त्या आठवणी भाग -3

The memory of her help vivan to sleep

      काही सेकंद त्या दोघांचे नजर अशीच भिडून होती. त्यानंतर त्यांची भिडलेली नजर अचानक तुटली. तिला बघून विवानला काहीतरी आठवत होत . 

त्याविषयी जास्त विचार न करता तो बाकीच्या मुलांची ओळख करून घेत होता . 

उमेश -" आलास काय रूममध्ये राहायला ?"

विवान -" हो ... तू कधी येणार राहायला ?"

उमेश -" मला अजून वेळ लागेल ."

विवान -" आणि बाकीचे पण कधी राहायला येणार ?"

       पाच जण जरी रूममध्ये राहण्यासाठी मान्य झाले असले तरी विवान एकटाच तिथे राहण्यासाठी आलेला होता . दुसऱ्या रूममध्ये दोघे आधीच राहत असले तरी ते त्याच्या ओळखीचे नव्हते . 

उमेश -" अक्षय आणि जयदीपला पण वेळ लागेल आणि हा येईल बघ उद्या राहण्यासाठी .."

विवान -" कोण ?"

उमेश -" हा बघ दत्ता पुकळे ... "

      तो पुढच्या दुसऱ्या बाकावर बसला होता , त्यामुळे तो त्याच्यासोबत नंतर बोलण्याचं ठरवलं . बाकीचे लेक्चर होऊन गेले . कॉलेज संपल्याने विवानला मोकळा वेळ भेटला . विवान सर्वांसोबत ओळख करून घेत होता . त्यात त्याला कळाल कि काही मुले बसने ये जा करणारे आहेत आणि उरलेले पाच जण रूममध्ये राहणार होते . दत्ता राहणारा आटपाडीचा ,एम .ससी करण्यासाठी या कॉलेजमध्ये आलेला . तो सुद्धा रूममध्ये राहणार होता . तो उद्या राहण्यासाठी येणार होता . 

      कॉलेज सुटल्यावर सगळे घरी गेले . दत्ता आणि विवान हे दोघेच राहिले होते . दोघे गप्पा मारत कॉलेजच्या बाहेर आले . समोरील हायवे पार करून ते दुसऱ्या बाजूला गेले . दत्ताला बस स्टँडला जायचं होत . तिथूनच त्याला आटपाडीसाठी बस मिळणार होती . रस्त्याच्या दिशेनी ते दोघे जाऊ लागले . थोडं पुढे जाताच त्यांना बस स्टॉप भेटल . तिथे मुलामुलींचे घोळका बस साठी वाट पाहत होते . त्या मुलींमध्ये काही मुली त्यांच्याच वर्गातले होते . विवानच्या लक्षात आल की इथूनच सगळे बस पकडतात , पण बस कधी उशिरा येते किंवा लवकर येते . त्यामुळे तिथे घोळका जमा झालेली होती . 

विवान -" तुला इथूनच बस स्टॅण्डसाठी मिळेल ना ?"

दत्ता -" या बसची वेळ फिक्स नसते . वाट बघत बसलो तर माझी बस चुकेल .."

विवान -" मग ?"

दत्ता -" रिक्षानी जाईन .."

      असेच पुढे जात ते एका बेकरीच्या समोर आले . तेवढ्यात पाऊस सुरु झाला . अचानक पाऊस सुरु झाल्याने ते बेकरीच्या समोर आसरा बघून उभे झाले . पाऊस तशी मोठीच होती . दत्ताला लवकर निघायचं होत . जाण्याच्या आधी दोघेही नंबर एक्सचेंज केले आणि तो निरोप घेऊन रिक्षा साठी पुढे गेला . इकडे विवान एकटाच बेकरीच्या समोर उभा होता . आजची रात्र त्याला एकटीच घालवायची होती . पण त्याच्याआधी त्याला जेवणाचं सुद्धा पाहायचं होत . पाऊसही आता कमी झाल होत . त्यासाठी तो इकडेतिकडे खाणावळच्या शोधात फिरू लागला . 

      खूप ठिकाणी फिरल्यावर त्याला कुठेच खानावळ सापडलं नाही . सकाळपासून तो जास्त काही खाल्ला नव्हता, म्हणून त्याला रात्रीच्या जेवणाचं पाहाव लागत होत. तो जिथे राहत होता , तिथले ठिकाण त्याला माहिती नव्हती . कुणाला विचारावं म्हणलं तर इथले कोण ओळखीचे नव्हते . शेवटी नाईलाज म्हणून एका प्रशस्त हॉटेलमध्ये तो गेला . पहिल्यांदा तो एकटाच मोठ्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता . एक मोठीशी थाळी तो ऑर्डर केला .

