तेरा यार हुं मैं भाग -३

दोन मैत्रिणींची यारी.

तेरा यार हुं मैं भाग _३

जलद कथा मालिका.

दिवसा मागून दिवस गेले.महिने गेले आणि वीस बावीस वर्षे गेली.

जया आणि रूपालीची मैत्री त्यांच्या मनात अजून तशीच होती.अगदी तेव्हासारखीच....!

दोघींचे संसार सुरळीत चालू होते. मुले बाळेही झाली होती.हळू हळू संसाराच्या चक्रव्यूहात दोघी अडकत अडकत चालल्या होत्या.जबाबदारी ,कर्तव्ये वाढत गेली,वय वाढत गेले,कामांच्या बदल्या,गावी परगावी जावे लागणे,यात मधली वीस बावीस वर्षे निघून गेली.दोघींची ताटातूट आता कायमचीच होते की काय असे वाटत असतानाच त्यांच्या मनातील सदभावनेने त्या दोघींनी एकमेकींना साद घातली.आणि नशिबाचे चक्र त्यांच्या मनोधारने प्रमाणे फिरले.आणि अचानक दोघींना एकमेकींचा फोन नंबर मिळाला.

आणि त्यांनी एकमेकींशी संवाद साधला ....!

" हाय जया,कशी आहेस तू,हॅलो डियर ,कुठे असतेस,काय करतेस,माझी आठवण येते का,का विसरलीस मला.आपले बालपण,कॉलेजचे दिवस आठवतात का नाही.आपले प्रॉमिस आठवते ना.मी तर आपले प्रॉमिस कधीच विसरले नाही,बघ.शेवटी काढलेच ना तुला शोधून.....!!!"

" अग,हो हो ,रूपा डियर अग किती बोलतेस तू,थांब ना जरा,माझे तर ऐकून घे.मी पण इथेच आहे.आपण भेटू शकतो.मलाही नेहमी तुझी आठवण येते.मी पण विसरले नाही आपले प्रॉमिस."

जया आणि रुपाली तारीख,वेळ, वार,सगळे पक्के ठरवून घेतले.आणि एकमेकींना भेटण्यासाठी आतुरतेने तयारीला लागल्या....


....तो दिवस उजाडला, रुपालीने घरात आधीच सांगुन ठेवल्या प्रमाणे सकाळी उठल्या उठल्या लगेच कामाला सुरवात केली.घरातल्यांचे सकाळचे नाश्ता,दुपारचे जेवण ,सर्व तयारी करून ठेवली.

खरतर रुपाली हाऊस वाइफ म्हणजे गृहिणी असली तरी तिला माहेरचे लाड कौतुकाने हे गृहिणी पद ही सांभाळणे खुप अवघड गेले होते.तिच्या घरात सासू, नवरा,दिर,नणंद,तिची लहान दोन मुले.आणि या घरची सून आणि सासुरवाशीण ह्या कर्तव्ये सांभाळताना तिला तारेवरची कसरत करावी लागत होती.

वेळोवेळी निष्कारण होणारी अवहेलना,गृहीत धरणे,छोट्या छोट्या गोष्टींवरून अपमान,असल्या अनेक घरगुती तनावाचे टप्पे सोसून सोसून ती या वीस बावीस वर्षात चांगली समंजस आणि सहनशिल झाली होती.

..... रुपालीला वाटले की,जया काहीच बदलली नसेल,कॉलेज लाईफ प्रमाणेच स्टायलिश आणि स्वतः कमावती आहे.आणि जया आपल्याला बघूनही आनंदी आणि खुश झाली पाहिजे.


मग, रुपालीने छानसा पांढऱ्या रंगाचा पटियाला पंजाबी ड्रेस घातला.नेहमी प्रमाणे त्यावरून फुल स्लीव्ह चे श्रग घातले,कॉलेजमध्ये असताना तिला छान दिसणारी सागर वेणी व्यवस्थित घट्ट करून बांधून घेतली. पापन्यांवर रेखीव आयलायनर लावले,नॅचरल पिंक लिपस्टिकने ओठांना उठावदार केले.डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावरून स्टॉल चांगला फिक्स करून घेतला आणि घरातल्या सगळ्यांना किचन मध्ये नाष्ट्याचे ,जेवणाचे कुठे काय ठेवले आहे, हे सांगून तिच्या स्कुटीवर स्वार झाली....

.....ही तिच लाजरी बूजरी रुपाली आज जयाला भेटायला जाताना ,एकदम फ्रेश,आनंदी,आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसत होती.

जयाच्या ऑफिसचा जिना चढताना ,आयुष्यातील मागील गेलेली वीस बावीस वर्षे जनुकाय ती मनोमन उतरत होती.आणि जयाच्या पुढे पोहचली ती कॉलेजमधली तिची जिवलग सखी ,रुपाली.पण.....

( जयाला ,वीस बावीस वर्षांनी बघून रुपालीला तिच्यात काय बदल दिसले.वाचूया पुढील भाग ४ मध्ये.)
©® Sush.

🎭 Series Post

View all