Oct 22, 2020
स्पर्धा

नाते तुझे नी माझे.... वाचकांचे आभार

Read Later
नाते तुझे नी माझे.... वाचकांचे आभार

सर्व प्रथम ईरा टीम आणि वाचक वर्गाचे आभार मानते...
ईराने हा विषय दिला त्यामुळे मला ही कथा लिहिता आली... जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा फ़क्त ५ भाग होतील एवढीच कथा मला सुचली होती... पण वाचक वर्गांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मी या कथेचे १२ भाग लिहू शकले...

प्रत्येक भागानंतर पुढच्या भागाची असलेली उत्‍सुकता, कंमेंट देऊन दिलेले प्रोत्साहन या मुळे हे शक्य झाले आहे...

खरंतर नाते तुझे नी माझे ही कथा अगदी रोज घडणार्या गोष्टीमधून सुचत गेली आहे....अरेंज असो नाहीतर लव्ह पण लग्नानंतरचे प्रेम काही वेगळेच असते नाही का??

एकमेकांना अनोळखी असणारे दोन व्यक्ती पती आणि पत्नी म्हणून एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि एकमेकांचे आयुष्य बनून जातात...

प्रत्येकाचे नाते वेगळे असते हे या कथेमधून मी दाखवायचा प्रयत्न केला आहे....सहवासाने प्रेम वाढत जाते आणि एकमेकांमध्ये ते गुंतून जातात...

जेव्हा कॊणी म्हणते तिला विचारून सांगतो किंवा ह्यांच्याशी बोलुन सांगतें तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की ह्यांच्या कडे फ़क्त बायकोच चालतं किंवा नवऱ्याच चालत त्या मागचा खरा अर्थ असतो की आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो तसेच प्रत्येक गोष्ट एकत्र विचार विनिमय करून ठरवतो... पण नात्यात हा असा समंजसपणा यायला काही वर्षे जावी लागतात....

तुम्ही जर लगेच हे सगळे व्हावे ही अपेक्षा केली तर भांडण वाढत जाऊन ते नाते फुलण्याआधीच कोमेजून जाते... नवरा बायकोचे नाते देखील असेच असते... त्या नात्याला फुलायला वेळ लागतो... त्यासाठी एकमेकांना समजून घ्यायला हवे...

माझ्या वाचनात आलेली कविता----

नाते तुझे नी माझे असे काही असावं
एकमेकांना न विचारता काही एकमेकांचे मन कळावे........
कधी मी रूसून बसावे,
   अन् तु प्रेमाने मला जवळ घ्यावे........
कधी तु ही माझ्यावर चिडावेस,
   पण माझ्या डोळ्यात पाहिल्यावर तु सारे काही विसरावेस.......
न सांगता मी, तु मला फोन करावास,
   कोणाचा नाही तु फक्त माझाच असावास........
मी नेहमी तुझ्या मेसेज ची आणि फोन ची वाट पाहते,
    तु ही तितक्याच आतुरतेने मला सारे काही  विचारावेस.......
 समुद्र कीनारी चालताना तु हात माझा पकडावास,
   जास्त काही नको माझ्या सोबत फक्त तो रम्य क्षण तु पहावास..........
खूप आठवण जर आलीच माझी तुला,
  तर डोळे बंद करून आठवत जा मला.,
   नाहीच राहावले तर फोन करत जा मला........
जास्त काही नको मला,
  तुझेच सुख पाहिजे मला........
मनात जर कधी आलेच तुझ्या,
  वाटले काही द्यावेसे मला,
तर फक्त तुझे प्रेम आणि आयुष्यभराची साथ दे मला...........
तुझे माझे नाते काही असे असावे,
एकमेकांना न विचारता काही एकमेकांचे मन कळावे........!!!!


 

या कथेत मी सांगितलं आहे त्या प्रमाणे आपल्या जोडीदाराची प्रेमाची भाषा आपण समजून घ्यायला हवी... तुम्हाला सगळ्यांना ही कथा आवडली हे तुम्ही दिलेल्या लाईक आणि कंमेंट वरून समजून येते तरीपण असे काही वाचक आहेत ज्यांनी नियमीत कंमेंट करून कथेचा followup घेतला... त्यांची नावे मी इथे लिहीत आहे आणि त्यांचे आभार मानत आहे...

माझे नातेवाईक आणि मैत्रिणी या मध्ये स्मिता तलाठी, सोना तलाठी, प्रज्ञा गांधी, पुर्वा धारिया, लीना गांधी, मेघा गांधी, समिधा शेठ यांचे आभार मानते...

त्याच प्रमाणे वेळोवेळी कंमेंट देऊन प्रत्येक भागाला प्रतिसाद देणारे हे वाचक---- सुवर्णा सुरोशे, सरीता दातीर, प्रियांका मेंढेकर, भावना शहा, अनिल साबळे, समिका पानसरे, माधुरी केळकर - फडके, अश्विनी पाखरे- ओगले, सुनीता पवार-पाटील, प्रतीक्षा पाटील, रंजना बोरकर, प्रतिपदा माने, रोहिणी मोरे, सुशमा आगरकर, कल्पना लाखे , शिल्पा कुलकर्णी, आरती धोत्रे, वीणा शामकुवर, जयश्री मगर यांचे देखील आभार मानते....

लवकरच नवीन कथा घेऊन आपण भेटूया असेच प्रेम राहू दे....

सौ. अनुजा शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...