तो बंगला भाग ५ (अंतीम भाग)

A story about paranormal activity.

मामा जरासे घाबरले पण त्यांना खात्री होती कि जुई बरोबर काहीच वाईट होणार नाही आहे. त्यांना काळजी होती ती फक्त रमाबाईंची. जुई त्यांना खोटं बोलून निघाली होती की ती आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या म्हणजे मामांच्या घरी राहणार आहे,आता जर ती संध्याकाळ पर्यंत परत नाही आली तर.तसं त्या दोघांनी ठरवलं होतं की आपलं काम झालं की रमाबाईंना सगळं खरं खरं सांगायचं.

              मग ते तिथेच सावली पाहून एका दगडावर,जुई ची वाट पाहत बसले.

जुई जसीच आत शिरली, तिला सगळीकडे नुसतं वाळवंट पसरलेलं दिसलं. एकतर इतक्या दिवसांनी सगळं अगदी बंद होतं त्यात प्रचंड उन्हाळा. ही बंगल्याच्या मागची बाजू होती. त्या वाळवंटात ती कशी बशी मार्ग शोधत पुढे जात होती. 

             थोडं चालल्या नंतर तिला एक प्रशस्त दरवाजा दिसला. ती त्या दरवाजाच्या जवळ आली आणि नुस्ता ढकलून पाहिला तर तो उघडला सुद्धा. ती एका यंत्रा प्रमाणे सगळं करत होती. भीती चं तर एकही चिन्ह तिच्या चेहऱ्यावर न्हवतं.

           ती आता त्या दारातून आत शिरली आणि समोर पाहते तर काय,एक मोठ्ठा हॉल अगदी एखाद्या जुन्या चित्रपटात पाहिला होता तसा. मोठे मोठे सोफे,मोठा डायनिंग टेबल, भिंती वर लावलेले तैलचित्र, कूळ मिळवुन अगदी सगळी कडे ब्रिटिश पद्धतीच्या  सजावटीची छाप होती, जी कधी काळी ह्या घराच्या वैभव आणि समृद्धी ची साक्ष देत होती.

सगळं,सगळं सामान अगदी जागच्या जागी होतं पण धूळीनं माखलेलं.जिथे तिथे मोठे मोठे जाळे लटकत होते.तिला जरा थांबुन सगळं पाहायचा मोह झाला पण लगेच मामांची सूचना आठवली कि इकडे तिकडे फार लक्षं नाही द्यायचं आणि सीधं वरच्या त्या खोलीत जायचं. ती वर जाण्यासाठी जीना शोधत होती तशीच तिची दृष्टी वर जाणारया घुमावदार जिन्यावर गेली आणि ती तो जीना चढून वर आली. तिथे एक मोठं कॉरिडॉर होतं,ज्याच्या दोन्ही बाजूला खोल्या होत्या. सगळ्या खोल्यांना मोठाले कुलूप लावून ठेवलेले होते.अगदी शेवटच्या खोलीच दार मात्र उघडं होतं,ही तिचं खोली होती जी रस्त्यावरनं दिसायची आणि ज्याच्या खिडकीत तिला ती आकृती दिसली होती.

                     ती,खोली जवळ गेली आणि बाहेरूनच तिनं आत डोकावून पाहिले तर आश्चर्यानं डोळे उघडेच राहुन गेले, खोलीचं निरीक्षण करत तिचे डोळे भिरभिर फिरत होते.एकदम  साफ स्वच्छं आणि व्यवस्थित जमवलेली ती खोली पाहुन तिला विश्वासच नाही बसला की ती एका साठ वर्षांनी बंद एका घराची खोली आहे. अगदी जुन्या काळातील पण सुंदर सजावट होती खोलीला. मोठा मच्छरदाणी लावलेला पलंग, त्याच्यावरची पांढरीशुभ्र चादर, भिंतीवर लावलेले तैलचित्र, सुंदर सुंदर शोभेच्या वस्तु,पुस्तकांची रेक,एक स्टडी टेबल त्यावरचा लेंप आणि....... आता मात्र ती चपापली,कारण त्या स्टडी टेबलच्या खुर्चीवर, टेबलावर  डोकं खाली करून एक तिच्याच वयाची मुलगी काही तरी लिहीत बसली होती. जुई कडे तिची पाठ होती.

