चहा आणि बरंच काही भाग ४

One day meghna is coming late in company without informing, so aditya give punishment to her

      आपण मागील भागात बघितलं, मेघनाचा कंपनीतील पहिला दिवस असतो, मेघना आदित्यच्या टीम मध्ये असते, आदित्य टीम लीडर असतो. 

       दुसऱ्या दिवशी मेघना वेळेत कंपनीत पोहचते. अजून आदित्य कंपनीत आलेला नसतो. थोड्याच वेळात आदित्य कंपनीत येऊन आपल्या जागेवर बसतो. शिवानी मेघनाला खुणावते की आदित्यशी जाऊन बोल. मेघना तिच्या जागेवरून उठते व आदित्यकडे जायला निघते पण आदित्य आपल्या जागेवरून उठून जात असतो.

मेघना--- गुड मॉर्निंग सर

आदित्य--- गुड मॉर्निंग, माझ्याकडे काही काम होत का?

मेघना--- हो

आदित्य--- काही महत्त्वाचे होते का?

मेघना--- नाही सर, थोडे बोलायचं होते.

आदित्य--- मी चहा घ्यायला जात आहे, तिकडून आल्यावर बोललं तर चालेल का?

मेघना--- हो चालेल.

    मेघना आपल्या जागेवर जाऊन बसते.

शिवानी--- मेघना झालं का बोलणं?

मेघना--- मी बोलली होती तुला आदित्य सर खूप खडूस आहे.

शिवानी--- आता काय झालं?

मेघना--- चहा प्यायला निघून गेले सर, माझ्या बोलण्यापेक्षा चहा महत्त्वाचा होता का?

शिवानी--- मेघना तु छोट्याशा गोष्टीचा एवढा इशू का करत आहेस? तुला कधीपासून या गोष्टींचा फरक पडायला लागला आहे?

मेघना--- मलाच कळत नाहीये की मी आदित्य सरांचा एवढा विचार का करत आहे?

शिवानी--- मला वाटतंय तु सरांच्या प्रेमात पडली असशील.

मेघना--- गप ग, तुझं तर वेगळंच काही तरी सुरू होतंय. सोड तो विषय आपलं काम करूया नाहीतर मि. खडूस परत चिडेल.

शिवानी--- ते काहीही असो पण तु सरांना नाव छान ठेवलंय, I like it.

      मेघना व शिवानी त्यांच्या कामाला लागतात. जेवणाची सुट्टी झाल्यावर दोघीही कॅन्टीन मध्ये जेवायला जातात. जेवण करून येताना आदित्य मेघनाला आवाज देऊन थांबवतो. मेघना आदित्यचा आवाज ऐकून थांबते, शिवानी तेथून निघून जाते.

आदित्य--- मिस मेघना तुम्हाला माझ्याशी काही बोलायच होत ना

मेघना--- नाही सर, एवढं महत्त्वाचे नव्हते.

आदित्य--- सकाळ पासून मी कामात खूप बिजी होतो म्हणून मला तुमच्याशी बोलायला वेळ भेटला नाही. महत्त्वाचे नसेल तरी काही तरी होतेच ना.

मेघना--- तुम्ही वैभव जिजूंना ओळखता का?

आदित्य--- अरे हो, वैभव आणि मी कॉलेजमध्ये सोबत होतो.

    एवढे बोलून मेघना तेथून निघून गेली. 

शिवानी--- काय बोलला मि खडूस?

मेघनाने शिवानीला आदित्यशी काय बोलणे झाले हे सांगितले.

शिवानी--- तु खरं का नाही सांगितले?

मेघना--- असच त्यावेळी जे सुचलं ते बोलले.

शिवानी--- तु मला नव्हतं सांगितलं की आदित्य सर वैभव जिजूंचे मित्र आहे म्हणून.

मेघना--- मलाच काल कळालं, वैभव जिजू काल घरी आले होते तेव्हा त्यांनी सांगितले.

शिवानी--- ओके.

       मेघनाचा कंपनीतील दुसरा दिवस अश्या रीतीने जातो. पुढचे काही दिवस सर्व सुरळीत चालू असते. एक दिवस मेघनाला कंपनीत यायला उशीर होतो. शिवानी मेघनाच्या आधीच कंपनीत पोहोचते. आदित्य सर्व टीम मेंबर्स ला कामाच्या instructions देत असतो, तेवढ्यात मेघना घाईघाईने तिथे येते, आदित्य मेघनाकडे रागाने बघतो.

मेघना--- I'm extremely sorry sir

आदित्य मेघनाकडे दुर्लक्ष करून त्याचे बोलणे चालू ठेवतो, आदित्यचे बोलणे पूर्ण झाल्यावर सगळे टीम मेम्बर्स आपल्या जागेकडे जायला निघतात, मेघनाही त्यांच्यासोबत जायला निघते.

आदित्य--- मिस मेघना तुम्ही इथेच थांबा, I want to talk with you.

मेघना खाली मान घालून तिथेच थांबते. आदित्य हातातील फाईल बाजूला ठेवतो.

