चहा आणि बरंच काही भाग ३

Meghna's first day in company, meghna is part of aditya's team.

      आपण मागच्या भागात बघितलं, आदित्य त्याच्या कॉलेज मध्ये इंटरव्ह्यू घ्यायला आलेला असतो. मेघना त्याच कॉलेजची विद्यार्थिनी असते, ती इंटरव्ह्यू देते. मेघना इंटरव्ह्यू खूप छान देते, आदित्य तिच्या उत्तरांनी इम्प्रेस होतो. मेघनाला नोकरी मिळते.

       मेघनाची फायनल इअर ची एक्साम संपते, सर्व पेपर्स खूप छान जातात. एक्साम संपल्यावर थोड्याच दिवसात कंपनीत ट्रेनिंग सुरू होणार असते. मेघना कंपनीत नोकरी करण्यासाठी खूप उत्सुक असते.

         अखेर कंपनीत जाण्याचा पहिला दिवस उजाडतो, मेघना सकाळी लवकर उठते, स्वतःच सर्व आवरून तयार होते, देवाला नमस्कार करते, आई बाबांचा पाया पडते, मेघनाची आई तिच्या हातावर दही साखर देते. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मेघना थोडी लवकरच निघते. मेघनाची मैत्रीण शिवानीची पण नोकरीसाठी निवड झालेली असते. शिवानी व मेघना कंपनीत जाण्यासाठी बस स्टॉपवर भेटणार होत्या. मेघना बस स्टॉप वर शिवानीच्या आधी पोहोचली होती. पाच मिनिटांत शिवानी तेथे पोहोचते.

मेघना--- शिवानी किती उशीर? पहिल्याच दिवशी उशिरा जाण्याचा विचार आहे का?

शिवानी--- अगं झोपेतून उठायला थोडा उशीर झाला.

मेघना--- उद्यापासून लवकर उठत जा. बस आली तर मी निघून जाईल, तुझी वाट बघत बसणार नाही.

शिवानी--- हो ग, उद्यापासून लवकर येत जाईल.

तेवढ्यात बस येते, मेघना व शिवानी बस मध्ये चढतात. बसमध्ये आदित्य बसलेला असतो. आदित्य मेघनाकडे बघून स्माईल देतो, मेघना आदित्य कडे बघून न बघितल्यासारखी करते व मागच्या साईडला रिकाम्या सीटवर बसण्यासाठी जाते. शिवानीचेही लक्ष आदित्यकडे जाते,

शिवानी--- सर तुम्हीच आमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी कॉलेजमध्ये आला होता ना?

आदित्य--- हो, आज तुमचा ट्रेनिंगचा पहिला दिवस आहे ना.

शिवानी--- हो, तुम्ही रोज ह्याच बसने जाता का?

आदित्य--- नाही, मी माझ्या गाडीने जातो पण आज माझ्या गाडीचे चाक पंक्चर झाले होते म्हणून बसने यावे लागत आहे.

शिवानी--- ओके, सर माझी फ्रेंड मेघना मागे बसली आहे, मी तिकडे जाते.

शिवानी मेघना जवळ जाऊन बसते.

मेघना--- शिवानी अस अनोळखी लोकांशी एवढ्या गप्पा मारायच्या नसतात.

शिवानी--- अगं अनोळखी कुठे, आपला इंटरव्ह्यू यांनीच घेतला होता ना, शिवाय आता आपण एकाच कंपनीत काम करणार आहोत मग ओळख वाढवायलाच हवी ना.

     मेघना स्माईल न देता गेल्यामुळे आदित्य विचार करतो की ही मुलगी किती खडूस आहे? मी स्माईल दिली तरी एक स्माईल द्यायला काय जात होतं. मेघना जरा कॉम्प्लिकेटेड मुलगी वाटतेय, वैभव म्हणत होता तेच खरे आहे, जाऊदेत पण आपण तिच्या बद्दल एवढा विचार का करत आहोत?

      बस स्टॉप आल्यावर मेघना,शिवानी व आदित्य बस मधून उतरतात. आदित्य पुढे जातो त्याच्या पाठोपाठ मेघना व शिवानी जातात. बाहेरून कंपनी बघितल्यावर मेघना व शिवानी खूप खुश होतात, एवढ्या मोठ्या कंपनीत आपण काम करणार आहोत यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. 

       आदित्य कंपनीत जाऊन आपल्या कामाला लागतो. मेघना व शिवानी कंपनीत येऊन रिसेप्शन वर आपले जॉइनिंग लेटर दाखवतात. रिसेप्शनिस्ट त्यांना त्यांची जागा दाखवते. थोड्याच वेळात ट्रेनिंग साठी निवडण्यात आलेल्या सर्व candidates ला कॉन्फरन्स हॉल मध्ये एकत्र जमा करतात. कंपनीतील सिनिअर सर सर्व candidates ला कंपनीचे नियम व काम समजून सांगतात तसेच त्या सर्वांना ग्रुप मध्ये विभागतात, प्रत्येक ग्रुपसाठी आधी काम करत असलेल्या ऑफिसरमधून लीडर निवडतात. आदित्य एका ग्रुपचा लीडर असतो त्याच्या ग्रुपमध्ये मेघना व शिवानी असतात.

