ईरा- टीम पुणे

A Short Thank You Note For Team Ira.
नमस्कार वाचक हो,

मी पूजा आडेप, टीम पुणे कॅप्टन.‌ ‌

सर्वप्रथम ईरा व्यासपीठ आणि प्रशासकीय मंडळाचे खूप खूप आभार. ईराने आयोजित केलेली \"राज्यस्तरीय स्पर्धा \" ही स्पर्धा खूपच अनोखी अशी होती. पहिल्यांदाच आयोजित केलेली आणि स्वरुप माहिती नसताना सुद्धा स्पर्धेत ह्यावेळी भाग घ्यायचाच करून सामील झाले पुण्याच्या गटात. इथे माझा आत्मविश्वास हा कमीच होता पण ही संधी देऊन माझ्यातला आत्मविश्वास जागविला की \"तू करू शकतेस!\"


माझी पुण्याची टीम! कौतुक करावे तेवढे कमीच. कारण कॅप्टन म्हणून त्यांनी नेहमीच आदर केला. लहानमोठे असा भाव न ठेवता सगळ्यांनी नेहमीच एकमेकांचा आदर केला. कुठल्याही परिस्तिथी आपण करू शकतो ही भावना निर्माण करणे सोप्पे नव्हते. तरीही सगळ्यांनीच खूप संयमाने आपापले लेखनाचे काम पार पाडले. कारण वेळेत असलेला फरक पाहता मला टीम सोबत बोलणे सहज सोप्पे नव्हते. तरीही सगळ्यांनी समजून आणि सांभाळून घेतले. माझ्या टीमचे विशेष आभार कारण माझ्या टीम मुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. अजूनही आम्ही सगळे जोडलेले आहोत. ह्याचा मला खूप आनंद आहे. नेहमीच राहील. कारण टीम मध्ये स्पर्धेनंतर सुद्धा रहायचे की नाही हा सर्वस्वी प्रत्येकाचा वैयक्तीक निर्णय होता. आजही कुठल्याही शंकांचे निरसन टीम मध्ये केले जाते. चर्चा केल्या जातात. कधी हिवाळ्यातल्या पावसासारखं चर्चेला प्रचंड पूर येतो तर कधी कधी पुण्यातील १ ते ४ दुपारच्या झोपेसारखी चर्चा झोपलेली असते. पूर्ण टीम जिंकली नाही तरी कोणीही उदास न होता पुढील लिखाण चालू ठेवले होते आणि आहे. त्याही पेक्षा अजून पुरस्कार जाहीर होणार सांगितल्यावर तर सगळ्यांना उत्साह झाला.


संजना मॅम फेसबुकवर लाईव्ह आल्या तेव्हा प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. सर्वात आधी पुरस्कार जेव्हा जाहीर झाला, मला अगदी सुखद धक्का बसला तो म्हणजे सर्वोत्कृष्ट लेखनात \"अंजली धस्के आणि कल्पना सावळे\". जेव्हा मला उत्कृष्ट कॅप्टनचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा माझे श्वास काही सेकंद थांबून गेले होते. ह्याचे श्रेय माझ्या टीम पुण्याला जाईल. या गोष्टीचा आनंद आहे की मी स्वतःलाही सिद्ध करू शकले यामुळे मलाही खूप काही शिकायला मिळाले.

ईराचे विशेषतः संजना मॅमचे खूप आभार कारण माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला आहे. भविष्यातही येणार्‍या स्पर्धा मध्ये आपण भाग घेऊ शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अश्याच अनोख्या स्पर्धा येत राहो आणि नवे नवे वाचक जोडत राहो हीच सदिच्छा आणि खूप खूप शुभेच्छा.@पूजा आडेप.