त्या आठवणी भाग -२

The First Day Of vivan In College


        विवानला घरी येऊन 10 दिवस झालेले होते. कॉलेज तिकडे चालूच होती. पण कॉलेज दुसऱ्या शहरात असल्याने त्याला दररोज ये जा करणं जमणार नव्हतं. म्हणून तो रूम घेऊनच तिकडे जाणार होता. तिथे जाण्याआधी राहण्यासाठी रूम बघणे गरजेचं होतं. म्हणून तो उमेश आणि जयदीप यांच्याशी सतत कॉन्टॅक्ट मध्ये होता. कारण तेच होते , जे त्याच्यासोबत रूममध्ये राहणार होते आणि ते  कॉलेज जवळ सहज पोहचू शकत होते. कारण ते कोल्हापूरचे राहणारे होते आणि एका तासात ते कॉलेजमध्ये येऊ शकत होते.

      अखेर रूम शोधण्यात आला . विवनाला आता जायची तयारी करावी लागणार होती . संध्याकाळी तो बॅग पॅक करू लागला . तसेच तिच्या आईच सूचनाही चालू होत्या . नीट राहा , नीट जेवत जा , गेल्यावर फोन कर , रोज फोन करत जा वैगरे सूचना त्याची आई देत होती . सगळी तयारी झाली होती . शेवटी तो उमेशला कॉन्टॅक्ट केला.

उमेश -" हॅलो ."

विवान -" हॅलो..मी विवना बोलतोय."

उमेश -" हा बोल की."

विवान -" मी उद्या सांगलीला येणार आहे. तू असतोस ना तिथे ?"

उमेश -" अरे मी उशिरा येणार आहे . तिथे गेल्यावर तू  अक्षयला भेट."

विवान -" अक्षय कोण?"

उमेश -" अरे अक्षय जाधव नाव आहे त्याचा.. तो पण रूममध्ये राहणार आहे आणि तोही आपल्या वर्गात आहे . मी तुला त्याच नंबर देतो गेल्यावर तू कॉन्टॅक्ट कर . तो घेऊन जाईल तुला रूमवर .."

विवान -" अच्छा ठीक आहे .. मी उद्या येईन इथे .."

उमेश -" चालताय कि.. ठेवतो बघ.."

विवान -" हा चालेल ."

       उद्या पहाटे ४ वाजता त्याची बस होती . रात्री तो लवकर झोपला . उद्या लवकर उठून तो अंघोळ वैगरे आटपला आणि जाण्यास तयार झाला . जाताना तो आईबाबांचे पाया पडायला विसरला नाही. अखेर तो घर सोडला आणि बस स्टँडसाठी निघाला .

      स्टँडला पोहचून तो बस पकडला. बस अगदी मोकली होती. लवकर उठल्या कारणाने त्याला झोप लागलेली होती , म्हणून तो खिडकीच्या सीटवर झोपी गेला. जेंव्हा त्याचे डोळे उघडल, तेंव्हा सकाळचे ७ वाजत आलेले होते . खिडकीच्या बाहेर पाहिला, आजूबाजूला हिरवळ पसरलेली होती. कानात हेडफोन घालून तो बाहेरचा नजारा पाहत होता . कानात वाजणारे गाणे आणि बाहेरची नजरे बघून तो अगदी फ्रेश झाला . थोड्यावेळात ती बस मिरज आणि सांगलीच्या हायवेवर पोहचली. तो विश्रामबागला उतरला. तिथे उतरताच तो रूमच्या मालकांना फोन केला . त्यांनी रूमची लोकेशन सांगितले. तो त्या दिशेने जाऊ लागला. कॉलेजच्या मागे एक रेल्वे स्टेशन होती. रूम मागच्या दिशेनी होती खरी , पण त्यासाठी रेल्वेरुळ पार कराव लागणार होत.

     एवढयात पाऊस सुरू झाला. त्यातल्या त्यात विवान चालत रूम शोधत होता. बॅग घेऊन तो रूळ पार केला.पण रूम शोधायची कशी? हा प्रश्न त्याला सतावत होती. तो एका ठिकाणी थांबून अक्षयला  कॉन्टॅक्ट केला. तेंव्हा त्याला कळाल की तेंव्हा त्याला कळाल की तो ज्या ठिकाणी आहे , त्या ठिकाणाहून रूम खूप दूर होती. अक्षय त्याला दिशा सांगू लागला. त्याच्या सांगणाऱ्या रस्त्यावरून विवान जाऊ लागला. पुढे गेल्यावर त्याला अक्षय भेटला. उंचीने मोठा , चष्मा घातलेला , खांद्यावर बॅग घातलेला , बहुतेक कॉलेज मधून आलेला असावा. भेटताच ओळख पटली. रूमकडे जाताना विवान चौकशी करत होता.

विवान -" तू कुठून आलास?"

अक्षय -" कॉलेजमधून ."

विवान-" कॉलेजमधून इकडे येण्यासाठी रस्ता आहे?

अक्षय -" हो आहे की.. तू उगाच लांबून आलास."

विवान -" मला हा रस्ता माहितीच नव्हता."

    असेच गप्पा मारत ते त्या घरी आले . जिथे त्यांची रूम होती. ते एक घरच होत. रूम पहिल्या मजल्यावर होती. वर चढून हे दोघे गेले. वर दोन रूम होते आणि दोन्ही रूमला आतून जोडणारी एक दारही होती. रूमजवळ सगळी व्यवस्था होती. रूम तशी मोठी होती आणि हवेशीर होती . फक्त एक समस्या होत की रूम कॉलेजपासून लांब होती. त्यामुळे चालण्याचा त्रास होता. रूममध्ये एक कपाट होती , ज्यात प्रत्येकाची कप्पे फिक्स होती. विवान आपली बॅग तिथे ठेवला आणि फ्रेश झाला . थोड्यावेळात कॉलेजची वेळ सुद्धा होणार होती. म्हणून हे दोघे कॉलेजला निघाले. कॉलेजला पोहचायला कमीतकमी 15 मिनिटे लागली. वर्गात पोहचताच तो एका बाकावर बसला . सगळीकडे नजर फिरवला तर तिथे फक्त 8 ते 9 मुले होते आणि बाकीचे 34 मुली होत्या. विवानच्या तोंडून निघाल.

विवान -" एवढ्या मुली ?"

अक्षय -" होय."

थोडा वेळ असेच गप्पा मारण्यात गेल. तेवढयात लेक्चर घेण्यासाठी सर वर्गात आले. हे सर होते डॉ नाईक सर .. जे गणित विभागाचे प्रमुख होते . येताच ते हजेरी नोंदवण्याचे कागद सही करण्यासाठी दिले आणि लेक्चर सुरू झाल. इतक्या दिवसानंतर लेक्चरला बसला असल्याकारणाने विवनाला थोडासाच भाग समजत होता . बघता बघता लेक्चर संपण्याची वेळ आलेली होती. सर ती हजेरी नोंदवण्याचे कागद घेतले आणि बघू लागले .

सर -" विवान कोण आहे?"

स्वतःच नाव आल्याचा पाहताच तो उभा राहिला.

विवान -" सर मी आहे.."

सर -" इतके दिवस कुठे होतास ?"

विवान -" सर ते ट्रान्सफर सर्टिफिकेट काढण्यात आणि रूम पाहण्यात वेळ गेला."

सर -" 12 दिवस जातात काय याला ?"

याला विवानकडे उत्तर नव्हतं . म्हणून तो शांतच उभा राहिला.

सर -" मीही सर्टिफिकेट काढलाय . येडे समजतात का काय?"

विवान -" नाही सर.."

सर -" मग ?... या कॉलेजमध्ये हजर असणे गरजेचे आहे . नाहीतर परीक्षेला बसता येणार नाही."

विवान खाली मान घालून उभा होता.

सर -" बसा.."

असे म्हणत सर वर्गाच्या बाहेर गेले. या वर्गात सरांचा ओरडा खाणारा विवान पहिला ठरला होता. खाली बसताच त्याची नजर एक मुलीच्या नजरेला भिडली. काही सेकंद त्या दोघांचे नजर अशीच भिडून होती. त्यानंतर त्यांची भिडलेली नजर अचानक तुटली. तिला बघून विवानला काहीतरी आठवत होत .

*******************************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

हा भाग कसा वाटला नक्की कळवा .. पुढील भाग लवकरच येईल.. धन्यवाद