तेरा साथ हो तो... भाग 5(ऋतुजा)

Katha premachi


तेरा साथ हो तो...भाग 5
जलद कथामालिका स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर

नमिता रडत रडत बाहेर गेली, पारसही तिच्या मागे मागे गेला.


"हे बघ नमिता तुझं उत्तर जाणून घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. सांग मला काय प्रॉब्लेम आहे तुला? का होकार देत नाहीयेस? तुझ्या मनात माझ्या विषयी प्रेम नाहीये का? नसेल तर सांग तसं."

"तसं नाहीये पारस."

"मग काय आहे बोल ना."

"तू एक चांगला मुलगा आहेस, हुशार आहेस, दिसायला हँडसम आहेस, माझ्यापेक्षा चांगली हुशार मुलगी मिळेल तुला. मग तू माझ्याशी का?" ती बोलता बोलता थांबली.

"हे बघ नमिता मला तुझ्या पेक्षा हुशार मुली, देखण्या मुली मिळतील पण मला त्या नकोय मला तू हवी आहेस आणि का नाही म्हणतेस?"

"पारस काय माहिती रे तुला माझ्याबद्दल? काहीच माहिती नाहीये. तू जा पारस मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये."

"नमिता मला सगळं माहिती आहे तुझ्याबद्दल. मला सगळं कळलं आणि म्हणूनच मला माझ्या आयुष्यात तू हवी आहेस."

नमिता रडता रडता थांबली,
"म्हणजे? काय माहिती आहे तुला?"

"सगळं.. सगळं माहित आहे."

"हे बघ पारस जर तुला सगळं माहित झालं असेल ना तर प्लिज जा तू इथून. माझ्यामुळे तू तुझं आयुष्य खराब करू नकोस. निघून जा इथून."

"तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब नाही होणार, तुझ्यामुळे माझं आयुष्य सुंदर होणार आहे, याची तुला कल्पना नाहीये."

बोलता बोलता अचानक नमिताची तब्येत खराब झाली, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. दोन दिवस नमिता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. त्या संपूर्ण दोन दिवसात पारस तिच्याजवळ बसून होता, तिचा हातात हात घेऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होता.

"ही डोळे उघडेल आणि मला म्हणेल की पारस मला माझ्या आयुष्यात तू हवा आहेस." असं बोलेल याची वाट बघत होता.

तीन दिवसानंतर नमिता बोलायला लागली, तिने डोळे उघडले तेव्हा तिला बाजूला पारस बसलेला दिसला. त्याच्याकडे बघून ती हसली.

"अजून गेला नाहीस इथून."

"नाही आता मी इथून कधीच जाणार नाही आहे, तुझा हात हातात घेतलाय मी, बघ हात कधी सोडणार नाही."

क्रमशः

🎭 Series Post

View all