तेरा साथ है तो भाग ५

This Is A Love Story


भाग 5

आशिन नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आला. स्वराने मात्र आशिनला मेल पाठवून दोन दिवसांची रजा मागितली होती आणि आशिनने ही ती मंजूर केली होती. दोन दिवस कापरासारखे उडून गेले. आज स्वरा ऑफीसमध्ये आली. ती तिच्या केबीनमध्ये निघाली होती की तिला कसला तरी बॉक्स प्युवून घेऊन जाताना दिसला. त्याच्या मागे दिक्षा होती. तिने दिक्षाला थांबवले आणि विचारले.

स्वरा,“ काय ग दिक्षा? कोणी ऑफिस सोडून जात आहे का? प्युवून कसलेसे बॉक्स घेऊन जात आहे.” ती विचारले.

दिक्षा,“ आशिन सर ऑफिस सोडून जात आहेत. त्यांनी त्यांची ट्रान्स्फर दुसऱ्या ठिकाणी करून घेतली आहे.” ती म्हणाली.

स्वरा,“ काय?पण का?” ती जवळ जवळ किंचाळलीच.

दिक्षा,“ इतकं किंचाळायला काय झालं तुला? आणि असं ही तुला काय फरक पडतो ते असले आणि नसले तरी? तुझं तर प्रेम पण नाही त्यांच्यावर?”

स्वरा,“ तू गप ग! कुठं आहे तो?”तिने रागानेच विचारले.

दिक्षा,“टॅक्सी थांबली आहे खाली ते समान भरत आहे त्यांचे!” ती बेफिकिरपणे म्हणाली.

तीच बोलणं स्वराने अर्धवटच ऐकले आणि ती लिफ्टमध्ये गेली खाली जाऊन पाहिले तर आशिन प्युवूनकडून समान घेत होता. तिने आशिनचा हात धरला आणि त्याला काहीच न बोलता ती जवळजवळ ओढतच त्याला घेऊन लिफ्टमध्ये घुसली. तो काही बोलणार तर तिने डोळे वटारून त्याच्या ओठांवर बोट ठेवले. ती लिफ्टमधून त्याचा हात धरून त्याला तिच्या केबीनमध्ये घेऊन जाऊ लागली. सगळे जण उभे राहून त्या दोघांना पाहत होते. पण तिचे कोणाकडेच लक्ष नव्हते. तिने त्याला केबीनमध्ये नेले आणि दार लॉक केले. आशिन तिला पुन्हा काही बोलणार तर ती त्याच्यावर गरजली.

स्वरा,“ कुठे निघाला आहेस तू?”

आशिन,“ तुला काय करायचे?” तो काहीसा बेफिकिरपणे म्हणाला आणि ती अजूनच चिडली.

स्वरा,“ मला नाही करायचे तर कोणाला करायचे आहे रे?सांगतो का आता?” ती पुन्हा रागाने ओरडली.

आशिन,“ मी इथे काम नाही करू शकत आता कारण तुलासमोर पाहून मला त्रास होईल. एक तर तुझं माझ्यावर प्रेम नाही पण माझं तर आहे ना! उगीच तुला ही आणि मला ही त्रास कशाला ना!” तो तोंड वाकडं करत म्हणाला.

स्वराने मात्र त्याला भिंतीच्या कोपऱ्यात ढकलले आणि सँडेल काढून त्याच्या पायांवर उभी राहिली. त्याचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि त्याच्या ओठांचा ताबा घेतला. तो ही तिच्यात विरघळत राहिला आणि मध्येच तिला ढकलत ओरडला.

आशिन,“आsss! स्वरा चवतेस काय ग! बघ रक्त आलं.” त्याने खिशातला रुमाल काढून त्याच्या खालच्या ओठाला लावला.

स्वराने मात्र त्याच्या कमरेला मिठी मारली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत बोलू लागली.

स्वरा,“ सॉरी ना! मी मुर्ख! मी डंबो! मला खरंच काही कळत नाही. प्लिज मला सोडून जाऊ नको. बीकॉज आय लव्ह यू!” ती रडत बोलत होती.

आशिन,“ खरंच का?”त्याने विचारले.

स्वरा,“ आता काय स्टँप पेपरवर लिहून देऊ का?” ती मानवर करून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

आशिन,“ तयार करून घेतो स्टँप पेपर तुझा काही भरवसा नाही आणि असं करतात का किस? किती जोरात चावलीस मला चावरी मांजर!” तो हसून तिच्या भोवती हाताचे घट्ट कडे करत म्हणाला.

स्वरा,“ शिक्षा आहे ती तुला!आता परत ट्रान्स्फर कशी करून घेणार?” तिने स्वतःला सोडवून घेत त्याच्यासमोर उभे राहत विचारले.

आशिन,“ माझी कधी झाली ट्रान्स्फर? मी तर टॅक्सीत जुन्या फायलींचे बॉक्स ठेवून प्युवूनला हेड ऑफिसला पाठवत होतो.”

स्वरा,“ म्हणजे ती दिक्षा मला खोटं बोलली तर? एक मिनिटं तुमच्या दोघांचा ही प्लॅन तर नव्हता ना हा?” तिने संशयाने विचारले.

आशिन,“ हो!” तो डोळे मिचकावून म्हणाला.

स्वरा,“ तिला आता सांगतेच थांब.” ती लटक्या रागाने म्हणाली.

आशिन,“ तिला चावू नकोस म्हणजे झालं? (तो तिला जवळ ओढत तिच्या कानात म्हणाला आणि स्वरा भानावर आली. आपण काय केले हे तिच्या लक्षात आले आणि तिची मान लाजेने खाली झुकली.) आता लाज वाटते तुला?” त्याने हसून तिचा चेहरा हनुवटीला धरून वर करत विचारले.

स्वरा,“ आशु प्लिज ना!” ती त्याला लाजून बिलगत म्हणाली.

आशिन,“हुंम ss बरं मी जातो. आपल्या कामाचे ठिकाण आहे हे रोमान्सचे नाही. आज संध्याकाळी माझ्या फ्लॅटवर ये! मी जातो मिटिंग बोलावली आहे केबीनमध्ये, मार्च एंडिंग आहे मॅडम; आता या मिटिंगला!” तो म्हणाला आणि निघून गेला.

त्याला बाहेर पडताना पाहून सगळा स्टाफ एकमेकांमध्ये दोघांबद्दल कुजबुजत होता.थोड्याच वेळात सगळे त्याच्या केबीनमध्ये आले त्यांच्यात दिक्षा आणि स्वरा देखील होती.

आशिन,“ मार्च एंडिंगमुळे आपला वर्क लोड थोडा वाढणार आहे तर सगळ्यांनी प्रत्येकाचे एन्युअल रिपोर्ट तयार करायला लागा…. ” तो पुढे बोलतच राहिला.

सगळ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या पण त्याला पाहून सगळे एकमेकांना खुणावत होते. अजयने न राहवून विचारलेच.

अजय,“ सर ओठाला काय झालं तुमच्या?”त्याने विचारले आणि स्वरा गालात हसायला लागली.

आशिन,“ काही नाही मी केबीनमध्ये काम करत होतो. एक मोठ्ठी मधमाशी घोंघावत आली आणि बरोबर माझ्या ओठाला चावली.” तो स्वराकडे तिरकस पाहत बोलत होता. स्वराने त्याचे बोलणे ऐकले आणि त्याच्याकडे डोळे वटारले.

दिक्षा,“ पण सर इतक्या वर ते ही तुमच्या केबीनमध्ये मधमाशी आली कुठून?” तिने निरागसपणे विचारले आणि जवळच उभ्या असलेल्या स्वराने तिच्या पायावर जोरात पाय दिला. तशी दिक्षा कळवळली आणि तिला पाहून गालात हसली.

आशिन,“ काय तू पण दिक्षा? हे बघ खिडकी उघडी आहे. त्यातून आली मधमाशी आणि त्यांना काय वर आणि खाली! बरं सगळं कळलं ना तुम्हाला अजून काही शंका नसेल तर जाऊ शकता.” तो म्हणाला आणि सगळे निघून गेले.

थोड्याच वेळात आशिनच्या व्हॉट्स अपवर मेसेज आला. मेसेज स्वराचा होता.

“ मधमाशी खूपच मोठ्ठी होती वाटतं!” आणि त्याबरोबर हसणारे स्मायली होते. तिचा मेसेज वाचून आशिनच्या चेहऱ्यावर हस्याची लकेर उमटली आणि त्याने रिप्लाय दिला.

“ हो खूप मोठ्ठी होती. तू संध्याकाळी भेट तुला सांगतो किती मोठ्ठी होती ते!”तिने मेसेज वाचला आणि त्याला पुन्हा हसणारे इमोजी पाठवून दिले.

