तेजस्वी - कुचंबणा ( भाग - 1 )

Tejasvi

एका अशा मुलीची कथा - जी खूप उच्च शिक्षित असूनही, सासरी मनासारखी वागणूक न मिळाल्यामुळे तिची होणारी कुचंबणा......

 ही कथा आहे - 1970 सालची - तेजस्वी एक अशा गावातली मुलगी जिच्या गावात ती शिकत होती त्यावेळी जास्त सुधारणा न्हवत्या. शाळा होत्या पण दहावी पर्यंत, पण कॉलेज ला जाण्यासाठी अगदी तिच्या गावापासून लांब रत्नागिरी ला एस टी जावे लागत असे,.जाण्यासाठी तीन तास लागत असत.

तेजस्वी घरातलं पाहिलं अपत्य, त्यानंतर तिला दोन जुळ्या बहिणी आणि एक भाऊ असा परिवार होता. तेजस्वी चे वडील मिलेत्री मध्ये कामाला होते.

तेजस्वी ची आई गृहिणी होती. तेजस्वी ची आई, विदया तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती , विदया च्या डिलिव्हरी च्या वेळी तिच्या आईला ला काहीतरी अडचणी आल्यामुळे त्यांना पुढे मुलं झालंच नाहीं, त्यामुळे तेजस्वी ची आई तशी लाडात वाढलेली होती. पण विदया च्या वडिलांनीं  आपल्या एका मित्राला लहानपणी च वचन दिले होते, कि माझी मुलगी तुझ्याच घरी देईन असं आणि वडिल विदया मोठी झाल्यावर त्या वचनाला मनात  ठेवून विदया ला एक दिवस म्हणाले, कि तुझं लग्न  मी लहानपणी च ठरवून ठेवले होते आता ती योग्य वेळ आली आहे, तुला सांगायची विद्याला मुलगा मिल्ट्री मध्ये आहे ऐकून छान वाटल, तो मुलगा सुट्टी वर 20 दिवसांसाठी येणार आहे तोवर आपण लग्न उरकून घेऊ असे सांगितलं आणि विदया जोशी ची विदया साठे झाली. तेजस्वी च्या आई ने वडिल कायम नोकरीं निम्मित बदली च्या ठिकाणी असून सुद्धा चार मुलांना सांभाळून मुलांना चांगले घडवले. त्यांच्या शिक्षणात जातीने लक्ष घातले.

तेजस्वी ची आई खूप विचारी आणि संस्कारी बाई, तिने आपल्या सर्व मुलांना खूप चांगले संस्कार दिले,  मी माझ्या मुलांना खूप चांगलं शिकून मोठं करणार हा जणू चंग च त्या माऊली ने मनाशी पक्का केला होता.

तेजस्वी पहिल्यापासून च शिक्षणात खूप हुशार, सर्व शिक्षकांच्या तोंडी तीच च नाव असे. शाळेतल्या सर्व परीक्षेत तिचा पहिला नंबर असे.  तेजस्वी दहावी झाल्यावर तिने आर्टस् ( कला )शाखेत जाण्याचा निर्णय घेतला,  आणि तिने रत्नागिरी ला कॉलेज ला ऍडमिशन घेतले, तेजस्वी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे पुढे शिकत गेली, आणि पंधरावि पण झाली.

तेजस्वी ने घरी मला अजून पुढे इंग्लिश विषयात मास्टर्स करायचं आहे असं सांगितल्यावर वर तेजस्वी ची आई खूप च खूष  झाली कारण, त्यांच्या गावातून एवढी शिकणारी तेजस्वी पहिलीच मुलगी होती. आई ने तेजस्वी ला विचारले कि तू अजून म्हणजे कितवी इयत्ता शिकणार आहेस, त्यावर तेजस्वी सतरावी  म्हणाल्या वर तर आई च्या डोळ्यातून पाणी च आले.

पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि तेजस्वी च्या लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय होते...


नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )...