Jan 19, 2022
नारीवादी

खोटे बोलणे चांगले असते पण स्वतःशी नाही...

Read Later
खोटे बोलणे चांगले असते पण स्वतःशी नाही...

अगं शुभू ये ना.... बस... डॉक्टर असलेली आरती आपल्या मैत्रिणीला शुभांगीला म्हणाली.... आज इकडे कशी काय???

अगं असेच इथून जात होते तुझी आठवण आली, म्हटलं,रविवार आहे डॉक्टर मॅडम आज घरी आहेत चला जाऊया... शुभांगी वर वर हसत म्हणाली... आरतीला जाणवत होते काहीतरी गडबड आहे..... पण तिने तसे दाखवले नाही...

घराबाहेर छान बाग होती, तिथे झोपाळ्यावर जाऊन बसल्या, तिच्याकडच्या मावशींनी मस्त कॉफी आणून दिली... दोघी जुन्या गप्पांमध्ये हरवून गेल्या होत्या... पण शुभूचे आत गेलेले डोळे, उतरलेली तब्येत आरतीला खटकत होती...

बोलता बोलता विषय संसारावर आला आणि शुभूचा बांध फुटला... तिचे डोळे भरून आले...

आरती हुशार त्यात, सायक्रेटीस तिला अंदाज आला... शुभू ने स्वतःला सावरले... संसार करताना आपण किती अड़कुन जातो ना, त्यामुळे भरून आले ग... तू डॉक्टर त्यामुळे तू बाहेर जातेस, चार लोकांना भेटतेस... पण माझ्या सारख्या गृहिणी त्याचं काय ग?? आम्ही अड़कुन जातो.... आणि मग् सगळेच गृहीत धरू लागतात..आता होत नाही ग.. त्यात हा मेनोपॉज.. त्यामुळे हे असे रडायला येते बघ वेड्यासारखं... चल निघते मी...

आरतीने तिचा हात धरला, ... शुभू, एक मिनिट थांब... हे बघ आपल्या घराच्या गोष्टी बाहेर सांगूं नये, म्हणून आपण बायका खोटे बोलतो.. चांगले आहे त्यात.. पण एक सांगू, सगळ्यांशी तू खोटे बोलशील पण तुझ्या मनाचे काय? त्याच्याशी खोटे बोलू शकतेस??

हे बघ, मला तू काही सांगूं नकोस..मी तूला विचारणार पण नाही... पण वेळ जायच्या आधी स्वतःला वेळ दे, स्वतःच्या मनाशी खोटे बोलू नकोस... उलट मी तूला सांगेन स्वतःला वेळ देण्यासाठी, आपल्या मनात डोकावून पाहायला बाकी सर्वांशी थोडे खोटे बोल आणि वेळ काढ... आता तरी मी एवढंच सांगतें... बरोबर १ महिन्यानी आपण भेटू तेव्हा मला सांग... तोवर विचार कर..

आरतीचे वाक्य तिच्या कानात घुमत होते, डोक फार जड झाले सगळा विचार करत... तिला ते पटत होते... आता सकाळी सगळयांचं आवरून ती व्यायाम करायला जाऊ लागली, हातात वस्तू देणारी आई आता हवी तेव्हा घरात नसल्यामुळे मुलांना, नवऱ्याला ती घरात काय करते ह्याची जाणीव होऊ लागली... दुपारी कोणालाही न सांगता तिने केक बेकींगचा क्लास लावला.. सगळे यायच्या आधी ती घरी येतं होती... त्यामुळे कोणाला काही कळले नाही...  हळू हळू "Magic Cake'' या नावाने तिचे केक प्रसिद्ध झाले... तिला पहिल्या पासुन याची आवड होतीच, फ़क्त आता क्लास करून तिने जुन्या- नव्याची सांगड घातली त्यामुळे एका महिन्यात तिला खूप छान रिस्पाॅन्स मिळाला... तिलाच तीचं हे नवीन रूप आवडत होते... ऑनलाईन बुकिंग होत असल्यामुळे तिने कोणालाही न सांगता त्या अँप वर तिच्या बिझनेस चे घरगुती केक मेकर्स मध्ये नाव दिले त्यामुळे व्हाट्सअप वर ऑर्डर येत असत...

मुलांना आई बदलली आहे हे जाणवत होते... पण का?कशामुळे जाणून घ्यायची इच्छा झालीच नाही..

आरतीला भेटायला गेल्यावर तिला मात्र भरून आले, शुभू किती छान दिसतेस महिन्यातच... किती बदल? तिने आरतीसाठी तीच्या आवडीच्या फ्लेवरचा एक सुंदर केक आणला होता... तो दिला... आणि शुभू ला भरून आले... ती म्हणाली खरच सगळ्यांना मी सुखी आहे हे दाखवताना मात्र माझ्या मनाशीच खोटे बोलत होते... पण तू माझे डोळे उघडलेस... आता माझ्या मनाच्या आरशात मी बघताना मला दडपण जाणवत नाही ग...

आरती म्हणाली, "देर सही पण सुरवात तर झाली..." आता स्वतःशी नेहमीं खरे बोलत जा," खोटे बोलणे चांगले असते पण तें दुसऱ्यांशी आपल्या मनाशी नाही...!!"

शुभांगी घरी आली, रविवार असल्यामुळे सगळे घरी होते... सगळ्यांना तिचे गुपित कळले होते... पण तिच्या कडून ऐकण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी तिची गंमत करायच ठरवले... ती घरी आल्यावर मुले म्हणाली, बाबा आपण "Magic cake" मधून केक ऑर्डर करूया का?? खुप् छान असतो मी बर्याच जणांकडून ऐकलं आहे... शुभांगी ऐकत होती... आता ह्यांना मी कसे सांगूं?

तेवढ्यात मुलगा आला आणि म्हणाला, मॅडम माझी ऑर्डर घ्याल का? ती बघतच बसली... आणि सर्व जण हसु लागले... आई तू किती खोटे बोललीस तरी आम्हाला समजले आहे... पण हे खोटे बोलणे चांगले होते हा....!!! आम्हाला आमची चूक समजली आहे आम्हाला माफ कर आणि इथून पुढे आम्ही तूला सगळी मदत करू... खाली पार्किंग आहे तिथे तुझे शॉप काढू... पण आता आधी आमची ऑर्डर पूर्ण कर... मग् सगळे... आता आणते म्हणून शुभांगी लगेच कामाला लागतें...

आणि लवकरच तिच्या केक शॉप चे उदघाटन होते अर्थात तिची मैत्रीण डॉक्टर आरतीच्या हस्ते... आणि आरती कडे येणार्या कितीतरी शुभू ह्या शुभांगीच्या Magic cake ची शाखा काढतात... तर काही अजून वेगळ्या वाटा निवडून स्वतःची ओळख निर्माण करतात... स्वतःच्या मनाशी खरे बोलून....!!!

कशी वाटली कथा???
बऱ्याच शुभांगी असतात आजूबाजूला ज्या आपण सुखी आहोत हे दाखवायचा प्रयत्न करत असताना स्वतःला मात्र फसवत असतात.... वेळीच बाहेर पडा....आणि हे नेहमीं लक्षात ठेवा," खोटे बोलणे चांगले असते पण तें दुसऱ्यांशी... आपल्या मनाशी नाही...!!"

© अनुजा शेठ

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत  नाही...

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...