शिक्षक : शिकवणारा सुद्धा आणि शिक्षा करणारा सुद्धा...

Teacher
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात
परब्रम्ह तसमय श्री गुरुवे नमः..
अर्थात गुरूच ब्रह्मा आहे गुरूच विष्णू आहे गुरूच महेश्वर म्हणजेच महादेव आहे
अशा गुरूला माझा प्रणाम ...
सर्वपल्ली राधकृष्णन् याचा जन्मदिवस म्हणजे आजचा दिवस एक गुरूचा दिवस ..
गुरू अर्थात शिक्षक ...शिक्षा आणि शिकणे याचा एकत्रित अर्थ म्हणजे शिक्षक.
खरच शिक्षक हा एकमेव व्यक्ती आहे ज्याला त्याचा खिसा भरण्यासाठी दुसऱ्याचं नुकसान बघावं लागत नाही
म्हणजे बघा ना डॉक्टर साठी लोक आजारी पडले पाहिजे... इंजिनिअर साठी लोकांना घर ,गाड्या,याच्या इच्छा पाहिजे पण शिक्षक काही न मागता सगळं देऊन देतो..त्याच ज्ञान त्याचे अनुभव ...त्याच्या कडची सर्व शिदोरी तो मनोभावाने निरक्षराला देऊन टाकतो..

गुरूच्या अनेक व्याख्या आपण बघतो आणि बघितल्या सुद्धा आहे .

अर्जुन ची साथ देणारे द्रोण..आणि कृष्ण...
दुर्योधन ला शिकवणारा बलराम...
भिष्माची साथ देणारा परशुराम..
चंद्रगुप्ताची साथ देणारे चाणक्य...
कृष्णाची साथ देणारे संदिपणी...
राम आणि लक्ष्मण ची साथ देणारे वशिष्ठ...
आणि फक्त पुरणातच नाही तर आज ही आपण असे अनेक विलक्षण गुरू बघतो .
रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर
बिरजू महाराज आणि माधुरी
पुल्लेला गोपीचंद आणि पी. वी. सिंधू
श्रीनिवास खळे आणि शंकर महादेवन
श्याम आणि त्याची आई
आणि यातच आपल्या सोबत पदोपदी उभे राहणारे आपल्या सोबत वावरणारे गुरू म्हणजे आपले आई आणि वडील..
एका मातीच्या गोळ्याला जन्म देऊन त्याला थोडा आकार निकार देण्याचं काम ते आयुष्यभर करतात.पण त्या गोळ्याला दिशा आणि एक रूप देण्याचं काम त्याच्या आयुष्यात येणारे शिक्षक करतात.
माझ्या आयुष्यात सुद्धा लहानपणा पासून असे काही शिक्षक आहे जे नेहमी लक्षात राहतील..
जसे चौथीच्या ठाकरे मॅडम...नंतर ५-१० मध्ये भदाने सर..कारे मॅडम.. दरेकर मॅडम....भागवत मॅडम....आणि कॉलेज मध्ये तर विचारूच नका युजी मध्ये तरी एक किंवा दोन असतील पण पी. जी आणि ग्रॅज्युएशन मध्ये तर एवढे भेटले होते की ते आयुष्यभर सुद्धा विसरणार नाही .
शिंदे मॅडम ...पाटील मॅडम.... लभडे सर... गायकवाड सर.... गुरुळे मॅडम.....खैरनार सर... जाधव सर ... खालकर मॅडम... रोटे सर...काळे सर...बापरे वेळ कमी पडेल पण नाव अपुरे नाही पडणार नाही?
आपल्या आयुष्यातले सर्वात पाहिले गुरू आणि त्यानंतर येणारे आणि आपल्याला काही ना काही शिकवून जाणारे शेवटचे गुरू.....
एक गुरू खरंच खूप जोखमीचे काम करतो...
हो थोडा जड झाला शब्द पण इथे उपस्थित शिक्षक वर्ग मात्र आक्षेप घेणार नाही.
हो ना बघा ना म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन मुळे जसे आलो तसे घ्याचे आणि त्यांना ज्ञानाचा घोट जीव तोडून पाजायचा.
वैयक्तिक मला जर कुणी विचारले ना की तू काय होणार पुढे तर मी तर खूप पटकन बोलून देते मी सगळ होईल पण शिक्षक नको. ..कारण विद्यार्थी सांभाळणं म्हणजे अगदी मातीच मडक करण्यासारखं असत...आम्हालाच माहित आम्ही कधी कधी किती तुम्हाला त्रास देतो पण काय करणार विद्यार्थी शेवटी किती ही बोलले तरी हाच विचार करतो एवढंच वर्ष रे पुढच्या वर्षी नाही यायच पण तुम्ही दरवर्षी आमच्या पेक्षा आगव..शांत उद्योगी ..हुशार.. ढ सर्व विद्यार्थी बघता पण कधीही विद्यार्थी बदलून देण्याची अट ठेवत नाही... पण आम्ही खूप सहजासहजी बोलून टाकतो "ए या शिक्षकच कळत नाही"..".ए हा शिक्षक मला खूप बोलतो थांब आपण तक्रारच करू" ....पण तो शिक्षक त्याचे कर्तव्य कधीच चुकत नाही आणि निमूटपणे तुम्हाला घडवायचे काम करत करत राहतात......
पण काळानुसार शिक्षक बदलले असा म्हणावं लागेल कारण आता शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याची मजा घेण्यास शिकले बर का ...
खरंच मानलं बर का शिक्षक होणं सोप्पा नाही.....
आता थांबते ?
शेवटी एवढंच बोलते ... काळया फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...