                  जुई आता मात्र जरासी घाबरली. तिनं विचार केला की आता ती मुलगी मागे वळणार,तिचे ओठ रक्ताने माखलेले असणार आणि  तिच्या विभत्स आणि कुरुप चेहर्यावरील खोल खोल डोळ्यांनी पाहत ती आपल्यावर घाणेरड्या आणि घोघर्या आवाजात ओरडणार...आणि जुईन लगेच कानावर हात ठेवला.

                 पण तिच्या कल्पने विरुद्ध ती मुलगी तिच्या कडे वळली आणि अतिशय मधुर आवाजात, प्रेमाने तिच्या कडे पाहत म्हणाली,

" आत ये बाळा, आणि अजिबात घाबरु नको,मी तुला काहीही करणार नाही. तू आत्ता कल्पना केली तशी नाहिये ना मी दिसायला, असं म्हणुन ती गोड हसली.लोकांनी आपापल्या कल्पनेनुसार आम्हाला अगदी भयानक रूप देऊन टाकलय,पण तसं काही नाही आहे.आमचा उद्देश्य कोणाला त्रास द्यायचा कधीच नसतो.

तू इथे माझ्या मदतीला आली आहे,मला तुझ्या सारख्याच एका व्यक्तिची गरज होती. ये आत ये. माझं नाव देवयानी आहे, तुझं नाव जुई आहे न, खुप सुंदर नाव आहे तुझं, तुझ्या व्यक्तित्वाला शोभेल असं."

आता जुई ची भीती नाहीशी झाली. देवयानी अत्यंत सुंदर आणि मृदुभाषी होती.तिनं अगदी जुन्या काळातील साजसज्जा केलेली होती.दोन मोठाल्या वेण्या,परकर पोलकं,दागीने  इत्यादी. जुईला ती फार आवडली,ती तसं तिला बोलून पण दाखवणार होती पण पुन्हा मामांची सूचना आठवली आणि ती गप्पच बसली. मामांनी तिला सांगितले होते की आपण तिथे जास्त बोलायचं नाही, नुसतं अईकायचं.

         ती आत गेली आणि देवयानी समोर एका खुर्चीवर जाऊन बसली. आता देवयानीन तिच्याशी बोलायला सुरुवात केली.

" हे बघ जुई, तुझ्यात आणि तुझ्या मामांच्या आत  पवित्र आत्मांचा वास आहे, म्हणून मी तुम्हालाच एका महत्त्वपूर्ण कामासाठी निवडलं आहे. तुला दोन आत्मांना मुक्ती मिळवुन द्यायची आहे. आणि तुझ्या मामांच्या मदतीने तू सहज हे काम करु शकते. मी त्यांना आत येऊ दिलं नाही कारण मला तशी परवानगी न्हवती.आमच्या काही सीमा असतात त्यांच्या पलीकडे जाऊन आम्ही काहीही करू नाही शकत.

मी तुला पूर्वी काय घडलं आहे ह्या घरात, ती संपूर्ण गोष्ट सांगते आणि मग तू ठरव कि तू माझी सहायता करु शकतेस का नाही.

आमच्या घरात कोण कोण होतं हे तर तुला माहितच आहे आणि काय घडलं होतं इथे हे ही.पण आज मी तुला सांगणार आहे कि वास्तविक घटना काय होती.

मी माझ्या बाबांची खुप लाडकी होती. त्यांचं माझ्या वर इतकं प्रेम होतं कि त्यांनी बागेत माझीच मुर्ती बसवून घेतली. अभ्यासात हुशार आणि खूप आज्ञाकारी होती मी.

त्या काळात सुद्धा माझ्या बाबांनी मला खूप शिकवलं. माझा भाऊ पण हुशार होता आणि उच्च शिक्षणासाठी लंडनला होता.  गावात बाबांचं खुप नाव होतं. सगळे त्यांना बाबासाहेब म्हणुन ओळखायचे.माझे काका, म्हणजे त्यांचे लहान भाऊ बाबांच्या अगदी विपरीत होते, आणि त्यांना खूप घाणेरड्या सवयी पण होत्या,दारु, जुगार इत्यादी.त्यामुळे त्यांचं लवकर लग्नही लावून दिलं की कदाचित जवाबदारीनं तरी ते जरा सुधारतील. लग्न झालं, मूलं ही झालं पण स्थिती आणखीनच हाता बाहेर जाऊ लागली.त्यांची बायको म्हणजे माझी काकी पण त्यांना खुप त्रासली होती. घरात सतत त्यांच्या मुळं वाद व्हायचे.