       थोड्यावेळाने तो मागवलेल थाळी त्याच्यासमोर आलेली होती . पण त्याच्यात इतके सारे पदार्थ होते कि त्याला शंकाच आली कि तो हि थाळी कशी संपवेल . त्याला अन्न वाया घालवलेल आवडत नव्हतं , म्हणून तो काही भाजी परत घेऊन जाण्यास सांगितला . 

     तो जेवायला सुरुवात केला . तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला . डाव्या हातानी तो मोबाइल काढला . एक मेसेज स्क्रीनवर दिसत होती .

' Call me when you are free .'

       हा मेसेज तिच्या एका मैत्रिणीकडून होता . जेवणाचं थांबून तो स्क्रीनला बघत बसला . कारण नसताना हि अशी मेसेज का केली असणार ? अस विचार करत तो बसला होता . कॉल केल्यावर माहित होईलच अस विचार करून तो परत जेवणावर लक्ष दिला . 

      बिल भरून तो बाहेर आला . रूम हॉटेलपासून दूर होत , पण नाईलाज होता . कानात इअरफोन घालून तो चालत रूमकडे जाणाऱ्या रस्ता कापत होता . काही मिनिटामध्ये तो रूममध्ये होता . इतक चालून आल्यावर त्याचे पाय थोडे दुखत होते .इतक्यात त्याला घरच्यांचा कॉल आला . फार काही बोलण झाल नाही . फक्त चौकशी साठी हा कॉल होता . 

         अचानक त्याला जेवताना आलेला मेसेजची आठवण आली . तो मोबाइल घेतला आणि कॉल लावला . रिंग होऊनही कोणी उचलत नव्हतं . रात्र होत असल्यामुळे तो परत कॉल लावला नाही . नंतर कॉल करता येईल म्हणून तो झोपण्याची तयारी करू लागला . रूम अगदी मोकळी होती त्यामुळे त्यालाही थोडा वेळ सावरण्यात लागणार होत . इतक्यात त्याचा फोने वाजला . स्क्रीनवर पाहतो तर तिची मैत्रीण ' स्नेहल ' चा फोन होता . तो वेळ न घालवता उचलला . 

विवान -" हॅलो ."

स्नेहल -" हॅलो .."

विवान -" मागचा कॉल का नाही उचलीस ?"

स्नेहल -" फोन चार्जिंगला होता ."

विवान -" अच्छा ... मग बोल काय झाल?"

स्नेहल -" काय नाही ."

विवान -" मग तो मेसेज का पाठवलीस ?"

स्नेहल -" अरे मग न सांगताच सांगलीला गेलास . मग काय सांगू ?"

विवान -" अचानक ठरल ना जायच ."

स्नेहल -" मग मला सांगावस पण वाटल नाही का ?"

विवान -" तुला सांगणारच होतो पण ..."

स्नेहल -" पण काय ?"

विवान -" बर ते जाऊदेत . कशी आहेस ?"

स्नेहल -" छान .. तू सांग "

विवान -" मस्त .. एकटा आहे रूममध्ये .."

स्नेहल -" कोणी नाही का सोबत ?"

ती काळजी पोटी विचारली .

विवान -" नाही .. "

स्नेहल -" मग ?"

विवान -" काही नाही ... काही दिवसात येणार आहेत राहायला  .."

स्नेहल -" अच्छा ... कॉलेज कसा आहे ?"

विवान -" आहे चांगला ... पण मुली जास्त आहेत वर्गात ..."

स्नेहल -" म्हणजे तू मला विसरणार ..."

विवान -" अस का वाटतंय तुला ?"

स्नेहल -" मला माहिती आहे कि तुझे गुण ?"

त्याला हे ऐकून हसू आल .

विवान -" अग तस नाही ..."

   अशीच त्यांच्या गप्पा चालू झाल्या . अर्धा पाऊण तास तो तसाच बोलत होता . त्यांच्या मागच्या आठवणी निघू लागल्या . 

विवान -" अग  खूप रात्र झालाय ... "

स्नेहल -" हो ..."

विवान -" मग ठेवू ?"

स्नेहल -" हो ... गुड नाईट .. आणि अजून एक .."

विवान -" काय ? "

स्नेहल -" मिस यू ... आणि सोलापूरला आल्यावर फोन कर आणि फोन करत राहा ... बाय ..."

विवान -" मिस यू टू ... बाय "

त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच तेच आलेली होती . छोटीशी स्माईल हि चेहऱ्यावर पसरलेली होती . त्यांच्या आठवणी खूप होती त्याला हि रात्र घालवण्यासाठी ....त्यांच्यात घडलेल्या आठवणीत तो झोपी गेला . 

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच .. हा भाग कसा वाटला नक्की कळवा ... धन्यवाद 

🎭 Series Post

View all