टी टाईम रवा केक

रवा केक
साहित्य

दोन वाटी रवा
एक वाटी साखर
पाऊण वाटी मिल्क पावडर
अर्धा वाटी अमुल बटर
एक वाटी दुध
पाऊण वाटी दही
एक चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा खाण्याचा सोडा

कृती

रवा साखर आणि मिल्क पावडर मिक्सर मधून बारीक करून घ्या. एका भांड्यात अमुल बटर दूध दही मिक्स करून घ्या. यात मिक्सर मधून बारीक केलेले मिश्रण मिक्स करून घ्या. हे सर्व मिश्रण एकाच दिशेने हलवून मिक्स करा. हे सगळं मिक्स झाल्यावर हे झाकण ठेवून पंधरा मिनिट बाजुला ठेवून दया. म्हणजे रवा भिजेल.

केक बनवण्यासाठी कूकरच्या भांड्याला थोडं बटर लावून घ्या. कुकर मध्ये तळाला मिठाचा थर पसरवून घ्या. त्यावर एक रिंग ठेवा. किंवा एखादी ताटली पण ठेऊ शकता.
झाकणा साठी मोठ ताट वापरू शकता.पाच मिनिट मध्यम आचेवर कुकर तापवून घ्या.

केकच्या मिश्रणात खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर आणि दोन ते तीन चमचे दुध घालून मिक्स करा. मिश्रण इडलीच्या पीठ इतपत पातळ असू दे. जास्त घट्ट नको की पातळ नको. कन्सीस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठीं दुध वापरू शकता. दूध वापरताना छोटा चमचा चमचा असच दूध मिक्स करा.

हे मिश्रण केकच्या भांड्यात ओतून घ्या. कुकर मध्ये ठेवून घ्या. झाकण ठेवून दया.केक भाजून घ्या. साधारण पणे चाळीस मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.

किंवा ओव्हन मध्ये १८०डिग्री टेंप्रेचर वर वीस मिनिट भाजुन घ्या.

टूथपीक त्या केक मध्ये घातली आणि ती स्वच्छ पणे बाहेर आली पाहिजे. म्हणजे केक भाजुन तयार झाला. थंड झाल्यावर केक डी मोल्ड करून घ्या.

मावा फ्लेवरचा रवा केक तयार आहे.

टिप्स

*सर्व साहित्य रुम टेंप्रेचर चे असावं.

*सर्व साहित्य एकाच वाटीने.. किंवा चहाचा कप ने मोजून घ्या. यासाठी नेहमी वापरात येणारी आमटीची वाटी आणि पोहे खायचा चमचा वापरु शकता.

* गोड जास्त आवडत असल्यास साखर जास्त घाला.
दोन वाटी रवा आणि एक वाटी साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे.

* केक कुकर मध्ये करायचा असेल तर एकदा वापरलेलं मीठ नंतरही वापरू शकता.

* याच मिश्रणात वेलची पावडर, व्हॅनिला इसेन्स घालून त्या फ्लेवरचे टी टाईम केक बनवू शकता.

* सजावटी साठी टूटी फ्रूटी मैद्यात मध्ये घोळवून केकच्या मिश्रणात घाला. सजावट करण्यासाठी पण वापरा. पिठात घोळवून घेतल्याने ती तळाशी जाऊन बसत नाही.

* टूटी फ्रूटी प्रमाणे बदाम काजूचे तुकडे वापरून आकर्षक सजावट करता येईल.

* याच मिश्रणात अर्धा कप कोको पावडर वापरून चॉकलेट केक बनवू शकता. सजावटी साठी पेपर फोल्ड करून स्नो फ्लेक्स चे डिझाईन कापून घ्या. केक थंड झाल्यावर हे डिझाईन केक वर ठेवून गाळण्याने पिठी साखर डस्ट करून घ्या . कागद बाजुला करा. कागदाच सुंदर डिझाईन ने केक छान दिसतो.