त्या आठवणी भाग -6

freshers party ends with clash between senior and junior .

याआधी -

      कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी होणार होती. विवान आणि बाकी सगळे तयार झाले आणि कॉलेजला निघाले . त्यांचे सिनियरच पार्टीची आयोजित केलेले होते . बाकी विवानच्या वर्गातले हळू हळू येत होते . त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली . फ्रेशर्स मुलांच ओळखीचा कार्यक्रम सुरु झाला . विवान ज्या मुलीच नाव शोधू पाहत होता . तीच नाव घेताच ती स्टेजवर आली . विवानची नजर तिलाच पाठलाग करत होती . 

-----------------------------------------------------------

यापुढे -

      ती अगदी सुंदर दिसत होती . तिच्या चेहऱ्यावर स्माईल खूप शोभत होती . स्टेजवर चढत असताना विवानची नजर तिच्यावरून हटतच नव्हती . बँड आणि चॉकलेट घेतल्यावर तिच्या ओठाच्या हालचालींवरही त्याच लक्ष होत . ती ' thank you ' म्हणत होती हे त्याला कळाल. खाली येत असताना सुद्धा त्याच लक्ष तिच्यावर निरखून होती . बघत असताना तो अचानक उभारला . दत्ता त्याच्या बाजूलाच बसला होता .

दत्ता -" काय झालं रे ? उभा का झालास ?"

      त्याच्या त्या प्रश्नाने विवान जागा झाला . ' काही नाही ' म्हणत तो खाली बसला . अखेर त्याला तीच नाव कळाल , यावरच तो समाधानी होता .त्याला पुढचा पाऊल ठेवायच नव्हत .त्याला फक्त नाव हवं होत . तो त्याच्या पुढं जाणारही नव्हता .

       कार्यक्रम असेच पुढे पार पडत होती . प्रत्येकाची ओळख करून घेतानाच वेळ जात होता . त्यातच दुपार होत आलेली होती . जेवणाचं वेळ सुद्धा होत होती .हॉलची परवानगी फक्त जेवणाच्या वेळेपर्यंतच दिली होती . म्हणून दुपारचं जेवण , राहिलेल कार्यक्रम आणि खेळ गणित विभागात घ्यायचं ठरलं होत . तस विभाग मोठं होत . कॉरिडॉरमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली होती . फ्रेशर्स असलेले जेवण्यासाठी जमा झाले . सिनियर असलेले मात्र त्यांना जेवायला वाढत होते . जेवण्यासाठी वर्गातील बाकाचा वापर करू लागले . विवान आणि बाकी जेवण आटपत होते . बाकी सगळ्या प्रोफेसर यांना सुद्धा जेवायला वाढण्यात आल . हळू हळू सगळ्यांचं जेवण आटपलं .

       पुढच्या खेळासाठी वर्गातले बेंचेस आजूबाजूला करण्यात सिनियर व्यस्त झाले . थोड्यावेळात सगळे आपापल्या जागेवर बसले . खेळाचा कार्यक्रम सुरु झाला . सिनियर असलेले मुली समोर येऊन खेळाचे नियम सांगत होते आणि खेळाला सुरुवात करत होते . त्यात दोघांना म्हणजेच सिनियर आणि फ्रेशर्स यांना भाग घेण्याची परवानगी होती . खेळाची सुरुवात झाली . त्यात  भाग घेण्यासाठी मुलांची चढाओढ चालू झाली . लहानमोठ्या खेळ चालू होत्या . तर वर्गाच्या बाहेर कोरे सर जाताना दिसले . 

      कोरे सर म्हणजे मुलांना जस हवं असत तसे प्रोफेसर .. म्हणजे मुलांच्या मनातील ओळखून घेणारे , तितक्याच तळमळीने शिकवणारे आणि विशेष म्हणजे विवान आणि बाकीच्या रूममधील मुलांना ते जवळ होते . कारण कॉलेज सुटल्यावर कोरे सरही चहा पिण्यासाठी त्यांच्यासोबत जात असे . त्यात परत इकडे तिकडेच गप्पा होत असे .

      वर्गाच्या बाहेर कोरे सर दिसल्यावर सिनियर मुलांनी त्यांना खेळामध्ये भाग घेण्यासाठी मानवू लागले . सर नको म्हणत असतानाही मुलांनी  त्यांना ओढत वर्गामध्ये आणले . कोरे सर म्हणाले .

कोरे सर -" मी खेळ नाही खेळत . "

असं म्हणताच वर्गात गोंधळ सुरु झालं . 

कोरे सर -" अरे शांत व्हा . मी खेळ खेळत नाही . पण या नव्या मुलांसाठी गवळण म्हणतो ."

      असे म्हणताच जे मुलं उभे होते . ते आपापल्या जागेवर बसले .सगळ्यांचं लक्ष आता सरांकडे लागून होत . सरांनी गवळण चालू केले तशे सर्वांनी टाळ्या वाजवत साथ देत होते .विवान त्याच्याकडचा मोबाइल काढला आणि त्या क्षणाला टिपू लागला . गवळण संपताच सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवत दाद देत होते . सरांनीही हसत त्याला प्रत्यत्तर देत होते . सरांना बाहेर काम असल्याने ते लगेच वर्गाच्या बाहेर पडले . 

