चहा आणि बरंच काही भाग २२

Story of friendship

           आपण मागील भागात बघितलं, आदित्यने मेघनाला प्रपोज केलं आणि मेघनानेही होकार दिला.

आदित्य--- Thank god, तु हो म्हणालीस, तु नाही म्हणाली असतीस तर माझं काय झालं असत?

मेघना--- मला वाटलं होतं की तुझं शाल्मली वर प्रेम असेल. आज तु मला प्रपोज करणार होतास म्हणून मला कॅफेत घेऊन गेला होता वाटतं.

आदित्य--- हो मेघना मला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत. शाल्मली माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाल्मली US मध्ये असताना एका मुलासोबत लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होती आणि तिचा लग्न ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये सो मी अशा मुलीच्या प्रेमात पडूच शकत नाही.

मेघना--- ओके, तुला अश्या रीतीने प्रपोज करायची आयडिया कोणी दिली होती?

आदित्य--- मी याबद्दल शिवानीला विचारले होते तेव्हा तिने मला सांगितले की तुला साध्या सरळ पद्धतीने प्रपोज केलेलं आवडेल.

मेघना--- शिवानीने मला काहीच सांगितलं नाही.

आदित्य--- मीच तिला सांगितलं होतं की तुला काहीच सांगायचं नाही. आज मी तुला सोन्याची अंगठी देऊ शकलो असतो पण मी अंगठी तुला सर्वांसमोर घालणार आहे असं एकांतात नाही.

मेघना--- आदित्य आपल्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील ना?

आदित्य--- माझ्या आईला तु सून म्हणून पसंत आहेस आता राहिला विषय बाबांचा तर बाबा नाही म्हणतील अस मला वाटत नाही.

मेघना--- माझ्या आईलाही तु आवडतोस म्हणजे आमच्यात कधी तसा काही विषय झाला नाहीये.

आदित्य--- आणि तुझे बाबा?

मेघना--- माझे बाबा कडक स्वभावाचे आहेत, त्यांच माझ्यावर खूप प्रेम आहे पण कधी ते शब्दात व्यक्त करत नाहीत, माझ्या मनात त्यांच्या बद्दल आदरयुक्त भीती आहे, आमच्यात फ्रेंडली रिलेशन नाहीये.

आदित्य--- तुझ्या आनंदासाठी ते नक्कीच तयार होतील, मी त्यांना पटवून देईल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि मी तुला किती सुखात ठेऊ शकतो.

मेघना--- तुला बाबांना इम्प्रेस करायचा एक चान्स आहे.

आदित्य--- कधी?

मेघना--- विद्या दिदीच्या लग्नात.

आदित्य--- अरे हो की, लग्न पुढच्या आठवड्यात आहे ना. 

मेघना--- हो, आदित्य निघुयात का? घरी जायला उशीर नको व्हायला.

आदित्य--- हो चालेल, जशी आपली आज्ञा मॅडम.

     आदित्य व मेघना तेथून निघतात, आदित्य मेघनाला तिच्या घरी सोडतो व तो त्याच्या घरी निघून जातो. आदित्यने प्रपोज केल्यामुळे मेघनाला त्यांच्या नात्याला वेगळे वळण मिळाले होते. घरी आल्याबरोबर मेघनाने शिवानीला फोन लावला, शिवानीचा फोन बिजी लागत होता, थोडया वेळात शिवानीने मेघनाला फोन केला,

शिवानी--- बोला मॅडम, काय म्हणत आहात?

मेघना--- शिवानी इतक्या वेळ फोन बिजी ठेवायचा असतो का? सारी मजाच घालवून दिली.

शिवानी--- अगं संकेतचा फोन चालू होता, बोल काय म्हणतेस?

मेघना--- आदित्य मला प्रपोज करणार आहे हे माझ्यापासून लपवून का ठेवलेस? तु माझी मैत्रीण आहेस की त्याची?

शिवानी--- आदित्यने प्रपोज केलं सुद्धा, मी तुझीच मैत्रीण आहे म्हणून तुला आधी काही सांगितलं नाही. काही सरप्राईज नावाची गोष्ट आहे की नाही.

