चहा आणि बरंच काही भाग ७

Meghna and aditya did chatting for the first time

   आपण मागील भागात बघितलं, आदित्यचा अपघात झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला असतो. मेघना आदित्यला भेटायला हॉस्पिटलमध्ये जाते, तिथे मेघनाची भेट आदित्यच्या आईशी होते, दोघींमध्ये बऱ्याच गप्पा होतात. आदित्य व मेघना मध्येही चांगल्या गप्पा होतात. आदित्यला मेघना त्याला भेटायला आल्याने खूप छान वाटते.

       मेघना हॉस्पिटल मधून निघून गेल्यावर आदित्य मनातल्या मनात विचार करत असतो की, आपण उगाच मेघनाशी रूढ वागण्याचा प्रयत्न केला, मेघना तशी चांगली मुलगी वाटतेय. मेघनाशी मैत्री करायला काहीच हरकत नाहीये. मेघनाला मॅसेज करू का? नाही नको, उगाच ती माझ्या बद्दल गैरसमज नको करून घ्यायला. आदित्य मेघना बद्दल विचार करतच होता, तेवढ्यात

आदित्यची आई--- आदित्य मेघनाचा विचार करत आहेस का?

आदित्य--- (आईला कस कळलं?) नाही ग आई, मी तिचा विचार का करू?

आदित्यची आई--- मेघना चांगली मुलगी आहे ना, तुझी जवळची मैत्रीण आहे का? तुम्ही दोघे एकमेकांना अहो जाहो का करतात?

आदित्य--- ती माझी मैत्रीण नाहीये, ती माझी ज्युनिअर आहे, आत्ताच काही महिन्यांपूर्वी जॉईन झाली आहे, मी तिचा बॉस आहे, प्रोफेशनल जगात अस पटकन कुणालाही एकेरी नावाने हाक नसते मारायची, its bad manners.

आदित्यची आई--- ते काही असो, मुलगी चांगली व संस्कारी वाटली, तु तिच्याशी मैत्री कर, मला मेघना सून म्हणून चालेल, चांगल्या घरातील वाटतेय, शिवाय आपली कास्ट पण एकच आहे, पुढे जाऊन लग्न करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही.

आदित्य--- अगं आई कुठल्या कुठे विचार चालले आहेत, तु मेघनाला तिची कास्ट विचारलीस? तिला काय वाटलं असेल? आई तु पण ना.

आदित्यची आई--- त्यात काय वाटायचं? मी अगदी सहजच विचारलं

आदित्य--- अगं आई आम्ही फक्त एकत्र काम करतो, बाकी आमच्यात काहीच नाहीये, साधी मैत्री सुद्धा नाही.

आदित्यची आई--- अरे तुमच्यात आता सध्या काही नसलं तरी पुढे जाऊन होऊच शकत ना, मेघनासाठी माझ्या कडून ग्रीन सिग्नल आहे. अरे खुप चांगली मुलगी आहे. मी तिला जाताना सांगितलं होतं की घरी पोहचल्यावर मॅसेज कर, बघ लगेच पोहोचल्या पोहोचल्या मॅसेज केला.

आदित्य--- आई तु मेघनाला तुझा फोन नंबर दिलास, खरच तु impossible आहेस.

 हे झाली आदित्यकडची परिस्थिती, आता मेघनाकडे कडे काय घडलं ते बघूया.

   मेघना घरी गेल्यावर तिने आपल्या आईला आदित्य व त्याच्या आई बद्दल सर्व सांगितलं.

मेघना--- आई आदित्य सरांच्या आई बघ ना, किती चांगल्या आहेत, माझी एकदम आस्थेने चौकशी केली, हॉस्पिटलमधून निघताना घरी पोहोचल्यावर कळवं अस सांगितलं, मला त्यांनी त्यांच्या घरीही बोलावलंय.

मेघनाची आई--- तुझ्या बोलण्यावरून त्या चांगल्या स्वभावाच्या वाटत आहेत, आपण दोघी जाऊ कधीतरी त्यांच्या घरी, मला एकदा त्यांना भेटायला आवडेल.

मेघना--- नाहीतर आई आपण त्यांनाच आपल्याकडे बोलवूया.

मेघनाची आई--- चालेल, काहीतरी निमित्त काढून बोलवूया. मेघना आता रात्र खूप झाली आहे, झोप, नाहीतर उद्या सकाळी उठायला उशीर होईल.

मेघना--- आई उद्या शनिवार आहे, मला सुट्टी आहे.