      परत खेळांचा कार्यक्रम सुरु झाला . छोट्या खेळांचे कार्यक्रम सुरु झालं . त्यात छोटे छोटे कृती किंवा कार्य करायचे आणि जे जिंकले त्यांना चॉकलेट म्हणून बक्षीस देण्यात येणार होत . यात सुद्धा दोघांनी म्हणजेच सिनियर आणि फ्रेशर्स भाग घेणार होते . 

      त्याच खेळात एक कृती सांगण्यात आलं कि '100 ते 1 पर्यंत उलटे अंक न थांबता म्हणायच'. अस म्हणताच सिनियर मधील हात वर होत होते . अँकर हि त्यांचेच असल्या कारणाने 

त्यांना संधी देण्यात आली . त्यातलीच एक मुलगी उठली आणि अंक म्हणू लागली . पण म्हणत असताना ती मधेच थांबली . त्यामुळे पुढेच अंक ती म्हणू शकली नाही आणि ती हारली . ती बसताच अँकरनी विचारलं .

अँकर -" अजून कोण अंक म्हणणार आहे का ?"

      कोणीही उत्तर देत नव्हते . विवान मनात न्यूनगंड बाळगून होता , म्हणून तो हात वर करण्यासाठी घाबरत होता .कोणीही हात वर करत नसल्याने ती दुसऱ्या खेळाकडे वळत होती तर विवान हात वर केला . अँकर त्याच्याकडे बघितली आणि म्हणाली .

अँकर -" राहुदेत आता ... कर हात खाली .."

     विवान निराश होऊन हात खाली केला . तेवढ्यात दत्ता उठला आणि म्हणाला .

दत्ता -" का ? हात खाली का करायचं ? हि पार्टी आमची आहे का तुमची ?"

      तो रागाला आला होता . बाकीचे सिनियर बघून चकितच झाले . वातावरण गरम होणार होती . कारण सिनियर मधला एक मुलगा पुढे होऊन वाद घालू लागला . दत्ताही काही कम नव्हता . तोही वाद घालू लागला . शेवटी काही मुलं त्या वादाला मिटवले . विवानला संधी देण्यात आलं .तो अंक म्हणाला आणि त्याला चॉकलेट बक्षीस म्हणून भेटलं .

      असेच काही खेळ झाले . संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते .काही जणांचे बस होती म्हणून ते निघाले . अजून काहीजण थांबले होते . कार्यक्रमाची शेवट करण्यात आलं आणि सगळे घराकडे निघाले . विवान आणि त्याच्यासोबतचे सुद्धा रूमकडे निघाले . रूमकडे जाताना दत्ताची आणि बाकीचे वर्गात झालेलं वादावर चर्चा करत होते .  कोण बरोबर ? कोण चुकीचं ? हे ठरवण्यात आल . गप्पा मारत ते सगळे रूममध्ये  पोहचले . दिवसभर झालेल्या फ्रेशर्स पार्टीमुळे ते थकले होते . 

    फ्रेश झाल्यावर सगळे मोबाइल मधील पार्टीची फोटो पाहत होते . असेच फोटो पाहत आणि गप्पा मारत जेवणाची वेळ झाली . सगळे खाणावळीला जाण्यास तयार झाले . जाताना पाण्याची बाटली घेतले . जेणेकरून येताना पिण्यासाठी  पाणी भरून यावे . 

    खानावळला पोहचल्यावर तिथे सिनियर वर्गात असलेला मुलगा आधीच होता . त्याच नाव सुधीर ... आपापली जागा पकडून आजच्या घटनेबद्दल ते त्याच्यासोबत बोलत होते . तोही मान्य करत होता कि चूक त्यांची होती . एक मुलगा त्याच्यासोबत बसला होता . तो आम्हा सर्वांचं ऐकत होता . सुधीरचा  रूममेट होता . 

     विवान आणि बाकी सगळे आता जेवायला सुरुवात केले . अचानक विवानला एका सिनेमा बद्दल आठवलं , जे नुकताच आलेला होता आणि त्याला हवं होत . अचानक सुधीरच्या बाजूला बसलेला मुलगा म्हणाला .

तो -" माझ्याकडे आहे ."

      विवान लगेचच त्याच्याकडून सिनेमा घेतला आणि ओळख करून घेतला . त्याच नाव अमर सावंत ... तो बी.एस सी प्रथम वर्षात होता . त्याच्याकडे कित्येक नवीन सिनेमे मोबाईल मध्ये शिल्लक होते . तो इंटरनेटवरचा सगळं काही जाणून होता . सडपातळ शरीर , डोळ्यावर चष्मा आणि दिसायला साजूक पण आतून मात्र वेगळाच व्यक्ती होता . म्हणजे जोक वैगरे करत अगदी मजेत होता .

     जेवण आटपून सगळे  अमर आणि सुधीर यांचं निरोप घेऊन रूमकडे निघाले . रात्री परत गप्पा मारत बसले आणि झोपी गेले .

    दुसऱ्या दिवशी नेहमी सारखं तयार होऊन कॉलेजला निघाले . काही लेक्चर संपल्यावर अचानक सिनियर वर्गात प्रवेश केले . आता पुढे काय झालं ? याच विचार विवान करत होता .

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच .... हा भाग उशिरा आला कारण माझी परीक्षा होती आणि त्यात मला लिहायला वेळ भेटत नव्हता . कृपया समझून घ्या ... हा भाग कसा वाटला नक्की सांगा ... शेअर करा ... धन्यवाद 

🎭 Series Post

View all