तेरा साथ हो तो...भाग 2(ऋतुजा)

Katha tyachya premachi


तेरा साथ हो तो...भाग 2
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
©®ऋतुजा वैरागडकर

पारस नमिताशी रोज बोलायला लागला, हळूहळू त्यांच्यात मैत्री फुलायला लागली. दोघेही कॉलेज संपल्यानंतर कँटीनमध्ये बसून तासनतास गप्पा मारायचे. काही दिवसानंतर नमिताच्या लक्षात आलं की पारसच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे, ते तिला त्याच्या डोळ्यात बघून जाणवत होतं. म्हणून नमिताने त्याच्यापासून दूर राहण्याचं ठरवलं. पारस जवळ आला की ती त्याच्यापासून दूर जायची. काहीतरी कारण सांगून तिथून निघून जायची. नमिता आपल्याला टाळत आहे हे पारसच्या लक्षात आलं.

एक दिवस कॉलेज संपल्यानंतर पारस नमिताकडे गेला,


"हाय नमिता.." तो फारच खूप उत्साहाने बोलला.

"हाय." नमिता तितकेच कोरडेपणाने बोलली.

"काय झालं नमिता? माझं काही चुकलं का? माझ्यावर रागावली आहेस का?" त्याने काळजीने विचारलं.

"नाही."

"अग मग बोलत का नाहीस माझ्याशी? का दुर दुर पळतीयेस? काय झालं? तुझ्या मनात काय आहे? का माझं काही चुकलंय, असेल तर बोल. पण असा अबोला करू नकोस गं. बोल ना काही चुकलंय का माझं?"


"हे बघ पारस, मी मिडलक्लास मुलगी आहे, माझे जास्त मित्र मैत्रिणी पण नाहीत, मला जास्त कोणाशी बोलायला नाही आवडत, मला असं वाटते आपण आपली मैत्री इथेच थांबवावी. उगाच आपण आता बोलायला नको."

"अग पण असं काय करतेस तू? आपण फक्त जस्ट फ्रेंड आहोत ना?"

"हो, पण फ्रेंड आहोत तोवर ठीक आहे त्या समोरचं काही नातं नकोय मला."

"नमिता का असा विचार करतेस? अग आपली मैत्री तर निखळ आहे ना आणि सगळ्यांना माहिती आहे."


"पण पारस आय एम सॉरी यानंतर आपण भेटायचे नाही आणि बोलायचे नाही, तू विसर की तुला नमिता नावाची कोणती मैत्रीण होती. माझ्यासारख्या बराच मैत्रिणी मिळतील तुला. माझा एकच मित्र होता, मनातून तो माझा मित्रच राहील याआधी माझा कोणी मित्र नव्हता आणि यानंतरही नसेल."  बोलताना नमिताचे डोळे भरून आले आणि तशीच तिथून ती जड पावलांनी निघून गेली

पारस मात्र विचार करत राहिला,

"नमिता अशी का वागली असेल? काय कारण असेल? की तिने मला दुरावलं." त्याच्या मनात नकारात्मक विचार घोळत होते.


क्रमश:

🎭 Series Post

View all