तेरा साथ है तो भाग १३(अंतिम)

This Is A Love Story



आशिन मात्र स्वराचे हे बोलणे ऐकून पुरता हदरला होता. माणूस बऱ्याचदा आपल्या प्रिय व्यक्तीला रागाच्या भरात खूप काही बोलून मोकळा होतो पण समोरच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार न करता माणूस बोलून जातो. आशिनने देखील तीच चूक केली होती. त्याने स्वराला रागाच्या भरात माझ्या आयुष्यातुन वजा हो असे सांगितले होते आणि त्याचे तेच बोलणे स्वराच्या जिव्हारी लागले होते. त्यातून ती आत्महत्या करणार होती. पण सुदैवाने अचानक थांबली होती. स्वरा आशिनला तेच सांगत होती आणि ती अचानक बोलायची थांबली आणि आशिन बोलू लागला.

आशिन,“ तू वेडी आहेस का स्वरा? आय एम सॉरी गं! मी खरंच चुकलो पण त्यासाठी तू इतके टोकाचे पाऊल उचलणार का? मूर्ख आहेस का तू? माफ कर मला! तू असं काही केलंस तर मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय तुला कळत कसं नाही. तू माझा प्राण आहेस. मी कशी माफी मागू तुझी म्हणजे तू मला माफ करशील?”तो पुन्हा रडत बोलत होता.

स्वरा,“ आशु प्लिज ना तू शांत हो ना रे! आणि प्लिज अजून किती माफी मागणार माझी? नको ना माफी मागू मी तुला माफ केले. मला माहित होतं की तुझं माझ्यावर प्रेम आहे पण इतकं असेल याची कल्पना नव्हती मला; की तू जीव द्यायला निघशील!” ती त्याचे डोळे पुसत म्हणाली.

आशिन,“ सुसाईड नोट लिहलीस आणि पुढे काय झाले?” त्याने विचारले.

स्वरा,“ दोन दिवस झालं मला अस्वस्थ वाटत होतं. आज उलट्या ही झाल्या.मग अचानक लक्षात आले की दीड महिना झालं मला पिरियड्सच आले नाहीत. मला शंका आली म्हणून मी प्रेग्नन्सी किट मागवून घेतले आणि टेस्ट केली.” ती सांगत होती.

आशिन,“ काय? तुला बरं वाटत नाही आणि तू मला सांगितले सुद्धा नाही ! अग पण आपण तर प्रिकॉशन घेतो ना? कारण आपल्याला अजून थोडे दिवस बाळ नको आहे म्हणून?” त्याने तिला पाहत विचारले.

स्वरा,“ डंबो प्रत्येक वेळीच आपण प्रिकॉशन घेतोच असं नाही ना! दीड महिन्यांपूर्वी साहेब तुम्ही रात्री लॅपटॉपवर काम करता करता मूडमध्ये आला होतात आठवा जरा आणि मग!” ती लाजून त्याच्या कुशीत शिरली.

आशिन,“ हुंम मग टेस्टचा रिझर्ट काय आला मॅडम?” त्याने तिला हसून विचारले.

स्वरा,“ हे बघ!” तिने कॉर्नर पीसच्या ड्रॉव्हरमधून किटची पट्टी काढून त्याला दाखवली. त्याने ती पाहिली आणि तिला आनंदाने मिठी मारत म्हणाला.

आशिन,“ स्वरा तू आई आणि बाबा होणार आहे!( आणि अचानक तो गंभीर झाला.) स्वरा आज तू काही उलट सुलट केलं असतं तर मी काय करणार होतो? मी तर तुझ्या मागे आलो असतो पण त्या निरपराध जीवाला शिक्षा…. आय एम सो सॉरी मी नाही बोलणार तुला असं आणि वागणार देखील नाही तुझ्याशी असं.” तो आवंढा गिळत म्हणाला.

स्वरा,“आय एम अल सो सॉरी! मी प्रेग्नेंट आहे हे कळलं आणि सगळे विचार मागे पडले.” ती म्हणाली.

आशिन,“ हो पण तू सॉरी का म्हणत आहेस मला?” त्याने आश्चर्याने विचारले.