       कंपनीत प्रत्येक ग्रुपसाठी बसण्यासाठी एक जागा ठरवून दिलेली असते. आदित्य त्याच्या ग्रुपसाठी ठरवून दिलेल्या जागी येतो, ग्रुपमधल्या सर्वांसाठी सेपरेट डेस्क असतो. आदित्य ग्रुपमधल्या सर्वांना त्यांची काम समजावून सांगतो, काम करण्याचे नियम समजावून सांगतो. आदित्य कामाच्या बाबतीत खूप सिरीयस असतो, त्याला कामाबद्दल कुठलाही हलगर्जीपणा चालत नाही. सर्व जण कामाला सुरुवात करतात. मेघना तिचे काम चांगलेच एन्जॉय करत असते. मेघनाला काम पूर्ण करताना काहीतरी अडचण येते म्हणून ती अडचण सोडवण्यासाठी ती आदित्यकडे जाते. आदित्य त्याच्या कामात व्यस्त असतो.

मेघना--- excuse me सर

आदित्य--- (मेघनाकडे न बघता) यस

मेघना--- सर मला काम करताना एक प्रॉब्लेम आला आहे.

आदित्य--- मिस मेघना मी आत्ता खूप जास्त बिजी आहे, पंधरा मिनिटाने या, मग मी तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते बघतो.

मेघना--- ओके सर

मेघना जाऊन आपल्या डेस्कवर बसते.

शिवानी--- काय झालं मेघना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का?

मेघना--- आपला टीम लीडर खूप खडूस आहे, तो खूप बिजी आहे, थोड्या वेळाने बोलावले आहे.

शिवानी--- अगं मग खरच बिजी असेल, त्यात खडूस असण्याचा काय संबंध? मला तर आदित्य सर खूप डिसेंट वाटतात.

मेघना--- त्या खडूसने बोलताना माझ्याकडे वर बघितलं सुद्धा नाही.

शिवानी--- अरे सर कामात बिजी असतील, सोड ना, किती विचार करत आहेस, तसही तु सुद्धा कॉलेज मध्ये असताना कोणी मुलगा तुझ्याकडे आल्यावर तु त्याच्याकडे बघत नव्हती. आता तुला त्या मुलांच्या भावना कळल्या असतील.

मेघना--- तु तर कुठल्याही गोष्टी उकरून काढतेस. ते सगळं सोड, तुझं काम कर.

               पंधरा मिनिटं झाल्यावर मेघना आदित्यकडे जाते, आदित्य मेघनाला असलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, मेघना आदित्यला स्माईल देऊन थँक्स म्हणते पण आदित्य तिच्याकडे बघतही नाही. मेघना तेथून जाताना तोंडातल्या तोंडात खडूस बोलते व निघून जाते. अशा रीतीने मेघनाचा कंपनीतला पहिला दिवस जातो. कंपनी सुटल्यावर मेघना व शिवानी बस स्टॉप वर बसची वाट बघत असतात, तेवढ्यात तिथे आदित्य येतो, आदित्य शिवानीला स्माईल देतो पण मेघनाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. थोड्याच वेळात बस येते, तिघेही बसमध्ये बसतात. आदित्यचे मेघनाकडे दुर्लक्ष करणे हे मेघनाला खूप खटकते. मेघना व शिवानी त्यांचा स्टॉप आल्यावर बस मधून उतरतात.

शिवानी--- चल मेघना उद्या सकाळी स्टॉप वर भेटूया.

मेघना--- शिवानी माझं काही चुकलं आहे का?

शिवानी--- का ग? अस का विचारतेयस?

मेघना--- आत्ता बस स्टॉप वर आदित्य सरांनी तुझ्याकडे बघून स्माईल दिली पण माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही.

शिवानी--- तु सरांशी काही उद्धट बोलली होती का ज्याने ते हर्ट झाले असतील.

मेघना--- नाही ग, अरे हो आठवलं मी सकाळी बस मध्ये चढल्यावर सरांनी माझ्याकडे बघून स्माईल दिली होती पण मी त्यांच्याकडे बघून दुर्लक्ष केलं. शिवानी मी मुद्दामून नव्हतं केलं, मला मुलांना स्माईल द्यायची सवय नाहीये.

शिवानी--- तुझा स्वभाव सरांना कसा माहीत असेल, उद्या योग्य वेळ बघून सरांना सॉरी म्हण, म्हणजे त्यांच्या मनात तुझ्याबद्दल जर काही गैरसमज झाला असेल तर तो दूर होईल. शेवटी आपल्याला सोबत काम करायच आहे.

मेघना--- हो तु म्हणते ते खरं आहे. चल आता घरी जाऊया आई वाट बघत असेल.

  मेघना शिवानीला बाय म्हणून घरी जाते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all