तेरा साथ है तो भाग १२

This Is A Love Story


भाग 12

आशिन त्याच्या हातातले समान टाकून पळतच स्वराजवळ गेला. स्वरा बेडवर अस्थाव्यस्त पडली होती. बेडच्या एका बाजूला झोपेच्या गोळ्यांची बाटली अर्धी रिकामी पडली होती. त्याने स्वराला दोन्ही हाताने उचलून तिला मिठीत घेतले. तिचे मोकळे केस विखुरले होते. तो रडत बोलू लागला.

आशिन,“ स्वरा ss माझ्या एका चुकीची तू इतकी मोठ्ठी शिक्षा देऊ शकत नाहीस मला! आय एम रेअली व्हेरी सॉरी! स्वरा अगं उठ ना प्लिज!आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ चल तुला काही होणार नाही. तू मला असली जीव घेणी शिक्षा नाही देऊ शकत. मी तुला काही होऊ देणार नाही.” तो रडत बोलत होता आणि त्याचे लक्ष कॉर्नर टेबल वर फोटो फ्रेम खाली ठेवलेल्या चिठ्ठीवर गेले. त्याने एका हाताने स्वराला कुशीत घेतले आणि एका हाताने ती चिठ्ठी धरली तो चिठ्ठी वाचत होता.


प्रिय,
आशु

मला माहित आहे तुला माझा निर्णय पटणार नाही. तुला माझा खूप राग ही येईल पण मी आता हतबल झाले आहे. तू मला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार ही करू नकोस कारण तू येण्या आधीच सगळं संपलं असेल. मी खूप आधीच या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. तुला वाटेल की मी तुझ्याशी असं वागून तुला शिक्षा देत आहे पण तसं नाही ही शिक्षा मी स्वतःला करून घेत आहे कारण मीच कदाचित माझं बायको म्हणून कर्तव्य निभावण्यात कमी पडले असेन म्हणून तू आज मला म्हणालास की तुला माझ्याशी लग्न करून पश्चात्ताप होत आहे. मी तुझ्या आयुष्यातून वजा झाले तर बरं होईल.म्हणूनच मी तुझी इच्छा पूर्ण करत आहे.

तू मला म्हणशील की मी म्हणालो म्हणून तुला असं पाऊल उचलायची काय गरज होती? शिकल्या सवरलेली तू! तुला जर माझा राग आला असेल तर वेगळं व्हायच. कुठे ही नोकरी करायची आणि आयुष्यात पुढे जायचं पण खरं सांगू आशु तू माझं जग आहेस. तुझ्या भोवती माझं आयुष्य फिरते आणि आपल्याला आपलं जगच निघून जा म्हणत असेल तर माणूस कुठे जाणार ना? माझी तर माझ्या माहेरशी देखील नाळ केंव्हाच तुटली आहे. जे नातेवाईक आहेत ते तुझेच तर आहेत. त्यामुळे मी गेल्याने कोणाला फार काही दुःख होणार नाही आणि फरक देखील पडणार नाही.

हा तुला दुःख होईल.कारण तुझं प्रेम होतं ना माझ्यावर! जास्तीत जास्त तू थोडे दिवस वेडापिसा होशील पण घरच्यांच्या आधाराने सावरशील! मी म्हणाले होते ना तुला कोणाच्या जाण्याने कोणाचे जगणे थांबत नाही. तुझे ही थांबणार नाही. तू माझ्या जाण्यातून लवकर सावर आणि दुसरी छानशी मुलगी पाहून लग्न करून घे आणि सुखी हो! कदाचित आपली साथ इथं पर्यंत लिहिली होती. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी तुझी इच्छा पूर्ण करून जात आहे. तुझ्या आयुष्यातुन वजा होत आहे अगदी कायमची! आय लव्ह यू सो माच!

फक्त तुझी,
स्वरा.

आशिनने ती चिठ्ठी चुरगाळून फेकून दिली आणि तिला मिठी मारून तो रडत ओरडला.

आशिन,“ स्वरू तू माझ्याशी अशी वागू नाही शकत! मी सकाळी रागात बोलून गेलो गं! तू ते इतकं मनाला लावून घेशील असे वाटले नव्हते मला! तू इतकी मोठी शिक्षा दिली मला? का स्वरा? माझं तुझ्यावर प्रेम होतं नाही आहे अगदी जीवापाड आय लव्ह यू मोअर दॅन माय लाईफ! तू तर मला साधी माफी मागण्याची एक संधी सुद्धा नाही दिलीस! मी चुकलो पण त्याची अशी शिक्षा? वरून मला म्हणतेस की तू गेल्याने मला फक्त दुःख होईल आणि मी सावरेन! दुसरं लग्न करू आणि सुखी होऊ? मग तू मला नीट ओळखलं नाहीस स्वरा! मी तुला याच दिवशी एक वर्ष आधी म्हणालो होतो की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार! तर ती गोष्ट तू हसण्यावारी नेली होती पण आज हे मी सिद्ध करेन की माझं तुझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम आहे. तू नाहीस तर मी देखील नाही.”


