Dec 05, 2021
माहितीपूर्ण

मोबाईल चा वापर - चांगला कि वाईट

Read Later
मोबाईल चा वापर - चांगला कि वाईट

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्‍मार्टफोन म्हणजेच मोबाईलचा शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. आज या मोबाईलशिवाय कोणाचे पानही हलत नाही. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. आजकाल मोबाईलमध्‍ये गेम खेळने नेहमीची गोष्‍ट झाली आहे. त्‍यातच PUBG (Player Unknown’s Battle grounds.) या गेमने धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.    
मात्र मोबाईलला शाप म्हणणे खुपच चुकीचे होईल. वास्तविक पाहता,मोबाईल हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण कोणाशीही, कधीही आणि अक्षरश: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी कुठूनही संपर्क साधू शकतो. आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल सुसंवादी आहे.नोकरीवर जाणाऱ्या पतिपत्नींना घरात एकटे असलेल्या आपल्या मुलांशी विडीओ कॉल करून संपर्क साधता येतो. त्यांना काही हवे-नको असल्यास त्यांची काळजी घेता येते. वृद्ध एकाकी व्यक्तींना तर हा फार मोठा आधार बनला आहे. हल्ली मोबाईलवरून आपल्या विविध बिलांची माहिती मिळते. बातम्या, चित्रपट तर केव्हाच सुरू झाले आहेत. नाटक-सिनेमा, रेल्वे, विमाने यांची तिकिटे मोबाईलवरून खरेदी करता येऊ शकतात.मोबाईलचे फायदे किती सांगावेत ! तोटे आहेतच, पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे. हे उपकरण वापरणाऱ्या माणसाचा तो दोष आहे....... नमस्कार.... ( सौ. सोनल गुरुनाथ शिंदे )... ( देवरुख - रत्नागिरी ).... 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Mrs. Sonal Gurunath Shinde

लेखिका

MA - Economics And Sociology