त्या आठवणी भाग -1

First day of college of vivan . A day of admission.

प्रस्तावना - हि कथामालिका सत्य घटनेवर आधारित आहे . यातले काही पात्रांचे नाव खरे आहेत आणि काही पात्रांचे नाव काल्पनिक आहेत . नाव काल्पनिक असले तरी ते पात्र खरे आहेत . खरे नाव असलेले पात्रांचे नाव उप्योगण्याकरिता त्यांची परवानगीही घेतली आहे . धन्यवाद ...

-------------------------------------------------------------       पावसाळ्याचे दिवस होते . ओल्या रस्त्यावरून लालपरी वेगाने धावत होती. आजूबाजूला हिरवळ थोडी जास्त वाटत होती . नुकताच पाऊस पडून गेला असावा . विवान मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत होता . मॅपमध्ये  पुढची वळण आणि रस्ता बघत होता . बाजूला त्याचे बाबाही बसले होते . ग्रॅजुएशन संपल्यावर विवान पुढील शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला होता . अनोळखी शहरात विवान कसा राहील ? तिथला कॉलेज कसा  असेल ? तिथली वातावरण कसा असेल ? हे पाहण्यासाठी विवानचे बाबा आले होते . 


       काही मिनिटानंतर ती बस सांगलीमध्ये आली होती . मॅप बघत विवान आणि त्याचे बाबा कॉलेजजवळ जाऊ लागले. सांगली -मिरज हायवे वरच ती कॉलेज होती . शेवटी ते त्या कॉलेजच्या गेटसमोर आले होते . त्या गेटच्या वर मोठ्या अक्षरात कॉलेजचं नाव लिहिलेल होत . ' विल्लिंगडन कॉलेज ...


       आत मध्ये गेल्यावर मुख्य  इमारतीकडे जाण्यासाठी मोठा रास्ता जात होता . त्या रस्त्यावरून जात असताना काही पाट्या रस्त्याच्या बाजूला लावलेले होते . पहिला ' मुलांचं हॉस्टेल ' अशी बोर्ड होती . त्या दिशेनी पाहिलं तर एक पडीक वाड्यासारखं हॉस्टेल होत . तिथे कोण राहतंय का नाही ? असा प्रश्न विवानच्या मनात येऊन गेलं . थोडं पुढ गेल्यावर ' मुलींचं हॉस्टेल ' अशी बोर्ड होती . त्या बोर्डच्या दिशेनी पाहिलं तर नवीन केलेली इमारत होती . सगळी व्यवस्था तिथे असल्याचं जाणीव होत होती . विवानच्या मनात अजून एक प्रश्न आलं कि मुलांचं हॉस्टेल एकदम पडीक असलेली आणि मुलींचं हॉस्टेल अशी का ?


        तसेच त्या रस्त्यावरून पुढे मुख्य इमारतीकडे पोहचले . तिथे एक बोर्ड लावलेली होती . ' गणिताच्या ऍडमिशनसाठी या दिशेनी जावे .' ती बोर्ड वाचून विवान आणि त्याचे बाबा त्या दिशेनी जाऊ लागले . आजूबाजूचं वातावरण अगदी प्रसन्न वाटत होत . झाडाखाली काही मुलंमुली बसलेली होती  . गप्पा मारणे , सोबत आणलेले टिफिन खाणे असे वेगवेगळे काम ते करत होते . गणिताचं विभाग अगदी वेगळी होती . म्हणजे हि एकमेव विभाग होती , ज्याला वेगळी अशी जागा होती . ती एक कौलारू घरासारखं होत . ज्याला दोन क्लास रूम होती , एक स्टाफरूम होती आणि एक कोरिडोर सारखी रूम होती . विवानला हि डिपार्टमेंट चांगली वाटली . एका क्लास रूममध्ये लेक्चर चालू होत. विभागामध्ये ऍडमिशन बाबतीत विचारलं असता कळाल कि जेवणाचं वेळानंतर प्रक्रिया चालू होईल . 