मेघनाची आई--- अरे हो, मी विसरलेच.

 मेघना बेडवर लोळत पडलेली असते, ती आदित्यचाच विचार करत असते, आपण आदित्य सरांबद्दल गैरसमज करून घेतला होता, आदित्य सरांचा स्वभाव खूप छान वाटतोय, आज सरांशी बोलताना सर फ्रेंडली वाटत होते, सरांना मॅसेज करू का? नाही नको, उगाच चुकीचा अर्थ निघायचा. मेघना मोबाईल वर असाच टाईमपास करत बसली होती, तेवढ्यात तिला आदित्यचा मॅसेज आला, आदित्यचा मॅसेज बघून मेघनाच्या चेहऱ्यावर नकळत हसू आले,

आदित्य--- Thanks for coming, I feel better after talking with you.

मेघना--- Its ok sir

आदित्य--- झोपला नाहीत का?

मेघना--- नाही, उद्या सुट्टी आहे ना, मग जरावेळ मोबाईलवर टाईमपास करत बसले होते. तुम्ही नाही झोपलात?

आदित्य--- दुपारी झोपलो असल्याने आता झोपच येत नाहीये.

मेघना--- मूव्ही बघत बसायचा

आदित्य--- गाडीवरून पडलो तेव्हा इअर फोनही हरवलेत.

मेघना--- तुमच बरच नुकसान झालेलं दिसतंय.

आदित्य--- होना, झोप येत नसली की मी गेम खेळतो पण ह्या मोबाईल मध्ये काहीच नाहीये. तुम्ही झोप येत नसल्यावर काय करता?

मेघना--- so sad, मी गाणे ऐकते, वेब सिरीज, मुव्ही बघते, फोटोजचे कोलाज बनवत बसते.

आदित्य--- मला वाटत होत की तुम्ही खूप सिंसिअर आहात, तुम्ही अभ्यासा व्यतिरिक्त काहीच करत नसाल.

मेघना--- हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी अभ्यास करायचीच पण मी माझ्या आवडी निवडी पण जपल्या आहेत.

आदित्य--- ओके, चला तुम्ही जे करत होता ते चालू ठेवा, उगाच माझ्या बोलण्याने बोअर झाला असाल.

मेघना--- मी बोअर झालीच आहे पण तुमच्या बोलण्याने नाही.

आदित्य--- मग कशाने?

मेघना--- तुम्ही जे काही मला अहो जाहो करत आहात त्याने.

आदित्य--- तुम्हाला आवडत नाही का?

मेघना--- मुळीच नाही. तुम्ही मला फक्त ए मेघना म्हणत जा.

आदित्य--- बर चालेल म्हणेन पण माझी एक अट आहे.

मेघना--- काय?

आदित्य--- तुपण मला अरे कारे करायच, फक्त आदित्य म्हणायच.

मेघना--- तुम्ही माझे बॉस आहात, मी तुम्हाला आरे कारे कशी करू शकेल?

आदित्य--- जस मी तुला करणार तसच

मेघना--- कंपनीत असताना बरोबर नाही वाटणार

आदित्य--- कंपनीत असताना आदित्य सर म्हणत जा, मग तर झालं

मेघना--- चालेल, प्रयत्न करेल.

आदित्य--- मेघना मला आता गोळ्यांची गुंगी चढत आहे, मी झोपतो

मेघना--- चालेल, काळजी घ्या

आदित्य--- परत घ्या

मेघना--- आदित्य स्वतःची काळजी घे

आदित्य--- गुड

मेघना--- डिस्चार्ज कधी भेटणार आहे?

आदित्य--- उद्या सकाळी डिस्चार्ज भेटणार आहे, का ग?

मेघना--- काही नाही असच विचारलं

आदित्य--- ओके, गुड नाईट

मेघना--- गुड नाईट, बाय

असं होतं मेघना आणि आदित्य मधील पहिले चॅटिंग. मेघनाला मॅसेज करून झाल्यावर आदित्य झोपतो पण इकडे मेघना मात्र आदित्यचा विचार करत बसते, आपण आदित्य सोबत जरा जास्तच मोकळेपणाने बोलतोय का? आदित्यशी बोलताना awkwardness जाणवत नाही. आदित्य बोलायला खूपच मोकळा आहे, जास्त आढेवेढे घेत बसत नाही. मि. खडूस ते आदित्य हा प्रवास किती पटकन झाला. मेघना आदित्यचा विचार करत करतच झोपी जाते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all