स्वरा,“ मी तुला समजून घ्यायला कमी पडले आशु! तुझ्याशी भांडत राहिले. शिल्पाचा फोन आला होता मला दुपारी; धनंजयला हार्ट अटॅक आला आहे. शिल्पा खूप रडत होती.” ती गंभीर होत म्हणाली.

आशिन,“ काय? अग वय तर आहे का त्याच? कसा आहे तो आता?” त्याने आश्चर्य मिश्रित काळजीने विचारले.

स्वरा,“ शिल्पा त्याच्याशी सकाळी भांडली. तो ऑफिसला गेला आणि ऑफिसच्या दारातच कोसळला. त्याला लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेले, शिल्पाला बोलावले तर डॉक्टरांनी सांगितले की त्याला अति ट्रेसमुळे मायनर हार्ट अटॅक आला आहे. आय.सी.यू मध्ये आहे तो. आता आउट ऑफ डेंजर असला तरी ऑब्जरव्हेशनमध्ये आहे अठ्ठेचाळीस तासांसाठी! मी हॉस्पिटलमध्ये येते म्हणाले तर नको म्हणाली मला! उद्या ये; आता एकटी नको येऊ. खूप रडत होती ती; धनंजय ही तुझ्यासारखाच मोठ्या हुद्यावर आहे. वर्कलोड आणि घरात वेळ देत नाही म्हणून सतत भांडण या सगळ्या ट्रेसमुळे त्याला इतक्या कमी वयात हार्ट अटॅक आला आणि क्षणार्धात तुझ्यावरच्या रागाची जागा तुझ्या काळजीने घेतली आशु! तुला ही वर्कलोड किती आहे. त्यातून एवढ्या मोठ्या घरासाठी काढलेले लोन आणि मी सतत तुला भांडत असते. तुला काही झालं तर? मी काय करणार आहे? आय एम सॉरी मी नाही भांडणार इथून पुढे तुला!” ती रडत म्हणाली आणि त्याच्या कुशीत शिरली.

आशिन,“ अरे तू भांडली नाहीस तर आयुष्य आळणी होईल ना माझं आणि मग हे सगळं इतकं भयंकर नाटक कशासाठी केलंस?” त्याने विचारले.

स्वरा,“ तुला धडा शिकवण्यासाठी! मला वजा हो म्हणालास ना तुझ्या आयुष्यातुन म्हणून! आणि मला पाहायचं होत जर खरंच मला काही झालं तर तू काय करू शकतोस?” ती त्याची कॉलर धरत म्हणाली.

आशिन,“ उफ उफ मिरची! चांगलाच तिखट झटका दिलास की मला आणि पाहिलं का मी काय करू शकतो ते?” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

स्वरा,“ हो पाहिलं ही आणि अनुभवलं ही! मीच मूर्ख आहे जर मला बाळाची चाहूल लागली नसती तर मी तर गेले असते की वर आणि तू आला असतास माझ्या मागे मला छळायला!” ती हसून म्हणाली.

आशिन,“ नालायक! मूर्ख ही हसण्याची गोष्ट आहे का? काय करायला निघाली होतीस तू?(तिच्या पोटावर हात ठेवत.) थँक्स बच्चा आज तुझ्यामुळे तुझी ही मूर्ख मम्मा थांबली. तू बरोबर वेळेवर तुझ्या असण्याची चाहूल हिला दिलीस. आता तुझा डॅड तुम्हा दोघांना ही जपेल. सॉरी बच्चा तुला त्रास झाला असेल ना?” तो डोळ्यात पाणी आणून बोलत होता.

स्वरा,“ बास आ अजून शिव्या मी नाही ऐकून घेणार तुझ्या! तू पण शहाणा नाहीस कळलं तुला? लगेच निघाला झोपीच्या गोळ्या खायला!” ती तोंड फुगवून म्हणाली.

आशिन,“ बरं सॉरी बाई इथून पुढे कानाला खडा! मी तुला काही बोलणार पण नाही आणि भांडणार पण नाही. उद्या गायनिककडे जाऊ आपण!आणि आई-बाबांना फोन करून बोलावून घेऊ. आता पायऱ्या चढ-उतर बंद. खालच्या बेडरूममध्ये शिफ्ट होऊ आणि उद्या धनंजयला ही पाहून येऊ.” तो बोलत होता.

