Mar 01, 2024
प्रेम

चहा आणि बरंच काही भाग ८

Read Later
चहा आणि बरंच काही भाग ८

        आपण मागील भागात बघितलं, मेघना आणि आदित्यमध्ये पहिल्यांदाच मॅसेजेस मधून छान बोलणं होतं, दोघांचेही एकमेकांबद्दल झालेले गैरसमज दूर होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना झोपेतून उठते तर तिच्या मोबाईलवर आदित्यचा मॅसेज आलेला असतो, "हाय गुड मॉर्निंग मेघना, काल तुझ्याशी बोलून छान वाटलं."

मेघनाने त्याला रिप्लाय दिला, गुड मॉर्निंग आदित्य, मलाही तुझ्याशी बोलून छान वाटलं. आज तुला डिस्चार्ज मिळणार आहे ना? काळजी घे.

       दुपार पर्यंत आदित्यचा काहीच रिप्लाय न आल्याने मेघना काळजीत पडली. मेघना पुन्हा पुन्हा आदित्यचा मॅसेज आला का चेक करायची पण आदित्यचा काहीच मॅसेज आलेला नव्हता. आदित्य बिजी असेल म्हणून मॅसेज नसेल केला हा विचार करून मेघनाने आदित्यच्या मॅसेजची वाट बघणे सोडून दिले. मेघना आदित्यच्या मॅसेजची इतकी वाट का बघत होती हे मेघना लाच समजत नव्हते.

        संध्याकाळी आदित्यचा मॅसेज आला, आज मला डिस्चार्ज मिळाला, आत्ताच घरी आलो आहे.

मेघना--- मॅसेज करायला इतका उशीर का केलास? तु ठीक आहेस ना?

आदित्य--- मी ठीक आहे, थोडा अशक्तपणा जाणवत असल्याने दिवसभर झोपूनच होतो.

मेघना--- ओके, कंपनीत केव्हापासून येणार आहेस?

आदित्य--- बघू, अशक्तपणा असल्याने मला आराम करावा लागेल, दोन तीन दिवस तरी मला कंपनीत यायला जमेल अस वाटत नाही.

मेघना--- ठीक आहे, पूर्ण बरं वाटल्याशिवाय कंपनीत येऊ नकोस. स्वतःची काळजी घे.

आदित्य--- जशी आपली आज्ञा मॅडम

मेघना--- माझी आज्ञा पाळ मग.

आदित्य--- हो, मेघना आपण नंतर बोलूयात, घरी मला भेटायला पाहुणे आले आहेत.

मेघना--- हो चालेल बाय

आदित्य--- बाय.

           आदित्यशी बोलून झाल्यावर मेघना विचार करते की आपण आदित्यशी खूपच मोकळेपणाने बोलतोय, पण अस का? आजपर्यंत मी कुठल्याही मुलाशी एवढ्या मोकळेपणाने बोलले नाही, मग आदित्य सोबत बोलताना मी हे का विसरून जाते की आदित्य माझा बॉस आहे मित्र नाही? मला हे काय होतंय? 

           आदित्य बेडवर पडल्या पडल्या हाच विचार करत असतो की मेघना आपल्याशी खूपच मनमोकळेपणाने बोलतेय, हक्क दाखवून बोलतेय, अस का?

             आदित्य मेघनाच्या विचारात असतानाच त्याचा मित्र विशाल आदित्यला भेटायला घरी येतो, विशाल आणि आदित्य एकाच कंपनीत जॉबला असतात.

विशाल--- कसा आहेस मित्रा?

आदित्य--- आज आठवण झाली का? या मित्राची.

विशाल--- मित्रा तुझं लग्न झालं की कळेल, घरातून बाहेर पडायचं म्हटलं की बायकोचे सतरा काम हजर असतात.

आदित्य--- अरे गंमत केली.

विशाल--- तु कसा आहेस? हॉस्पिटल मधून कधी आलास?

आदित्य--- आजच आलो, थोडा अशक्तपणा आहे बाकी ठीक आहे.

विशाल--- तुझ्या टीम मधल्या शिवानी आणि मेघना तुझ्या बद्दल विचारत होत्या.

आदित्य--- हो माहितीये मला, मेघना हॉस्पिटलमध्ये आली होती.