घरात भरपूर पैसा होता.बाबांनी आपल्या हुशारीने, मेहनतीने आणि बुद्धीमत्ते न खुप प्रगती केली होती.काका अगदीच काही नाही करायचे आणि सतत बाबांच्या पुढे पईश्याचा तकादा लाऊन ठेवायचे. काका,बाबां पेक्षा दहा वर्षांनी लहान होते. बाबांचा त्यांच्या वर फार जीव होता म्हणून ते काकांचे सगळे हट्ट पुरवायचे. कदाचित नकळत पण बाबां मुळेच काका बिघडले असणार.

               एकदा काकाला दारु आणि जुगार साठी पैसे हवे होते,पण त्या दिवशी मात्र घरच्या सगळ्यांनी त्यांना खूप रागवलं.बाबांनी तर अगदी नाहीच म्हणुन सांगितलं. काकांनी मग बाबांच्या वयाचा आणि मानाचा विचार न करता त्यांच्याशी खूप वादविवाद केला.त्यांना वाटेल ते बोलायला लागला.अगदी अतीच करुन टाकली.मग नेहमी प्रेमाने आणि संयमाने वागणार्या बाबांचा पण संयम आणि हात त्या दिवशी सुटला आणि त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा काकांवर हात उचलला.

              सगळ्यांसमोर झालेला अपमान काकांना सहन नाही करता आला आणि रागाच्या भरात त्यांनी खुप मोठं आणि चुकीचं पाऊल उचलुन टाकलं. बाबांच्या बंदुकीने त्यांनी आम्हा सगळ्यांना ठार केलं.क्षणात सगळं सगळं संपलं होतं.

               भानावर आल्यावर त्यांना कळलं की, आपल्या हातुन खुप मोठा गुन्हा झाला आहे, आणि आता आपल्याला मोठी शिक्षा होणार हे नक्की आहे. घाबरुन त्यांनी स्वताला पण मारायला बंदूक उचलली होती,पण एक विचार त्यांच्या डोक्यात शीजला आणि ओठांवर कुत्सित हसू आलं.त्यांचं नशीब पण त्या दिवशी चांगलं होतं कि घरातले सगळे नौकर माणसं गावातल्या एका जत्रे साठी गेले होते.त्यांच्या ह्या कृत्याचं कोणीच साक्षीदार न्हवतं.

                त्यांनी माझं प्रेत उचललं आणि आपल्यासारख्याच एका रिकामटेकड्या आणि दारुड्या मित्राला बोलावून घेतलं आणि त्याच्या सहाय्यनं ते बंगल्याच्या मागच्या बाजूला जमीनीत खोल गाढून दिलं.आणि एक कहाणी सुद्धा रचून टाकली कि माझं एका मुलावर प्रेम होतं त्यावर घरच्यांचा विरोध होता.म्हणुन मी हे कृत्य करुन घरातून त्या मुलासोबत  पळून गेली.

                 माझ्या भावाला तर विश्वासच नाही झाला की मी असं काही करु शकते. संयोगाने त्या दरम्यान माझा आणि बाबांचा एक विवाद सुरू होता पण  तो शिक्षणाला घेऊन. मला पण भावा सारखं उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जायचं होतं, आणि बाबां सकट घरच्या सगळ्यांचा त्याला  विरोध होता. गावात शाळा फक्त बारावी पर्यंत होती. मी त्यांच्याशी अबोला धरला होता कि कदाचित ते अईकतील माझं. घरातल्या नौकर माणसांना फक्त हे माहीत होतं की माझ्या आणि बाबां मध्ये काही विवाद सुरू आहे पण  कोणत्या कारणा वरुन हे न्हवतं माहित. तर भावानं विचारपूस केली तर त्याला पण काकांच्या रचलेल्या गोष्टी वर विश्वास झाला आणि त्याने आयुष्यात कधीच माझं तोंड न पाहण्याची शपथ घेतली, आजही त्याच्या आणि काकांच्या परिवारात मला हत्यारी, चांडाळ,वेडी,स्वार्थी,धूर्त अश्याच उपमा दिल्या जातात. दुःख तर ह्या गोष्टीचं आहे की माझा सख्खा भाऊ पण मला ओळखू नाही शकला, काकांनी कसा हा कट रचवला होता. बोलता बोलता देवयानी रडायला लागली.
जुईन तिचे अश्रू पुसण्यासाठी हात वाढवला तर तो देवयानीच्या शरीराच्या आरपार होऊन गेला, जुईला लगेच आठवलं की देवयानी आता आपल्यातली नाही आहे. मग ती सुद्धा रडू लागली.

