चहा आणि बरंच काही भाग १९

Story of friendship

      आपण मागील भागात बघितलं, मेघना शिवानीच्या घरी जाते त्यावेळी शिवानीच्या बाबांमध्ये व तिच्यात शिवानीच्या लग्नाबद्दल चर्चा होते, त्या चर्चेतून शिवानीच्या बाबांना शिवानीच्या US बद्दल असणाऱ्या क्रेज विषयी कळते म्हणूनच शिवानीचे बाबा शिवानीच्या आणि तिच्यासाठी सांगून आलेल्या US मधील मुलाच्या लग्नाला संमती दर्शवतात.

         शिवानीच्या पाठोपाठ मेघना तिच्या रूम मध्ये जाते.

मेघना--- अरे वा माझ्या मैत्रिणीला लाजताही येत हे मला माहितच नव्हतं.( शिवानी लाजून मेघनाला मिठी मारते) शिवानी ही मिठी मला मारायची होती की माझ्या जिजूंना.

शिवानी--- मेघना गप ग, तुच बाबांना समजावलं ना.

मेघना--- मी कशाला समजावू, मी फक्त तुला US किती आवडतं हे सांगितलं, अगं कुठलेही वडील आपल्या मुलीच्या आनंदासाठी काहीही करू शकतात.

शिवानी--- मेघना मला US ला जायचा क्रेज पहिल्यापासूनच होता पण ते अश्या रीतीने पूर्ण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

मेघना--- आमचे जिजू कसे आहेत? फोटो दाखव ना आणि मला माझ्या जिजूंचे नाव पण नाही माहीत.

शिवानी--- संकेत नाव आहे, अरे तो जाम भारी आहे, स्मार्ट, हँडसम आणि बोलायला तर आपल्या सारखाच आहे, साधा सरळ, अगदी मला जसा हवा तसाच आहे.

मेघना--- अगं बस बस किती कौतुक करशील, संकेत जिजूंना एकदा तरी भेटावं लागेल.

शिवानी--- हो मग, मलाही संकेतला माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटवायचे आहे. 

मेघना--- आपण मस्तपैकी काहीतरी प्लॅन करूया.

शिवानी--- हो नक्कीच, तुझं आणि अदित्यच कुठं पर्यंत आलंय.

मेघना--- तुझं होऊन जाऊ दे मग माझं बघू.

     अशा प्रकारे मेघना व शिवानी मध्ये बऱ्याच गप्पा होतात. मेघना घरी गेल्यावर आदित्यला फोन करून शिवानीच लग्न जमल्याची बातमी सांगते. दुसऱ्या दिवशी मेघना शिवानीला बस स्टॉप वर भेटल्यावर मेघनाला समजते की एका आठवड्याने शिवानीचा साखरपुडा आहे. शिवानी ऑफिस मधून चार पाच दिवसांसाठी सुट्टी घेणार असल्याचे मेघनाला सांगते. मेघना शिवानीसाठी खूप खुश असते. मेघना शिवानीला साखरपूडयासाठी शॉपिंग करायला मदत करणार असते. आता मेघना शिवानीसोबत जास्त बिजी असायची तिचे आदित्य सोबत बोलणे कमी होऊ लागले होते. दोन तीन दिवस झाले पण मेघना आदित्य सोबत जास्त बोलत नव्हती म्हणून आदित्यने मेघनाला फोन केला,

मेघना--- हा बोल आदित्य, काय म्हणतो आहेस? काही काम होत का?

आदित्य--- तु बिजी आहेस का?

मेघना--- हो रे शिवानीचा साखरपुडा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय, अजून बरीच कामे बाकी आहेत.

आदित्य--- तुझ्याकडे हल्ली माझ्यासोबत बोलायला वेळच नसतो.

मेघना--- तुला राग आलाय का? आणि आला असेल तरी सध्या मी काहीच करू शकत नाही.

आदित्य--- माझी काहीच किंमत नाहीये वाटतं.

मेघना--- आदित्य तस नाहीये, प्लिज रागावू नकोस, शिवानी माझी खूप जवळची मैत्रीण आहे सो मला तिला वेळ द्यावाच लागेल. तु साखरपुड्याला येणार आहेस ना.

आदित्य--- बघू अजून ठरवलं नाहीये.

मेघना--- बघू नाही येणार आहेस अस म्हण, तुझ्यासाठी एक सरप्राईज असणार आहे.

आदित्य--- सरप्राईज आणि माझ्यासाठी काय असणार आहे?

मेघना--- फक्त तुझ्यासाठीच नाही तर शिवानी साठी पण असणार आहे.

आदित्य--- मग तर मला यावच लागेल.

मेघना--- आदित्य आपण शिवानीचा साखरपुडा झाल्यावर निवांत बोलूयात.

आदित्य--- ओके चालेल.

