तेरा साथ हो तो (जलद कथा) भाग 4

Story Of Strong Bond


तेरा साथ हो तो
भाग ४
नीलमची किचन मध्ये रात्रीच्या जेवणाची गडबड होती , कुकरच्या शिट्या वाजत होत्या ..
देवाला दिवा लागला होता , तुळशीत दिवा लागला होता .. मुलं त्यांचा त्यांचा होम वर्क करत होती .
परेश " नीलम .."
नीलम " बोला .. चहा टाकलाय .. तुम्ही फ्रेश होऊन या."
परेशकडे बघायला तिला वेळ नव्हता .. ती पीठ मळतानाच बोलली
परेश थोडासा नाराज होऊन बेडरूम मध्ये गेला .. आता रेड रोजेस आणलेत ते तिला कसे देऊ ? कधी देऊ ? ह्याचे उत्तर शोधत बेडरूम मध्ये गेला ..
जेवणं झाली .. मुलं झोपली .. आणि मग नीलम झोपायला आली
परेश मुद्दामून लॅपटॉप चालू करून त्यावर काम करायचे नाटक करत होता ..
नीलम " आज अजून झोपले नाहीत का ?\"
परेश " नाही .. तुझीच वाट बघत होतो ."
नीलम हसलीच " काही बोलायचंय का ?"
परेश " तू रागावलीस का माझ्यावर ? तुला ट्रीपला नाही म्हटलो म्हणून ?"
नीलम " नाही .. तसेही मला पण बोअर होतं ? पण हे लोकेशन माझे आवडीचं लोकेशन आहे .. म्हणून जायचं होते खरतर .. ठीक आहे .. आपण मे महिन्यात मुलांच्या सुट्टीत जाऊ तिकडे. "
परेशने लॅपटॉप बाजूला साईड टेबल वर ठेवला .. आणि तिला हात केला .. ती पण त्याच्या जवळ गेली .. बसल्या बसल्याच तिला मिठीत घेतले त्याने आणि कपाळावर ओठ ठेवले.
परेश " नक्की .. मे महिन्यात त्या लोकेशन ला आपण जाऊ .. थँक्स माझे ऐकल्या बद्दल."
नीलम " हमम .. झोपा आता .. उगाच लाडीगोडी नको."
परेश गालातच हसला " लगेच पकडतेस मला .. मी तुझ्यासाठी आज काहीतरी गिफ्ट आणलंय."
नीलम " काय ?"
परेश " मला रिटर्न गिफ्ट मिळाले पाहिजे पण "
नीलम " गपा हो .. द्या ना .. काय आणलंय " एकदम लहान मुलांसारखी उत्साहित झाली ती .
त्याने मागे लपवलेला रेड रोज चा गुच्छ तिच्या पुढे पकडला
परेश " टू माय ब्युटीफुल अँड लव्हली वाईफ " अगदी नाटकं करत तिला म्हटला
आणि तिने तो रेड रोजचा गुच्छ खूप आनंदात घेतला .. तिला नुसता गुच्छ गिफ्ट मिळाला तर इतकी खुश होती .. डोळे आनंदाने ओले झाले तिचे
परेश " अरे .. रडायचं काय त्यात .. नाही आवडले का ? "
नीलम " आज काय आहे माहितेय का ? "
परेश " काय आहे ?"
नीलम " आज रोज डे आहे. "
परेश " तरीच .. जिकडे तिकडे रेड रोज विकायला होते .. मला माहित नव्हतं ."
नीलम " थँक यु ."
परेश " नुसतं थँक यु वर नाही चालणार मॅडम ."
नीलमने मोबाईल मधून त्या गुलाबाच्या गुच्छाचा तिच्या बरोबर एक सेल्फी घेतला आणि तिच्या कीटी च्या ग्रुपवर टाकला . सकाळी जसे थडथड तिला जसे मेसेज आले तसे आत्ताही येऊ लागले.
सो रोमॅंटिक .. ग्रेट .. स्टील इन डीप लव्ह वगैरे वगैरे..मैत्रिणी कौतुक करत होत्या तिचे आणि तिच्या नवऱ्याचे .. आणि इकडे रोजेस जेवढे रेड होते ना तेवढेच रेड तिचे गाल झाले होते ..
परेशने तेवढ्यात लॅपटॉप वर गाणे लावले " तेरा साथ हैं तो मुझे क्या कमी है !!....
नीलम " आज काय मूड एकदम वेगळाच आहे .. गाणे वगैरे लावलेत ?"
परेश " मघाशी येत होतो ना तेव्हा एफ एम वर ऐकले आणि मला तुझी खूपच ओढ लागली .तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये . आय जस्ट वॉन्ट यु टू बी बाय माय साईड फॉरेव्हर .. एक दिवस सुद्धा मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय .. म्हणून मी नाही म्हटलो ट्रिपला ."
नीलम " थँक यु .. " भरल्या डोळ्यांनी ती त्याच्या मिठीत गेलीआणि तो तिला मिठीत घेऊन त्याचे रिटर्न गिफ्ट हक्काने घेऊ लागला .
समाप्त !!

🎭 Series Post

View all