मेघना--- हो ते आहेच. आदित्यने अस प्रपोज केलंय ना की जे मी कधीच विसरू शकणार नाही.

शिवानी--- मग पुढे काय करायचे ठरवले आहे?

मेघना--- आईला सांगण्याचा विचार करतेय मग बघू आई काय म्हणते त्यावर पुढील घडामोडी अवलंबून असेल.

शिवानी--- लवकरात लवकर काकूंना सांग म्हणजे एकेक पाऊल पुढे चालायला सोपं होईल.

मेघना--- हो आईला आजच सांगते आणि बाबांना विद्या दिदीच लग्न झाल्यावर सांगेल.

शिवानी--- ऐक ना मेघना, आपण उद्या भेटल्यावर सविस्तर बोलूया, संकेतचा फोन येत आहे.

मेघना--- हो चालेल, बाय.

       शिवानीशी बोलून झाल्यावर मेघना जेवण करण्यासाठी किचनमध्ये जाते, जेवणासाठी आई तिची वाट बघत बसलेली असते.

आई--- मेघना, चल आपण जेवण करून

 घेऊया.

मेघना--- आई बाबा कुठे आहेत? ते जेवायला येणार नाहीयेत का?

आई--- बाबांच्या ऑफिसमधील एक सहकारी रिटायर झालेत, त्यांची रिटायरमेंटची पार्टी आहे, बाबांना यायला उशीरच होईल.

मेघना--- आई मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे.

आई--- अगं मग बोल ना, आईशी बोलायला तुला परमिशन केव्हा पासून लागायला लागली.

मेघना--- आई आज आदित्यने मला प्रपोज केलंय, लग्न करशील का? म्हणून विचारलं आहे.

आई--- मग तु काय उत्तर दिलं?

मेघना--- मी होकार दिला आहे, आई तुला आदित्य कसा वाटतो?

आई--- मला आदित्य पहिल्यापासूनच आवडतो, मुलगा चांगला आहे आणि विशेष म्हणजे तुला आवडला आहे ना मग बस झालं.

मेघना--- आई बाबा लग्नाला हो म्हणतील ना.

आई--- विद्याचं लग्न झालं की मी स्वतः बाबांशी बोलेल आणि शिवाय त्यावेळी मनोजही इथे असेल सो आपल्याला त्याच मतही कळेल.

मेघना--- दादा कधी येणार आहे? मला माहित पण नाही.

आई--- अगं आजच त्याचा फोन आला होता, अचानक सुट्टी मंजूर झाली आणि विद्याचं लग्नही आहे म्हणून येऊन जातो म्हणाला.

मेघना--- दादाला भेटून खुप दिवस झाले, किती बरं होत आहे दादा विद्या दिदीच्या लग्नाला येईल तर. आई विद्या दिदीच्या लग्नाला आदित्यही असणार आहे.

आई--- कसा काय?

मेघना--- वैभव जिजू आणि आदित्य कॉलेजचे मित्र आहेत ना.

आई--- अरे हो मी विसरलेच होते.

मेघना--- आई तुझ्याकडून आमच्या नात्याला ग्रीन सिग्नल आहे असं समजू का?

आई--- हे बघ मेघना, मी आदित्यला फक्त एकदाच भेटली आहे, तो मला आवडला, साधा सरळ मुलगा वाटला पण त्याच्या फॅमिली बद्दल, आई वडिलांबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही. लग्न म्हणजे हे फक्त मुला आणि मुलीच नसतं तर एका फॅमिलीच दुसऱ्या फॅमिली सोबत असतं, लग्नामुळे अनेक नाती जोडली जातात, आपल्याला हे सगळं लक्षात घ्याव लागेल आणि शेवटी तुझ्या बाबांचा निर्णय अंतिम असेल. माझा तुला पाठींबा असेलच.

मेघना--- आई तुझ्या किंवा बाबांच्या दोघांच्याही इच्छे विरोधात जाऊन मला काहीच करायच नाहीये. तु एकदा आदित्यच्या आईला भेटून बघ त्या खूप चांगल्या आहेत, तुलाही नक्कीच आवडतील.

आई--- विद्याचं लग्न होऊन जाऊदे मग बघू.

©®Dr Supriya Dighe

     

🎭 Series Post

View all