ईरामुळे मिळत आहे
खूप सारा आनंद
त्यासाठी ईराला
खूप खूप धन्यवाद
खूप सारा आनंद
त्यासाठी ईराला
खूप खूप धन्यवाद
लहानपणी बक्षिस मिळाल्यानंतर जसा निखळ आनंद होत होता अगदी तसाच आनंद मला ईराची ट्रॉफी मिळाल्यावर झाला होता.
जलद कथा लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ नंबर आला आणि जेव्हा कुरिअरने घरी सर्टीफिकेट व ट्रॉफी आली तेव्हा जो आनंद झाला,तो शब्दांत व्यक्त करणे अशक्यचं.
पुन्हा बालपणात गेल्यासारखे वाटत होते.
मला तर आनंद झालाचं होता पण माझ्या मिस्टरांना व मुलालाही खूप आनंद झाला होता. आणि असा हा अनमोल आनंद मी आईवडील, भाऊबहीण,मैत्रीणी यांच्या सोबत शेअर केला. सर्वांकडून माझे खूप कौतुक झाले.
खरचं हा जो आनंद असतो ना ..तो काही वेगळाचं असतो!
महागडे कपडे आणि दागदागिने घालून मिळणाऱ्या आनंदापेक्षा खूप वेगळा आणि अविस्मरणीय असतो.
ईराने मला असे आनंदाचे क्षण दिले.
'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या स्पर्धेत मी आवड म्हणून लिहीत होती.
ईरावरील मोठमोठ्या साहित्यिक मंडळीत आपला कुठे नंबर लागणार ? हा विचार मनात असायचा.
नंबर यावा या उद्देशाने कधी लेखन केले नाही. आपल्याला आनंद मिळतो यासाठी लिहीत होते. पण जेव्हा कधी प्रथम,कधी द्वितीय, कधी तृतीय तर कधी उत्तेजनार्थ नंबर आला. तेव्हा तर एक वेगळचं फिलींग वाटायचं. आपणही लिहू शकतो . असे वाटू लागले.
एवढे दिग्गज लेखक आहेत आणि आपले लेखन त्यामानाने काहीच नाही .
पण जसजसे नंबर येत गेले ,सर्टीफिकेट मिळत गेले. मनात आत्मविश्वास निर्माण होत गेला. मनातील भीती नाहीशी होत गेली. आणि जे लिहीते आहे त्यापेक्षा अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करू लागली.
पण जसजसे नंबर येत गेले ,सर्टीफिकेट मिळत गेले. मनात आत्मविश्वास निर्माण होत गेला. मनातील भीती नाहीशी होत गेली. आणि जे लिहीते आहे त्यापेक्षा अजून चांगले लिहीण्याचा प्रयत्न करू लागली.
वाचकांसाठीही एक स्पर्धा होती,त्यातही मी एकदा विचारलेल्या प्रश्नांची जास्त उत्तरे दिली होती,त्याचे ही बक्षिस मिळाले होते. तेव्हा तर अगदी शाळेचीच आठवण येत होती. शाळेत प्रश्नांची उत्तरे देतांना जो आनंद होत होता अगदी तसाच आनंद तेव्हाही होत होता.
बक्षिस आणि स्वकमाई यांचा आनंद काही औरचं!
आणि हा आनंद ईरावर नक्कीच मिळत असतो.
वेगवेगळ्या स्पर्धेतून मिळणारी बक्षिसे, लेखन समृद्धी योजनेतून मिळणारी रक्कम आणि views नुसार मिळणारी रक्कम.
बक्षिस छोटे असो की मोठे ..बक्षिस हे नेहमी आनंदच देत असते.
स्वकमाई आणि ती ही आपल्या गुणांनी, मेहनतीने मिळवलेली ..मग तो आनंद काय वर्णावा?
'हमभी किसीसे कम नहीं ..' अगदी असेच वाटते.

माझ्या जीवनात असा खूप सारा आनंद देण्यासाठी ईराला खूप खूप धन्यवाद .
ईरा हे लेखक ,वाचक यांच्या साठी खूप छान व्यासपीठ आहे. छोट्या बालमित्रांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ.
स्पर्धेचा विषय,स्पर्धेचे स्वरूप, नियम, स्पर्धेचा निकाल
हे सर्व अगदी छान व नियोजन बद्ध असते.ईरावर लेखनासंबंधी येणाऱ्या
प्रत्येकाच्या अडीअडचणी ,प्रश्नांना लगेच सोडविले जाते.
अगदी नवोदित सभासदाला ही पटकन आपलसं करून घेण्याची जादू ईरामध्ये आहे.

ईरावर खूप छान छान आणि वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य वाचायला मिळते.
आपण स्वतः लेखन करत असलो तरी ..येथे इतर लेखकांचे साहित्य वाचतांना खूप काही शिकण्यास मिळत असते. त्यांच्या प्रमाणे आपण लिहू शकत नाही. कारण प्रत्येकाची लिहीण्याची शैली वेगवेगळी असते. पण आपण आपल्या लेखनाचा दर्जा नक्कीच सुधारू शकतो. असे मला वाटते.
मी खूप मोठी लेखिका नाही. पण मला वाचनाच्या आवडीमुळे लिखाणाचीही गोडी लागली. आणि आपल्या मनातील भावना, विचार शब्दरूपात व्यक्त करू लागली. आपण लिहीलेले
कोणाला आवडले तर आनंद च होतो.
आपल्या लिखाणाला views,चांगल्या कमेंट्स, लाईक्स मिळाले तर प्रत्येकालाच आनंद होतो. पण नाही मिळाले म्हणून वाईट वाटण्याचेही कारण नाही. कारण आपण आपल्या आनंदासाठी लिहीत असतो. मगं आपला आनंद इतरांवर का अवलंबून असावा?
आपल्याला जे चांगले वाटते ते करत जावे. आपला आनंद आपण घेत रहावा.

ईरा प्रशासकीय टीम, ईरावरील लेखक ,वाचक हे सर्व खूप चांगले आहेत . सर्व एकमेकांना प्रोत्साहन देत असतात. एकमेकांच्या आनंदात,यशात सहभागी होत असतात .
छान अशा ईरा परिवाराची मी पण एक सदस्य आहे. याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही!
छान अशा ईरा परिवाराची मी पण एक सदस्य आहे. याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही!
वाढदिवसानिमित्त ईराला
खूप खूप शुभेच्छा.
ईराची व्यापकता वाढत राहो
हीच मनापासूनची सदिच्छा
खूप खूप शुभेच्छा.
ईराची व्यापकता वाढत राहो
हीच मनापासूनची सदिच्छा