त्यानंतर दोघे ही कामात गढून गेले. संध्याकाळी ऑफिस सुटले. आशिन ही घरी गेला पण तो आतुरतेने स्वराची वाट पाहत होता. त्याने कॉफी आधीच करून थर्मासमध्ये भरून ठेवली होती आणि तिच्या आवडत्या पेस्ट्रीज मागवून ठेवल्या होत्या. तिच्या आवडीचा डिनर देखील त्याने ऑर्डर करून ठेवला होता. दाराची बेल वाजली आणि त्याच्या हृदयाची धडपड वाढली. त्याने दार उघडले समोर स्वरा उभी होती. तो तिला न्याहाळत होता. तिने पिच कलरचा लॉंग टॉप आणि लेनिंग घातली होती. काखेत पर्स होती. लांब केसांची सागरवेणी,कानात नाजूक टॉप्स, मेकअप वगैरे काहीच नव्हता. तो भान हरपून तिला पाहत होता आणि स्वरा त्याला चुटकी वाजवून म्हणाली.

स्वरा,“ इथंच उभी राहू का मी?”तिच्या बोलण्याने तो भानावर आला आणि म्हणाला.

आशिन,“ ये ना आत!”तो स्वतःची चूक लक्षात येऊन कुसनुस हसत म्हणाला.

स्वरा आत येऊन सोफ्यावर बसून फ्लॅट न्याहाळत होती.छोटासा वन. बी.एच.के. फ्लॅट पण अगदी टापटीप होता.आशिनने तिच्या हातात गरम कॉफीचा मग दिला आणि समोर एका डिशमध्ये तिची आवडती पेस्ट्री ठेवली. त्याच्या हातात देखील कॉफी मग होता. दोघांनी कॉफी घेतली दोघे ही एकमेकांशी काहीच बोलत नव्हते फक्त एकमेकांना पाहत होते. आशिनने सगळं किचनच्या बेसिनमध्ये ठेवले आणि तो सोफ्यावर बसत तिलाजवळ ओढून बोलू लागला.

आशिन,“एक तर चूक केलीस तू आणि वरून शिक्षा दिली मलाच ना? त्याचा बदला घेणार मी!” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

स्वरा,“ सॉरी ना! मी रागात होते रे म्हणून; तुला खूप दुखतंय का? त्यात गरम कॉफी कशी पिलीस?” ती काळजीने त्याच्या ओठावर बोट फिरवत बोलत होती.

आशिन,“मग आयुष्यभर काय मला ही चावरी मांजर टॉलरेट करावी लागणार का?” तो तिच्या ओठावर हात फिरवत म्हणाला.

स्वरा,“हो आणि सगळ्यांच्यासमोर तर म्हणालास की मोठ्ठी मधमाशी चावली.” ती हसून म्हणाली.

आशिन,“ मग काय सांगणार होतो मी?ऑफिसमध्ये होतो म्हणून तुला सोडलं पण आता नाही सोडणार.” असं म्हणून त्याने तिच्या ओठांचा ताबा मिळवला. दोघे ही बराच वेळ एकमेकांमध्ये विरघळत राहिले. स्वराने स्वतःला आशिनपासून सोडवून घेतले आणि ती त्याच्या खांद्यावर विसावली.

स्वरा,“ खरंच सॉरी आशु! मी तुला खूप त्रास दिला.”

आशिन,“ हा साक्षात्कार तुला लवकर झाला की! यू डंबो! तुझ्या मनात हा न्यूनगंडाचा कचरा कुठून भरला ग? म्हणे तू त्याला शोभत नाही. कुठे तो? कुठे मी? वगैरे वगैरे! मॅडम स्वतःला जरा नीट आरशात पहा एकदा! यू आर सो ब्युटीफुल! परवा पार्टीत सेंटर ऑफ एट्रॅक्शन तुम्हीच होता मॅडम! गोरा-गोमटा रंग आणि चाफेकळी नाक म्हणजेच सौंदर्य असं काही नाही.मी तर तुला फक्त पाठमोरी पाहूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. त्यादिवशी इंटरव्ह्यूवला आली होतीस आणि पडणार होतीस. मी तुला सावरणार तर तूच स्वतःला सावरलेस. ती पाटीवर रुळणारी नागिणीसारखी जाड वेणी, नागमोडी चाल आणि मी मिस सांभाळून चला म्हणल्यावर तो मागे वळून टाकलेला जळजळीत नेत्र कटाक्ष! हाय हाय कलेजा खल्लास झाला माझा! तेंव्हाच ठरवून टाकलं हीच तिखट मिरची हवी आपल्याला तर!” तो तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता.