देवयानी नं तिला शांत केलं आणि पुढची गोष्ट अईकण्याची विनंती केली.

"जुई,आता मी थकले ग,मला मुक्त व्हायचं आहे आता.मला खुप वाटतं कि मी जोर जोरात ओरडून जगाला आपला खरेपणा सिद्ध करून दाखऊ. ओरडून ओरडून माझ्या भावाला सांगु कि मी गुन्हेगार नाही आहे,मी धूर्त,कपटी , स्वार्थी आणि हत्यारी नाही आहे. पण मला नाही जमत आहे हे. तू प्लीज माझी मदत कर जुई. माझा भाऊ लंडन ला रहातो,मी एक पत्र तुला देते तू त्याच्या पर्यंत पोहचव. पत्ता पण आहे ह्यावर. मी माझ्या मर्यादे पलीकडे जाऊन हे काम करु शकत नाही.

                 आणखी एक काम,जुई माझे काका इथुन सगळा पैसा घेऊन मुंबईला चाललें गेले होते.मुंबईत त्यांनी दुसरं लग्न केलं आणि मुलीच्याच घरी रहायला लागले.तिथे स्वताचा व्यवसाय सुरु केला आणि खूप पैसा पण कमवला. पण वेळ सरकत गेला तसा त्यांना अनुभव येत गेला कि त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतं.भरपूर पैसे, सुंदर बायको, चांगले मूलं सगळं काही होतं त्यांच्या जवळ पण मनानी ते कधीच सुखी राहिले नाही, त्यांची इथे यायची पण कधीच हिम्मत झाली नाही.जन्म भर त्यांचं मन त्यांना खात राहिलं.देवाने सगळं दिलं त्यांना पण त्याच बरोबर शिक्षा म्हणून कितीतरी आजार सुद्धा दिले.चार पाच वर्षांपासून ते मृत्यू शैय्या वर पडून मुक्तीची वाट पाहत आहे.आपल्या कृतिची क्षमा मागून मागून थकले पण देव काही त्यांना क्षमा करत नाही आहे. आता मला त्यांची कीव येते.

            तू माझ्या भावा पर्यंत हे पत्र पोहचव,तो काकांना भेटायला जाईल आणि ते त्याला खरं काय सांगुन आपला गुन्हा कबूल करतील तेव्हाच त्यांना मुक्ती मिळेल.मग माझा भाऊ इथे येऊन   माझा पण  विधीनुसार अंतीम संस्कार करुन मला सुद्धा मुक्त करेल.

जुई करशील ना बाळा आमची मदत.तुझ्या मुळे दोन आत्म्यांना शांती मिळनार आहे.देवयानीनं जुई पुढे हात जोडले.

"हो मी आणि मामा नक्की तुमची सहायता करु.तुम्ही प्लीज हात नका जोडू. द्या ते पत्र मला.आम्ही पोहचवू ते तुमच्या भावा पर्यंत".
जुई अगदी ठसक्यात म्हणाली, आणि देवयानीला पण हसु आले.तिने जुईचे मनापासून आभार मानले आणि तिला तोंड भरून आशिर्वाद दिले.
        जुईला घरी लवकर पोहचायचे होते म्हणुन तीनं  देवयानीला नमस्कार केला आणि तिचा निरोप घेऊन तिथून पळाली. बाहेर मामा आतुरतेने तिची वाट पाहतच होते.
घडलेला सगळा प्रकार मामांना सांगुन ते दोघं तिथनं निघाले.
तिथून निघाल्या बरोबर मामांनी आधी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते पत्र पोस्ट केलं.
पुढच्या सर्व गोष्टी देवयानीच्या इच्छेनुसार घडत गेल्या. तिच्या काकांना मुक्ती मिळाली,भावाचे तिच्या प्रतिचे सगळे गैरसमज दूर झाले आणि त्यानी विधीपूर्वक देवयानीचा अंतीम संस्कार केला.
ज्या दिवशी देवयानीला मुक्ती मिळणार होती,त्याच्या एक दिवस आधी जुई त्या बंगल्याच्या समोर उभी राहुन खिडकी कडे पाहत होती,तिला देवयानी दिसली हात हलवून निरोप घेताना.दोघींच्याही डोळ्यात अश्रू होते.आणि मनात शांतता.आता बागेतली ती मुर्ती तीला नेहमी प्रसन्न दिसायची,पण ती खिडकी मात्र पुन्हा कधीच उघडली नाही.
समाप्त????

             


 

        

     

🎭 Series Post

View all