Thank you so much team Ira...!!!
दीड वर्षांपासून मी ईराची नियमित वाचक. आपण काही लिहू आणि स्पर्धेमध्ये भाग घेऊ असं कधी वाटलंच नव्हतं. निमित्त होतं fathers डे च आणि माझ्या बाबांची पुण्यतिथी. बाबा हा माझ्यासाठी एकदम हळवा विषय. अलकच्या छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या, संजना मॅमला त्याबद्दल लिहिलं आणि ते लिहितानाच मला 2-4 अलक सुचल्या. मी मॅम ला पाठवल्या. त्यांनी ईरा वर post करा म्हटलं अन सुरू झाला एक नवा प्रवास, साहित्याचा, लिखाणाचा. Registration पासून Blog कसा पोस्ट करायचया सगळच नवीन. काहीच जमत नव्हतं सुरुवातीला. मग मॅमला हजारदा messeges केले, त्यांनी पण सगळे problems अगदी सहज सोडवले. आणि पहिलं वहिलं लिखाण अलक "बाप_ मनातला एक हळवा कोपरा" पोस्ट झालं. वाचकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. ईरा वरच्या इतक्या चांगल्या लेखकांमध्ये माझा नंबर येईल अशी अपेक्षाही नव्हती. बाबांसाठी काही तरी लिहावं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचा एक प्रयत्न करून बघावं म्हटलं. माझे बाबा पण साहित्यिक होते , खूप सुंदर लिहायचे ते.
आज ईराची ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हातात मिळालं अन बाबांनी कौतुकाची थाप पाठीवर दिल्याचा भास झाला.
Thank you again team Ira!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा