Nov 30, 2021
प्रेरणादायक

शिकवण

Read Later
शिकवण

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
शिकवण

निताबाई जेवण वाढून घेत होत्या. इतक्यात जया किचनमध्ये आली. आईकडे लक्ष जाताच ती आश्चर्याने म्हणाली -

" आई ही भाजी काल रात्री केली होती. आता दुपारी का घेतीयेस ? "

" अगं थोडी उरली होती. ती काय तशीच टाकून द्यायची का ? " निता बाई म्हणाल्या.

" हो. शिळे पदार्थ खाण्यापेक्षा टाकून दिलेले बरे."

" अगं काय बोलतीयेस ? "

" बरोबरच बोलत आहे. शिळे पदार्थ तब्येतीसाठी हानिकारक असतात. आताशा तुझी तब्येत नाजूक असते. तू तर बिलकुल शिळं खाऊ नयेस."

" अगं अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. ते टाकून देऊन त्याचा अपमान करायचा का ? अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात देवाचा."

" आई आपल्याला हा मानवी देह कुणी दिला ? देवानेच ना ? असं म्हणतात देह देवाचे मंदिर आहे. मग ते खराब करून देवाचा अपमान नाही होत का ? आणि शिळे अन्न बळेच पोटात ढकलणे म्हणजे कचऱ्यात टाकणच असते. म्हणून रोज अंदाज घेऊन भाजी करीत जा. म्हणजे तब्येतीला अपाय होणार नाही, किंवा अन्न वाया जाऊन देवाचा अपमानही होणार नाही. "

निता बाई क्षणभर जयाकडे बघतच राहिल्या. मग एक टोपली घेऊन ताटात घेतलेली भाजी त्यात ठेवली, अन् त्या उभ्या राहिल्या. निता बाई व जयाची नजरानजर होताच दोघींच्या ओठांवर स्मित उमटलं. निता बाईंनी ज्या लेकीवर लहानपणापासून चांगले संस्कार केले, चांगल्या गोष्टी शिकवल्या ; त्या लेकीकडून आज त्यांनाच मोलाची शिकवण मिळाली होती.

समाप्त
@ प्रथमेश काटे

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing