तेरा साथ हो तो... अंतिम भाग

कथामालिका


भाग/३

कविता नाराज होऊन खोलीत निघून गेली. तिच्या पाठोपाठ समीरही गेला.

"अहो, आता काय करायचं?" सरला

"आपण काहीही करायचे नाही. जे काही करणार ते समीरचा.सो वेट अँड वाॅच." दिनकरराव

कविता खूप नाराज झाली होती. त्यामुळे ती समीरशी दोन दिवस बोलली सुध्दा नाही आणि समीर सुध्दा तिच्याशी. बाबांच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण, त्याच्या ऑफीसमधल्या एका घटनेने त्याचे मन हेलावून गेले."

"दुसऱ्याच दिवशी नेमकं त्याच्या ऑफीसमधील एका मित्राचा अपघात झाला आणि त्या अपघातात कमरेखालच्या भागाला इजा झाली आणि त्याला कायमचे अपंगत्व आले. मग काय त्याची नोकरी गेली.
पण, त्यांची बायको हरली नाही. मोठ्या हिमतीने ती लढू लागली."

मग त्याच्या बायकोने नवऱ्याच्या कंपनीत नोकरीसाठी अप्लाय केला. कंपनीने त्याला बरीच मदत दिली. शिवाय तिला नोकरीही. त्यामुळे आज ती तिचा संसार पैलतीरावर नेला. एका उध्वस्त होणाऱ्या संसाराचा ती मजबूत कणा झाली. स्वतः चा नवरा मुले , सासु सासरे यांचा आधार बनली. ही गोष्ट समीरच्या काळजात घुसली.

दोन दिवसांनंतर...

"कविता तुझी परिक्षेची तयारी झाली का? मी तुझ्या पेपरच्या दिवशी सुट्टी काढली आहे. तेव्हा तयार हो आणि परीक्षेची तयारी कर."

"पण, समीर तुझा विरोध असतांना, तुझ्या मनात नसतांना मला पेपर द्यायला जमणार नाही. जाऊ दे मी माझा निर्णय बदलला आहे. तू नाराज होऊ नकोस. मी नाही नोकरी करणार."

"अगं, कविता मी खरंच चुकलो ग. मला माझीच लाज वाटली. तेव्हा तू ही परीक्षा आनंदाने दे. मला तुझ्या नोकरी करण्याचा त्रास होणार नाही."

"समीर तू खरंच बोलत आहे का?"

"अगदी खरं, आपल्या बाळाची शपथ."

समीरचे बाळाची शपथ घेणे. त्याच्या खरेपणाची साक्ष देत होता.

तेरा साथ हो तो..... मैं कुछ भी कर सकती हूं।

मिश्कीलपणे हसत दोघांनी एकमेकांना समजून घेतले.

कविता आणि समीर दिनकरराव आणि सरलाताईंचा
आशीर्वाद घ्यायला आले.

"आई, समीरने मला परीक्षा देण्यासाठी हो म्हटले आहे. तेव्हा मला डबल आशीर्वाद द्या."

"समीर तू तुझा निर्णय बदललास हे फार छान केले. अरे, प्रत्येक स्त्री स्वतः च्या संसारासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे हातभार लावते. एक स्त्री जशी पुरुषाच्या सुखदुःखाची सोबती बनते. तसेच पुरुषाने सुध्दा तिची सावली बनायला काहीच हरकत नाही."सरला

"आई -बाबा मी फार स्वार्थी झालो होतो. मुलं जन्माला घालणे , त्यांना वाढवणे हे फक्त स्त्रीचेच काम आहे. असे वाटत होते. पण, तुम्ही माझे डोळे उघडले."

सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मनमोकळे पणाने बोलत हसू लागले. तेवढ्यात स्वराजच्या रडण्याचा आवाज आला. सगळेजण त्याला घेण्यासाठी पळत गेले.

©® आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all