांना आणि यात बायका सगळयात पुढे असतात पण आज काल पुरुष मंडळी पण विचारतात …

                खरंतर का म्हणून अस विचारलं जातं हेच कळतं नाही. घेतीलना ते दोघ त्यांचा आयुष्याचा निर्णय काय करायचं ते, आता बोलाल की काही गोष्टी वेळेत झाल्या हव्या मला सांगा कोणी ठरवली आहे ही वेळ ?

         मी इथे फक्त माझे मत मांडत आहे सगळेच याविषय असं विचार करत असतील असे नाही. मला कोणाच्या भावनाना हनी पोहोचवायची नाही.
कसा वाटला हा लेख नक्की सांगा..आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्याआणि कोण कोण या प्रश्न मधून गेलंय हे सांगायला विसरू नका..धन्यवाद??