     आदित्य मेघनाशी बोलून झाल्यावर ह्या विचारात पडतो की मेघना काय सरप्राईज देणार असेल? आदित्य विशालला फोन करून शिवानीच्या साखरपुड्याला येण्यासाठी तयार करतो.

       शिवानीच्या साखरपुडयाचा दिवस उजाडतो. आदित्य साखरपूडयासाठी जाताना नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स घालतो त्यात आदित्य खूपच हँडसम दिसत असतो. विशाल आदित्यला घेण्यासाठी त्याच्या घरी येतो. विशाल आदित्यच्या लुकला बघून मेघना वरून त्याला चिडवतो. आदित्यची आई विशालला आदित्यला चिडवण्यात साथ देते. आदित्य दोघांना कसतरी शांत करतो व घरातून निघतो.

विशाल--- आदित्य खरं खरं सांग तु मेघनाच्या प्रेमात पडला आहेस ना.

आदित्य--- तुझं काय चाललंय? आईसमोर सुदधा तु मला मेघना वरून चिडवत होतास.

विशाल--- हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, अरे काकूंनाही मेघना आवडतेय, मग घोड अडलंय कुठे?

आदित्य--- मला मेघना आवडते पण एक मैत्रीण म्हणून, मला तिच्याशी बोलायलाही आवडतं पण आमचं नातं अजून मैत्रीच्या पुढे गेलं आहे असं मला वाटत नाही.

विशाल--- अरे भावा तु मेघनाच्या प्रेमात पडला आहेस हे तुझं तुलाच कळत नाहीये, नीट विचार कर म्हणजे तुझं तुलाच कळेल आणि हो मेघना दुसरा कोणी घेऊन जाईल त्याआधी तिला तुझ्या मनातील भावना सांग.

आदित्य--- मला जरी ती आवडत असेल पण तिला मी आवडायला हवा ना.

विशाल--- अरे त्यासाठी तुला तुझं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करावं लागेल मगच तुला तिच्या मनात काय चालू आहे ते कळेल.

आदित्य--- तु म्हणतो तेही खरे आहे, मी जरा विचार करतो.

     आदित्य व विशालला गप्पा मारत असताना साखरपुडयाचा हॉल कधी आला हेही समजले नाही. आदित्य व विशाल गाडी पार्क करून हॉल मध्ये जातात, कंपनीतील बाकीचे कलीगही आलेले असतात त्यांच्यासोबत आदित्य व विशाल जाऊन बसतात. आदित्यची नजर मेघनाला शोधत असते पण मेघना काही आदित्यच्या नजरेला दिसत नाही. थोडा वेळ असाच निघून जातो, काही वेळाने मेघना आदित्य व त्याच्या ग्रुपच्या दिशेने येते. मेघनाने पिंक कलरचा वनपीस घातलेला असतो त्यात मेघना अतिशय सुंदर दिसत असते, त्यावर मॅचिंग ज्वेलरी घातलेली असते, आणि हलकासा मेकअप केलेला असतो. आदित्यची नजर मेघना वरून हटतच नसते. आदित्य मेघनाकडे एकटक बघत असतो, मेघना त्याच्या समोर येऊन उभी राहते तरी त्याची नजर तिच्यावरून हटलेली नसते. मेघना इतर कलीग सोबत बोलण्यात व्यस्त होते. विशाल व मेघना दोघांनाही समजते की आदित्य एकटक मेघनाला बघत आहे, तेव्हा विशाल आदित्यला हलवून सांगतो, मेघना समोर उभी आहे तिच्याकडे फक्त बघत बसू नको तर तिच्याशी काहीतरी बोल. मेघना इतर कलीग सोबत फोटो काढत असते,नंतर आदित्य व विशालही त्यांना जॉईन होतात. विशाल मेघना व आदित्यचा सेपरेट फोटो काढण्यासाठी फोर्स करतो, फोटो काढत असताना आदित्य मेघनाच्या कानात हळूच सांगतो, You're looking so pretty. हे ऐकल्यावर मेघना लाजते हा क्षण विशाल कॅमेऱ्यात कैद करतो. विशालला दोघांकडे पाहून समजते की हे एकमेकांच्या प्रेमात आहे, तो विचार करतो की पण हे ह्या दोघांना कधी कळणार कुणास ठाऊक.

      मेघनाच्या फ्रेंड्स मेघनाला आवाज देतात त्यामुळे मेघनाला तेथून निघावे लागणार असते, मेघना निघत असताना आदित्य तिला विचारतो, सरप्राईज कुठे आहे?

"जस्ट वेट अँड वॉच, सबर का फल मिठा होता है", एवढं बोलून मेघना तेथून निघून जाते.

      मेघना आदित्यला काय सरप्राईज देते बघूया पुढील भागात.

🎭 Series Post

View all