तेरा साथ हो तो...भाग 4(ऋतुजा)

Katha tyachy nishwarth premachi


तेरा साथ हो तो...भाग 4
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर

एक क्षणही न घालवता पारस तिच्या घरी गेला, नमिताने दार उघडला.

"पारस तू इथे? का आलायस इथे?"

घरी नमिता एकटीच नव्हती, तिचे आई-बाबा देखील होते.

"नमिता कोण आलय ग?" तिच्या बाबांचा आवाज आला.


"बाबा माझा कॉलेज फ्रेंड आहे." नमिता समोर काही बोलणार पारस तिला बाजूला करून आत गेला.

"नमस्ते काका माझं नाव पारस आहे, मी नमिताच्या कॉलेजमध्ये शिकतो."

तो अजून काही बोलणार तितक्यात नमिताची आई बाहेर आली.

"नमस्कार काकू माझं नाव पारस आहे मी नमिताच्या कॉलेजमध्ये आहे, यावर्षी आलोय या कॉलेजमध्ये. आधी दुसऱ्या शहरात राहायचो, बाबांची बदली झाली आणि आम्ही इथे राहायला आलो."

"बस ना बस.."

"नाही काका मी बसायला आलेलो नाहीये, मला नमिताला काही सांगायचं आणि मी ते तुम्हा सर्वांच्या समोर सांगणार आहे, माझं नमितावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे."


"अरे काय बोलतोस तू?" नमिता त्याच्यावर चिडली.


"हे बघ नमिता, मला खरंच तू मनापासून आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. पारस सगळं एका दमात बोलून गेला.

नमिताचे आई-बाबा थक्क होऊन त्याच्याकडे बघतच बसले.


"काय हा मुलगा एका श्वासात सगळं बोलून गेला. आपण आहोत इथे याचेही भान नाही याला." नमिताची आई बोलली.

त्याचं बोलून झालंच होतं की पायल तिथे आली.

पायलने नमिताच्या आईला बाजूला नेलं आणि तिला सगळी परिस्थिती सांगितली. नमिताच्या आईने नमिताच्या बाबांना सगळं सांगितलं. दोघांनी त्यांच्या नात्याला संमती दिली. पण आता नमिता अजून काहीच बोलली नव्हती.

पारस नमिता समोर जाऊन उभा राहिला.

"नमिता आय लव यू, आय लाईक यू सो मच, लग्न करशील माझ्याशी?"

नमिता रडायला लागली.

"नाही पारस हे शक्य नाहीये."

"का का शक्य नाहीये?"

"आई-बाबा तुम्ही तरी सांगा ना याला, हे शक्य नाहीये."


"नमिता तो प्रेम करतोय तुझ्यावर." बाबा नमिताजवळ जाऊन बसले, तिच्याखांद्यावर हात ठेवत बोलले.


"बाबा तुम्हालाही माहिती आहे, याला काहीच अर्थ नाहीये. याला काहीच अर्थ नाही." असं म्हणत नमिता रडत रडत बाहेर निघून गेली.

क्रमशः

🎭 Series Post

View all