स्वरा,“अच्छा! आणि तुला किंवा मला दोघांपैकी एकालाच नोकरी मिळाली असती तर? मग कुठे शोधणार होता मला?” तिने कमरेवर हात ठेवून त्याला पाहत विचारले.

आशिन,“ मी काय तुझ्यासारखा वेडा आहे का? माझ्या चार्मचा वापर करून मी तिथल्या रिसेप्शनिष्टशी मैत्री केली होती. तिने मला दिला असता तुझा पत्ता!पण सुदैवाने दोघांना ही एकाच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली पण मला वरची पोस्ट आणि तुला खालची पोस्ट! मला वाटलं होतं तू नाराज होणार म्हणून तुझी परीक्षा घ्यायला मी तुला ट्रीटसाठी बोलावले आणि तुझ्या मनाचा मोठेपणा पाहून अजूनच तुझ्या प्रेमात पडलो.”

स्वरा,“ बराच आतल्या गाठीचा निघालास की तू तर? मी आपलं मित्र मित्र म्हणत राहिले आणि तू! बट यू नो आय लव्ह यु!” ती त्याला बिलगत म्हणाली.

आशिन,“ हो का म्हणजे मी तुला आवडलो नव्हतो का कधी?” त्याने विचारले.

स्वरा,“ खरं सांगू तुला दुसऱ्या राऊंडला मी निरखून पाहिले आणि पाहतच पाहिले.उंचापुरा, उभट चेहऱ्याचा नाकी-डोळे नीटस पण डोळे मात्र विलक्षण होते काळेभोर पाणीदार जणू काही आत्ताच सुरमा लावला आहे असे! सावळ्या रंगाचा, कुरळ्या दाट पिंगट केसांचा हँडसम तू!मला आवडला होतास पण मला वाटले ….” ती पुढे बोलणार तर त्याने तिचे बोलणे मध्येच तोडले आणि बोलू लागला.

आशिन,“ की मी तुझ्या आवाक्या बाहेरचा आहे वगैरे वगैरे…. बेक्कल कुठली!” तो पुढे बोलणार तर स्वरा रागाने त्याच्या मांडीवर बसून त्याची कॉलर धरून बोलू लागली.

स्वरा,“ ये ऐकून घेतेय म्हणून उगीच जास्त शेफारु नकोस काय? किती वेळ झालं मला डंबो, मूर्ख, बेक्कल म्हणत आहेस. हो मला तू आवडला होतास पण मी त्या तुझ्या फुलपाखरांसारखी नाही कोणाच्या मागेपुढे पिंगा घालणारी!” ती रागाने बोलत होती आणि तो हसून तिला मिठीत घेत म्हणाला.

आशिन,“ उफ्फ उफ्फ मिरची यार म्हणूनच तर मी फिदा झालो ना स्वरू! लव्ह यू!”

स्वरा,“ लव्ह यू टू!” ती त्याच्या मिठीत विसावली.

आशिन,“ स्वरा बास झाले. मी स्वतःला कंट्रोल करू नाही शकणार.” तो तिला दूर करत गंभीर होत म्हणाला.

स्वरा,“माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर तर इथे कंट्रोल करण्याचा प्रश्न येतोच कुठे?” ती त्याच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाली आणि त्याच्या शरीरातून एक विजेचा लोळ गेला.

आशिन,“ इतका विश्वास माझ्यावर? तरी ही हे सगळं लग्नानंतर! लग्नानंतर एक्साईटमेंट नाही राहणार ग माझी चावरी माऊ!” तो तिच्या कपाळावर ओठ टेकत म्हणाला.

स्वरा,“ सात-आठ महिने झालं ओळखते तुला! तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे. बरं मी निघते आता उशीर झाला आहे.” ती म्हणाली.

आशिन,“ इतक्यात कुठे? मी जेवणाची ऑर्डर दिली आहे आणि मी सोडायला येतो तुला! घर पाहून घे इथेच राहायचं आहे तुला किमान काही दिवस तरी आपलं स्वतःच घर घेई पर्यंत!” तो तिचे विस्कटलेले केस हाताने नीट करत बोलत होता.

स्वरा,“ बरं पण आशिन तुझ्या घरच्यांना मी पसंत पडेन ना?”

स्वराला वाटणारी भीती आणि शंका रास्त होती. त्यावर आशिन काय उत्तर देणार होता आणि त्याच्या घरची लोकं कशी असतील?
क्रमशः
©swamini chougule
★★★

🎭 Series Post

View all