      तशीही दुपार होत आली होती . सकाळपासून प्रवासात असल्याने काहीही खाल्या नसल्याने कँटीनला जाण्याचं ठरलं. कँटीन तस बरा होता . वर्दळ जास्त नव्हती . काही जण चहा पित होते , तर काहीजण नाष्टाच आस्वाद घेत होते . विवान हि असेच काही नाश्त्यासाठी घेतला . विवान आणि त्याचे बाबा तिथेच बसले आणि नाश्ता करू लागले .


बाबा -" इथे रमेल तुला ?"


विवान -" रमेल कि ... "


बाबा -" बघ .. नाहीतर सोलापूर विद्यापीठाला ऍडमिशन घ्यायचं ?"


     विवान ओळखून होता . बाबांना त्याची काळजी वाटत होती . पहिल्यांदा तो घर सोडून बाहेर राहणार होता , त्यामुळे त्याच्या बाबांना काळजी वाटत होती . 


विवान -" नाही ... रमेल इथे ."


      नाश्ता करून झाल्यावर परत गणिताच्या विभागाकडे गेले . तिथले पिउन ऍडमिशनसाठी फॉर्म दिले . विवान कॉरिडॉर मध्ये बसून तिथल्या एका बेंचवर बसला आणि फॉर्म भरू लागला . त्याचे बाबा जवळच बसले होते . फॉर्म भरून झेरॉक्स चे जुळवाजुळव तो करत होता . सगळ काही झाल्यावर तेच फॉर्म ऑनलाईनही भरायची होती म्हणून कॅफेकडे जावं लागणार होत . विभागाच्या बाहेर आल्यावर तिथेही काही जण उभे होते आणि विभागाच्या बाहेर पडल्यास मैदान लागत होती. तिथे काहीजण उभे होते . विवान आणि त्याचे बाबा तिकडे गेले. तिकडे दोघे विवानच्या वयाचे होते आणि त्यांचे बाबा ही तिथे उभे होते , असे प्रथम दर्शनी लक्षात येत होतं . 

विवानचे बाबा - " तुम्हीही ऍडमिशन साठी आलाय काय ?" 

ती व्यक्ती -" हो .. पण आम्हाला इथे घ्यायचं नाहीये ."

विवानचे बाबा -" का ?"

ती व्यक्ती -" हा कॉलेज नको वाटलय पोराला .."

विवानचे बाबा -" अच्छा ."

विवान -" मला झेरॉक्स काढायचं आहेत . तुम्ही ओफिस मध्ये बसा ."

बाबा -" बर चल ."

       दोघेही ऑफिसमध्ये गेले . विवान झेरॉक्स काढण्यासाठी बाहेर पडला . झेरॉक्स काढण्यासाठी त्याला हायवे पार करावं लागणार होत . तो तिथे गेला तर तिथे अजून एक जण फॉर्म भरला होता आणि झेरॉक्स काढत होता . विवान तो फॉर्म बघितला तर त्यावर ' उमेश बेनके ' असं नाव होत आणि तोही ऍडमिशन घेण्यासाठी आला होता . वयाने तो थोडा मोठा वाटत होता . विवानला थोडी शंका येत होती कारण तो फॉर्म निळ्या शाईच्या पेननी भरला होता .

विवान -" फॉर्म तर काळी शाईने भरायचं होत ना ?"

उमेश -" चालत ते .."

विवान -" तुम्हीही ऍडमिशन घेण्यासाठी आलात काय ?"

उमेश -" होय .."

      तो परत फॉर्म भरण्यात व्यस्त झाला . विवान त्याच्या कागपत्राचे झेरॉक्स काढला आणि परत कॉलेजमध्ये आला . ऍडमिशनची उर्वरित काम पार पाडला . सर्वात शेवटी तो फी भरण्याच्या ओळीत थांबला . 

