तेजस्वी - कुचंबणा ( भाग - 2 )

Tejasvi

तेजस्वी इंग्लिश विषयात युनिव्हर्सिटी मध्ये दुसरी येते, तेव्हा आपली मुलगी इंग्लिश हा विषय घेऊन सतरावी झाली हे ऐकून तेजस्वी च्या वडिलांचा उर अभिमानाने भरून येतो.

त्यावेळी म्हणजे ( 1970 साली ) मुलींची लग्न लवकर होत असत, त्यामुळे तेजस्वी च पण आता लग्नाचं वय झाले असं तिचे  वडिल तिच्या आई ला सांगतात, आणि मग योग्य वर शोधन्याची मोहीम चालू होते.

एके दिवशी मुंबई च एक स्थळ चालून येत, मुलगा मुंबई ला एका चांगल्या कंपनी मध्ये कामाला असतो. मुंबई ला ठाणे ला त्याचा एका बिल्डिंग मध्ये 1 bhk फ्लॅट असतो. सर्व गोष्टी पसंत पडल्यामुळे तेजस्वी च्या घरातले लग्नाला होकार देतात.

पुढच्या दोन महिन्यात साखरपुडा आणि लग्न होत. आणि तेजस्वी सासरी जाते. तेजस्वी ह्या स्थळा मुळे खुश  च असते कारण तिला अजून पुढे शिकायचे असते, आणि मुंबई सारख्या ठिकाणी आपलं शिक्षण होणार आणि ह्याचा तिला मनापासून आनंद झालेला असतो.

तेजस्वी च्या घरी - सासूबाई सासरे, तेजस्वी आणि तिचे मिस्टर असं चार जणांचे कुटुंब असत. एक नणंद  असते तेजस्वी ला - सविता  नावाची पण ती च लग्न झालेलं असत, ती मुंबईला -मुलुंड इथे राहत असते.

तेजस्वी च्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लग्नाची पूजा असते. पूजा, लग्न  झाल्यावर लग्नासाठी घरी असलेले एक एक पाहूणे निघून जातात. आणि मग सर्व पाहुणे गेल्यावर नवरा, सासूबाई, सासरे मिळून लग्नाला आलेले प्रेझेन्ट, आहेर चेक करतात, पॉकेट फोडतात.

त्यावेळी तेजस्वी आत बेडरूम मध्येच बसलेली  असते पण तिला कोणीच बाहेर ये, असं बोलत नाहीं, तिला थोडं स वेगळं वाटत, पण ती म्हणते कदाचित मी नवीन आहे ह्यांच्यात अजून म्हणून  मला बोलावलं नसेल, ती असूदेत असं म्हणून  तो विचार सोडून देते.

लग्नाच्या चौथ्या  दिवशी तेजस्वी ची सासू तिला बाहेर बोलावते आणि बोलते कि तुझं छोटं एक पदरी मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र सोडून बाकी चे दागिने हार, नथ वैगरे मला आणून  दे, तेजस्वी मनात ल्या मनात बोलते बेडरूम मध्येच एक कपाट आहे त्यात तिला तिचा नवरा लग्न झाल्यावर तीच  सामान ठेवण्यास सांगतो, त्यात  मी माझे दागिने का ठेवू शकत नाहीं. आणि तेजस्वी विचार करत तिथेच उभी राहते.

थोड्या वेळाने तेजस्वी ची सासू तिच्या अंगावर अक्षरशः खेकसते, दागिने दे लवकर असं, तेजस्वी बावचळून जाते, आणि लगेच दागिने काढून देते, तेजस्वी च्या घरी असं ओरडून कोणीच बोलत नसे, त्यामुळे तेजस्वी घाबरून जाते.

लग्नानंतर पाचव्या दिवशी  तेजस्वी आणि तिचा नवरा  देवदर्शनाला जातात, मुंबई मध्येच, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर  आणि अजून तीन मंदिर अशी मिळून पाच  मंदिरात जाऊन येतात.

तेजस्वी नवऱ्याला सांगते अहो आईनी माझे सर्व दागिने त्यांच्याकडे ठेवून घेतलेत त्यावर तिचा नवरा सरळ एका शब्दात उत्तर देतो आई  सांगेल तस करत जा. नाहीं बोलू नकोस कशाला, तेजस्वी मनातून नाराज होते  आणि नवऱ्याला म्हणते माझे दागिने आणि मला लागतील तेव्हा मी सारखे  मागत राहायचं का. त्यावर नवरा तिलाच ओरडतो, आणि म्हणतो आई कडे मागायला तुला कमीपणा वाटतो  का, ह्या वाक्यावर तेजस्वी गप्प च होते.

आणि मग पुन्हा तेजस्वी च विषय काढते कि अहो तुम्ही मला नोकरीं ला लावणार होतात ना किंवा अजून काही शिकायचं असेल तर शिक्षण घे  असं लग्नाआधी बोलला होतात ना, आपण  दोघांनी  बोलून काय तो निर्णय घेऊया.तिच्या ह्या वाक्यावर जास्त इंटरेस्ट नसल्यासारखं दाखवून तिचा नवरा हो बघू  नंतर असं बोलून विषय कट करतो.

पुढच्या भागात आपण बघणार आहोत, तेजस्वी ला सासरी कशी वागणूक दिली जाते, आणि त्याचे काय परिणाम होतात...


नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )



🎭 Series Post

View all