तो असं म्हणाला आणि तिला अलगद बेडवर ठेवून तो खाली बसला. तिथे पडलेली गोळ्यांची बाटली त्याने हातात घेतली आणि त्यातल्या राहिलेल्या सगळ्या गोळ्या त्याने उलटवून मुठीत घेतल्या आणि तो सगळ्या गोळ्या तोंडात घालणार तर त्याच्या हातावर एक जोरदार फटका बसला आणि त्या फटक्याने त्यासगळ्या गोळ्या रूम भर उधळल्या गेल्या. त्याने आश्चर्याने वर पाहिले तर स्वरा उभी होती. त्याने तिला असं उभं राहिलेल पाहिलं आणि आवेगाने तिला मिठी मारली. तो तिला मिठी मारून लहान मुलासारखा हुंदके देऊन रडत होता आणि मधूनच

“ आय एम सॉरी!” म्हणत होता.

स्वराच्या ही डोळ्यातून अश्रू धारा बरसत होत्या. आशिन बराच वेळ रडत होता. स्वराने त्याला बेडवर बसवले. त्याला पाणी पाजले. तो थोडा शांत झाला तरी अधून मधून हुंदके देत होता. स्वराला आता त्याची काळजी वाटू लागली आणि ती त्याच्याजवळ बसत त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारले.

स्वरा,“ तू ठीक आहेस ना आशु?” तिने विचारले आणि त्याने तिचा हात रागाने झटकला. तो रागाने थरथरत म्हणाला.

आशिन,“ काय होतं हे सगळं? असं वागतं का कोणी? माझं चुकलं मला मान्य आहे की पण त्याची अशी जीव घेणी शिक्षा? तुला तसं पाहून माझं काय झालं असेल याचा एकदा तरी विचार केलास का तू? खरं तर ना मी स्वतःला खरंच संपवायला….” तो पुढे बोलणार तर स्वराने रागाने त्याचे तोंड जोरात दाबले. त्याने तिचा हात तोंडावरून झटकून दिला.

स्वरा,“ बास झाले. शांत हो आता! बघ तुझं अंग थरथरत आहे आशु! प्लिज शांत हो!” ती त्याला मिठी मारून काळजीने म्हणाली.

आशिन,“का वागलीस तू अशी माझ्याशी? माझं चुकलं स्वरा मी तुला रागात बोलून गेलो. मी तुला दिवस भर किती फोन केले एक फोन उचलला नाहीस माझा!” तो तिचा चेहरा थरथरत्या हातांनी ओंजळीत घेऊन तिच्या डोळ्यात पाहत विचारत होता.

स्वरा,“ हो मी सांगते सगळं तुला तू शांत हो ना आधी! किती थरथरतोयस तू? आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया का?”


ती त्याला काळजीने म्हणाली आणि त्याच्या थरथरत्या ओठांवर ओठ ठेवले.त्याचे वाढलेले श्वास आणि त्याच्या हृदयाचे वाढलेले ठोके तिला स्पष्ट जाणवत होते. तिने त्याला मिठी मारली. बराच वेळ दोघे ही एकमेकांच्या मिठीत विरघळत राहिले. आशिनला स्वराच्या अशा वागण्याचा खूप मोठा धक्का बसला होता. तो मनातून हादरून गेला होता. त्यामुळे कदाचित त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसत होता. स्वरा मात्र आशिनला अशा अवस्थेत पाहून घाबरली होती. तिच्या परीने ती त्याला शांत करण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करत होती. दोघे ही एकमेकांमध्ये विरघळून शांत झाले. आशिन ही थोडा शांत झाला. त्याचे श्वास आणि हृदयाची धडपड स्थिर झाली. स्वरा त्याच्या उघड्या छातीवर डोकं ठेवून प्रेमाने हात फिरवत होती. तो आता बराच शांत झाला होता. त्याने पुन्हा स्वराचा हात धरला आणि तिला विचारले.

आशिन,“ सांगती का आता?” तो पुन्हा रागाने ओरडत होता.

स्वरा,“ प्लिज आशु तू शांत हो ना! तुला त्रास होतोय. मी सांगते सगळं! तू भांडून निघून गेलास आणि मी रागाने धुमसत राहिले. बराच वेळ रडत राहिले. आज सहा मार्च आहे. तू विसरलास आजचा दिवस म्हणून ही तुझा मला खूप राग आला होता पण त्या ही पेक्षा तुझे बोलणे मला खूप लागले होते. ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम केले त्याला माझ्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय. त्याला मी त्याच्या आयुष्यात नको आहे हा विचारच मला सहन होत नव्हता म्हणूनच मी आत्महत्या करण्याचा विचार केला म्हणून सुसाईड नोट लिहली पण...” ती रडत बोलत होती.
स्वराने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता मग असे काय घडले की तिने तो निर्णय बदलला? शिल्पाच्या बाबतीत काय घडले असेल?
©स्वामिनी चौगुले
★★★

🎭 Series Post

View all