स्वरा,“ हो मॅनेजर साहेब जशी तुमची आज्ञा! आशु तुझं ही उद्या चेकअप करून घेऊ, तुला किती त्रास झाला की आत्ता जाऊया हॉस्पिटलमध्ये?” तिने काळजीने त्याला विचारले.

आशिन,“ मी ठीक आहे ग!” तो तिला म्हणाला.

स्वरा,“ उद्या आपण तुझं चेकअप करून घेत आहोत कळलं तुला!” ती त्याला दम देत म्हणाली.

आशिन,“ बरं मॅडम! स्वरू दिवसभर जेवली नसशीलच तू? हो ना?” त्याने तिला पाहत विचारले.

स्वरा,“ नाही आणि तू न जेवता किती कप कॉफी गटकली आज?” तिने विचारले.

आशिन,“ मोजली नाही. बरं चल तुला आवडतात म्हणून गरम गरम समोसे, कचोरी, जिलेबी आणली होती आता सगळं गार झालं असेल. अरे देवा तो बघ गुलाब पण कोमेजून गेले आणि ही आजच्या दिवशीची भेट उघड बघ.” तो उठून बुके टेबलवर ठेवून तिच्या हातात गिफ्ट बॉक्स देत तिच्याजवळ बसत म्हणाला.

स्वराने गिफ्ट बॉक्स उघडला तर आत नाजूक ब्रेसलेट मंगळसूत्र होते. त्याने ते तिच्या हातात घातले.

स्वरा,“ थँक्स!” ती म्हणाली आणि त्याच्या ओठांचा ताबा घेतला. थोड्याच वेळात मात्र आशिन ओरडला.

आशिन,“ आ ss स्वरा पुन्हा चावलीस ना मला! चावरी मऊ कुठली! आपल्या बच्चाला शिकवू नकोस चावायला म्हणजे झालं.” तो तिला मिठीत घेत म्हणाला.

स्वरा,“ त्याला किंवा तिला कोणी पण असू दे दात आले की पहिल्यांदा तुला चावायला शिकवणार आणि ही शिक्षा होती सकाळी मला काय काय बोलला त्याची.” ती लाडीकपणे म्हणाले.

आशिन,“ बाळाला पण शिकवणार तुझ्यासारखं चावायला मग दोघे मिळून चावून चावून मारणार वाटतं मला!चला आता भूक लागली नाही का? तुझ्याबरोबर माझा बच्चा पण उपाशी आहे.आत्ता समोसे खा थोड्या वेळाने खिचडी करतो भाताची!” तो तिला उठवून घेऊन जात म्हणाला.

स्वरा,“ अरे वा! असं कसं मरू देणार ना तुला? तू तर माझा जीव आहे फक्त त्रास देणार.” ती त्याचे केस विस्कटत हसून म्हणाली आणि आशिनने हसून नुसती मान हलवली.

लग्नानंतर नवरा बायकोच्या नात्यात समंजसपणा आवश्यक आहे. मग लग्न लव मॅरेज असो की अरेंज! स्वरा आणि आशिनचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते पण दोघे ही एकमेकांना समजून घेण्यात कमी पडत होते. त्यातून आशिन स्वराला नाही नाही ते बोलला आणि स्वरा आत्महत्येच्या घातक निर्णयापर्यंत पोहोचली पण या घटनेला दुसरी बाजू ही होती ती म्हणजे आशिनची कामाचा ट्रेस आणि सतत भांडण यामुळे त्याच्या तब्बेतीवर विपरीत परिणाम होऊ शकला असता. स्वराला मात्र याची जाणीव शिल्पाच्या फोनमुळे झाली आणि तिचे डोळे उघडले.

तर कशी वाटली तुम्हाला आपल्या आशिन-स्वराची लव्ह स्टोरी?

आवडली असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. आपल्या इरा पेजवर तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आमच्यासाठी खूप अमूल्य आहे.
समाप्त
©swamini chougule
★★★★


🎭 Series Post

View all