तेरा साथ हो तो (जलद कथा) भाग 3

Story Of Strong Bond


तेरा साथ हो तो
भाग ३
मनीष " मग परेश !! आज काय एकदम खुश दिसतोय ? आज काही आहे का ?"
परेश " नथिंग .. असे का वाटले तुला ?"
मनीष " अरे खोटारड्या !! ग्लो आलाय चेहऱ्यावर .. अजिबात चिडचिड नाही केलीस आज मिटिंग मध्ये .. तेव्हा बोल नक्की क्या बात आहे ?"
परेश मागे चेअरला रेलून बसला .. थोडासा हसला " अरे .. नीलम आठ दिवसांच्या ट्रिप ला जाणार होती .. मला ना टेन्शनच आले होते .. आठ दिवस तिच्या शिवाय ? शक्यच नाही रे ? आज मी तिला फायनाली कन्व्हिन्स केले कि प्लिज नको जाऊस ? आणि तीने तिची ट्रिप कॅन्सल केली ."
मनीष " कसला आहेस रे तू ? बिचारी वहिनी ! शी आल्वेज मेक्स कॉम्प्रो "
परेश " अरे असे नाही रे ? मला करमत नाही रे तिच्या शिवाय ? ती नसेल ना घरी तर मी महिने ऑफिस मध्ये राहील .. मला घरी जायची ईच्छाच राहत नाही .. आणि मी नेईन तिला ट्रीपला तिला पाहिजे तिथे या वीक एन्ड ला ..सो नो वरिज ."
मनीष " ओहो !! मजनू .. म्हणून ग्लो आलाय .. हा प्रेमाचा ग्लो आहे म्हणायचा तर "
परेश " अरे !! प्रेमाचं वगैरे काय नाही रे .. झाली आता १० वर्ष लग्नाला .. इट्स नॉट दयाट ."
मनीष " वेड्या !! हे प्रेमच आहे .. मुरलेलं " आणि हसतच निघून गेला
---------------
परेश पुन्हा त्याच्या चेअरला मागे टेकला आणि शांतपणे विचार करू लागला " खरंच का ? मला ती माझ्या जवळ हवीय म्हणून मी तिला पाठवत नाहीये कि हा संसार दोघांचा आहे तो तिने शिव धनुष्या सारखा पेललाय तो मी पेलू शकत नाही यांची मला खात्री आहे म्हणून.
तेवढयात सहा वाजले तो घरी निघाला .. कार ड्राईव्ह करताना त्याने एफ एम लावला होता .. मस्त गाणी ऐकत घरी चालला होता .. मधेच शिटी वाजवत होता .
सिग्नलला एक मुलगी रेड रोजचा गुच्छ विकत होती .त्याच्या गाडी पासून खूप लांब होती पण त्याने तिला हात करून बोलावून घेतले आणि तिच्याकडून तो रेड रोज चा गुच्छ घेतला ..
घरी आला ..

🎭 Series Post

View all