आदित्य--- तुम्ही खुर्चीत बसू शकता.

मेघना आदित्य समोर असलेल्या खुर्चीत बसते.

आदित्य--- मिस मेघना, कंपनीत यायला उशीर होणार असल्यावर फोन करून कळवण्याची पद्धत असते याची आपल्याला कल्पना नाहीये वाटतं.

मेघना--- सर घरातून निघताना पाच मिनिटे उशीर झाला, एरवी बस थोडीफार उशिरा येते पण नेमकी आजच बस वेळेवर आल्याने माझी बस चुकली म्हणून यायला उशीर झाला.

आदित्य--- मिस मेघना मी तुम्हाला उशीर का झाला? हा प्रश्न विचारलाच नव्हता. उशीर होऊ शकतो पण उशीर होणार हे कळवायला हवे होते. माझा नंबर असेलच ना तुमच्याकडे.

मेघना--- हो आहे ना. पण माझ्या लक्षातच नाही आले की मला फोन करून कळवायला हवे.

आदित्य--- चुक तर तुमच्याकडून झालीच आहे, आता शिक्षेसाठी तयार रहा.

मेघना--- शिक्षा?

आदित्य--- हो शिक्षा झाली की पुढील वेळेस चुक करताना आपण खूप वेळा विचार करतो.

मेघना--- शिक्षा काय आहे?

आदित्य--- तुम्हाला एक तास उशीर झाला आहे, आता कंपनी सुटल्यावर एक तास उशिरा थांबून आपले काम पूर्ण करून जायचे आणि हो घरी फोन करून याची कल्पना द्या नाहीतर तुम्हाला उशीर झाला म्हणून तुमच्या घरचे सगळे काळजी करत राहतील.

    मेघना आपल्या डेस्कवर जाऊन कामाला लागते, जेवणाच्या सुट्टीत आईला फोन करून उशीर होणार असल्याचे कळवते. कंपनी सुटल्यावर शिवानी व बाकीचे टीम मेम्बर्स निघून जातात. मेघना तिचे काम करत असते. आदित्यही त्याच्या डेस्कवर बसून काम करत असतो. थोड्या वेळात आदित्यचे काम संपते तेव्हा तो बघतो तर मेघना काम करत असते. आदित्य घड्याळात वेळ बघतो तर बराच उशीर झालेला असतो. आदित्य मेघनाच्या डेस्ककडे येतो,

आदित्य--- मिस मेघना खूप उशीर झाला आहे, बाकीचे राहिलेले काम उद्या पूर्ण करा.

मेघना---(आदित्यकडे न बघता) सर दहा मिनिटांचे काम बाकी आहे तेवढे पूर्ण करून निघते, मला अर्धवट काम टाकून जायची सवय नाहीये.

आदित्य मेघनाचे बोलणे ऐकून तिथून निघून जातो. मेघना काम संपवून घड्याळात बघते तर खरच खूप उशीर झालेला असतो. मेघना आपली बॅग घेऊन कंपनीच्या बाहेर पडते. आदित्य तिचीच वाट बघत असतो.

आदित्य--- मिस मेघना मी तुम्हाला घरी सोडतो.

मेघना--- नाही नको, मी बसने जाईन.

आदित्य--- मिस मेघना, खूप उशीर झाला आहे तुम्हाला बस नाही भेटणार.

मेघनाला नाईलाजास्तव आदित्यच्या गाडीत बसावे लागते. आदित्य गाडी चालू करतो. गाडीत निरव शांतता असते, दोघेही एकमेकांशी बोलत नाहीत. आदित्य FM चालू करतो त्यावर आदित्यचे आवडते गाणे लागले असल्याने आदित्य आवाज वाढवतो,

अक्सर इस दुनिया मैं अनजाने मिलते हैं। अक्सर इस दुनिया मैं अनजाने मिलते हैं। अंजानी राहो मे मिलके खो जाते हैं लेकिन हमेशा वो याद आते हैं

आंखों से बात होती है। धडकन भी साथ होती हैं कोई ना समझें ये इश्क की जुबाँ

धीरे धीरे से वो दिल मैं बस जाते हैं। धीरे धीरे से वो दिल मैं बस जाते हैं। चोरी चोरी से वो दिल मैं बस जाते हैं फिर एक दिन वो बिछड जाते हैं

       गाणं चालू असताना गाडी अचानक बंद पडते.आदित्य गाडीला काय झाले बघण्यासाठी खाली उतरतो. जवळच गॅरेज असल्याने आदित्य मेकॅनिक ला बोलावतो. मेकॅनिक सांगतो, गाडी रिपेअर व्हायला पंधरा मिनिटे लागतील.

आदित्य--- मिस मेघना, गाडी रिपेअर व्हायला पंधरा मिनिटे लागतील तोपर्यंत इथे जवळच चहा खूप चांगला भेटतो, तो घेऊन येऊया का?

मेघनाला दुसरा पर्याय नसल्याने मेघना आदित्य सोबत जायला तयार होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all