       तिथे उमेश आणि तोही होता ज्याला हा कॉलेज नको वाटत होत .

विवान -" बहुतेक आपणच शेवटचे  आहोत ऍडमिशन साठी ?"

उमेश -" होय ... दुसऱ्या फेरीत झालाय ना आपलं ."

विवान -" तुला हा कॉलेज नको का वाटत होता ?"

तो -" अरे बघ कि कॉलेज एका दुष्काळ प्रदेश मध्ये वाटत आहे ."

विवान -" मग आता काय झालं ?"

तो -" आमच्या आधीच्या कॉलेज मध्ये जागा आहे का विचारलं तिथले म्हणाले नाहीयेत ."

विवान -" तुझं नाव ?"

तो -" जयदीप गुरव .. तुझं ?"

विवान -" विवान ..."

जयदीप -" कुठून आलास ?"

विवान -" सोलापूर वरून ."

जयदीप -" इतक्या लांबून आलायस ?"

विवान -" होय ..."

जयदीप -" तिथं पण आहे कि विद्यापीठ .."

विवान - " मला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये करायचं होत . पण नंबर इथं लागलं आणि हे पण ग्रांटेड कॉलेज आहे म्हणलं . मग इथेच घायलोय ."

जयदीप -" हा .."

     सगळी प्रक्रिया पूर्ण केला . विवान , त्याचे बाबा , उमेश आणि जयदीप बाहेर आले . 

विवान -" आता मुलांच्या हॉस्टेल बघावं लागेल ."

बाबा -" हो ..बघूयात .."

      सगळे मुलांच्या होस्टेलकडे निघाले . ती इमारत एक पडीक वाड्यासारखं  वाटत होती . तशीही कॉलेज स्वंतत्रपूर्व काळातील होती . जुने होणे अपेक्षित होतीच . पण हॉस्टेल मात्र खूपच जुनी वाटत होती . इथे कोण राहतंय का नाही हा प्रश्न विवानच्या मनात येत होत . 

विवानचे बाबा हे बघताच म्हणाले 

बाबा -" तू रूमच  घेऊन राहा .."

उमेश -" अहो काका इथेच माझी सैनिकच हॉस्टेल आहे . ते बघुयात ."

      विवानचे बाबा हि सैनिकमध्ये होते आणि आता निवृत्ती घेतले होते  . उमेशचेही बाबा सैनिक मध्ये होते आणि निवृत्ती घेतले होते  . विवानचे बाबा कॉलेजमध्येच थांबले . विवान आणि उमेश गाडीवरून ते हॉस्टेल बघायला निघाले . त्या होस्टेलचीही  तशीच अवस्था होती . अजून कोणी तिथे राहत नव्हते म्हणून तशी अवस्था असेल कदाचित ... हॉस्टेल बघून ते परत आले . तिथेही राहायची परवानगी विवानच्या बाबानी दिली नाही . जयदीप आणि उमेश रूममध्ये राहण्यास होकार दिले . विवान दोघांचे नंबर घेतला . कारण तशीही त्याला रूम बघण्यास मदत हवी होती . रूम तिघांमध्ये घेण्याचा निर्णय झाला . उमेश आणि जयदीप शेवटी निरोप घेऊन निघाले .विवान आणि त्याचे बाबाही निघाले .

        बस मध्ये बसल्यावर विवान पुढचा विचार करत होता . नवीन कॉलेज , नवीन वातावरण , नवीन मित्रमैत्रिणी , नवीन शिक्षण कसा असेल ? हाच विचार करत होता . या कॉलेजमध्ये येण्यासाठी तो खूप उत्सुक होता . 

**********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

हा भाग थोडा हळू वाटत असावा . पण चिंता नकोत . पुढे हि कथामालिका उत्सुकतेची जाणार आहे . हा भाग कसा वाटलं नक्की कळवा . शेअर करा .धन्यवाद ....

🎭 Series Post

View all