विशाल--- मेघना? ती तर फार कोणाशी बोलत नाही

आदित्य--- हो रे, सुरवातीला माझ्याशी पण नीट बोलत नव्हती पण आता खूप मोकळेपणाने बोलतेय.

आदित्य मेघनामध्ये व त्याच्यात झालेलं बोलण विशालला सांगतो.

विशाल--- मेघना तुझ्या प्रेमात तर पडली नाही ना

आदित्य--- काय माहीत, आमच्यात अजून साधी मैत्री पण नाही प्रेम तर खुप पुढची गोष्ट आहे.

विशाल--- आदित्य मेघना तशी चांगली मुलगी आहे, तिच्या बद्दल विचार करायला काहीच हरकत नाही.

आदित्य--- अरे हळू बोल, आई ऐकेल, काल हॉस्पिटलमध्ये आईची आणि मेघनाची भेट झालीये, आईला मेघना आवडली आहे.

विशाल--- अरे मग चांगलंच आहे ना

आदित्य--- विशाल असे निर्णय घाईत घ्यायचे नसतात, मेघनाला मी अजून पूर्णपणे ओळखत नाही, मला थोडा वेळ लागेल.

विशाल--- तु म्हणतो ते खरं आहे, आयुष्याचा प्रश्न आहे, पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यायला हवाय.

आदित्य--- मेघनाला किंवा कुणालाच यातलं काही कळू देऊ नको.

विशाल--- बास का यार, अजून पर्यंत आपले सिक्रेट्स कोणाला सांगितले आहेत का?

आदित्य--- नाही रे तस नाही, पण मी आपलं सांगायच काम केलं.

  अशा रीतीने आदित्य व विशाल मध्ये बऱ्याच गप्पा रंगतात. दुसऱ्या दिवशी मेघना कंपनीत जाताना बस मध्ये शिवानीला आदित्य आणि तिच्या मध्ये झालेल्या बोलण्याचा आढावा देते.

शिवानी--- वाव मेघना, तु मि. खडूस ची खूपच मनमोकळेपणाने बोललीस.

मेघना--- मि. खडूस नाहीये ग तो.

शिवानी--- मग कोण आहे तो?

मेघना--- आदित्यचा स्वभाव खूप छान, फ्री आहे, त्याच्याशी बोलताना मनावर कुठलेही दडपण राहत नाही.

शिवानी--- ओके तर तुमची मजल फक्त आदित्य म्हणण्यापर्यंत पोहचलीय वाटतं.

मेघना--- हो, आदित्य मस्त आहे.

शिवानी--- तुमच्यात मैत्री झाली तर

मेघना--- मला आदित्यशी बोलायला खूप आवडतं, आदित्य इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आहे.

शिवानी--- चला मेघना मॅडमला ह्या जगात कोणता तरी मुलगा आवडला.

मेघना--- शिवानी आवडला अस म्हणू नको, मित्र म्हणू शकते.

शिवानी--- मित्र म्हणून आवडला अस म्हणूच शकते ना.

मेघना--- हो.

         मेघनाला कंपनीत गेल्यावर आदित्यची आठवण येते मग मेघना आदित्यला गुड मॉर्निंग चा मॅसेज करते.

आदित्य--- गुड मॉर्निंग मेघना, कंपनीत पोहचलीस का?

मेघना--- हो आत्ताच

आदित्य--- आपल्या कंपनीत मोबाईलचा जास्त वापर करायला मनाई आहे.

मेघना--- मला माहीत आहे.

आदित्य--- मी आठवण करून देण्याचे काम केले, कंपनी सुटल्यावर बोलू, आता मोबाईल ठेवून दे. बाय

मेघना--- बाय( राग आल्याच्या स्माईली पाठवते)

       मेघनाला आदित्यचा खूप राग आलेला असतो. आदित्य तिच्या चांगल्यासाठीच सांगतो पण हे त्यावेळी मेघनाच्या डोक्यात काही शिरत नाही. मेघनाला राग आल्याची कल्पना आदित्यला असते. आदित्य विचार करतो की कंपनी सुटली की मेघनाशी फोन करून बोलू, मगच मेघनाचा राग निवळेल.

         मेघना काम करत असताना ती आदित्यवर रागावलेली असते हे विसरूनही जाते. पण इकडे आदित्य मात्र ह्या विचारात असतो की, मेघनाचा राग कसा घालवावा?

©®Dr Supriya Dighe

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//