तेरा साथ हो तो... भाग 3(ऋतुजा)

Katha tyachy tyagachi


तेरा साथ हो तो...भाग 3
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर

पारसने नमिताची मैत्रीण पायल तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. कॉलेजमध्ये तिला भेटला,

"बोल काय बोलायचं होतं तुला माझ्याशी?"

"पायल नमिता अशी का वागते? तू बघितलस ना ती तर माझ्याशी छान वागायची, छान बोलायची पण आता काय झाले तिला, दोन-तीन दिवस तर तिने मला टाळलं आणि आता मी तिच्याशी बोलायला गेलो तर ती बोलली की आपली मैत्री इथेच थांबवायची.  ती का अशी वागत असेल गं?

हे बघ पायल मला माहिती आहे तू एकच तिची जवळची मैत्रीण आहेस, तुला सगळं माहिती आहे, मला खरं खरं सांग नमिता अशी का वागते? काय कारण आहे की ती माझ्याशी अशी वागतीये? त्रास होतोय ग मला याचा, खूप त्रास होतो. कारण मी मैत्री करतो तर मनापासून करतो. आपल्या माणसांना जोडतो तर मनापासून. त्यांच्यासाठी मी सगळं काही मनापासूनच करतो. मी नमिता सोबत मनापासून मैत्री केली होती. तिला आपलं जवळचं मानलं होतं, मग ती अशी का करते?"


"हे बघ पारस त्याला तशी कारणही आहेत आणि मला असं वाटतं की ती कारणे तुला जाणून घेणे गरजेचे नाहीये."

"असं का बोलतेस? का जाणून घेणे गरजेचे नाहीये. हे बघ पायल तुला नमिताची शपथ मला खर काय ते सगळं सांग."


"ठीक आहे, तुझ्यात ऐकण्याची ताकद असेल तर ऐक मग. नमिताला कॅन्सर आहे ती लास्ट स्टेजवर आहे. तिच्याकडे काही महिनेच आहेत आणि तुला माहितीये ती तुझ्यापासून दूर का जाते कारण तिला तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम जाणवलं, तिला कळलं की तू तिच्यावर प्रेम करायला लागला आहेस. जरी तू बोलला नसलास ना तरी तिला तुझ्या मनातल्या भावना कळल्या. तिला दुखवायचं नाहीये म्हणून ती तुझ्यापासून दूर होतेय, कळलं तुला."

हे सगळं ऐकून पारस तिथेच थबकला, तो अगदी स्तब्ध झाला. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबून आले, त्याला काय बोलावं कळतच नव्हतं.

"पारस काय झालं? पारस..."

पायलने त्याला दोन-तीन आवाज दिला,

"आता मला तुला एक विचारायचं आहे."

"बोल.."

"तू नमिता वर खरंच प्रेम करतोस?"

पारस काहीच बोलला नव्हता, तो गप्पच होता.

"बोल पारस तू नमितावर प्रेम करतोस ना?"

पारसने होकारार्थी मान हलवली.

"मग जा तिच्याकडे आणि सांग की तुझं तिच्यावर प्रेम आहे, तिला भरपूर प्रेम दे आणि तिच्या आयुष्यातले हे शेवटचे दिवस आनंदाने फुलवून दे,जा पारस जा.."

क्रमशः

🎭 Series Post

View all