चहा आणि बरंच काही भाग १७

Story of friendship

       आपण मागील भागात बघितलं, मेघना व आदित्य मध्ये शाल्मली वरून चर्चा होते. मेघनाच्या घरी तिची सुलू मावशी व विद्या दीदी आलेली असते, विद्या दीदीचे लग्न आदित्यच्या मित्राशी म्हणजेच वैभवसोबत होणार असते. विद्या दीदी मेघनाला विचारते की आदित्य व तिच्यात काही चालू आहे का? यावर मेघना विषय टाळून तेथून निघून जाते.

        मेघना बऱ्याच दिवसांनी सुलू मावशीला व विद्या दिदीला भेटल्याने त्यांच्यात खूप गप्पा रंगतात, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यात गप्पा चालू असतात. दुसऱ्या दिवशी मेघना शिवानीला विद्या दीदी व मावशी घरी आल्याबद्दल सांगते आणि त्यांच्यात झालेल्या संभाषणाची कल्पनाही देते.

मेघना--- शिवानी विद्या दीदी मला आदित्य बद्दल विचारत होती, ती बोलली की तुला जर आदित्य आवडत असेल तर मी आणि वैभव तुझी मदत करू शकतो.

शिवानी--- मग तु काय सांगितलंस?

मेघना--- मी सांगितलं की आमच्यात फक्त मैत्रीच आहे.

शिवानी--- अरे वेडी आहेस का? विद्या दिदीला सगळं खरं सांगायचं ना.

मेघना--- अगं बाई मला आदित्य आवडतो पण मी त्याला आवडायला हवी ना.

शिवानी--- विद्या दिदीच सोड, तु आदित्य सोबत शाल्मली बद्दल बोलणार होतीस ना, त्याच काय झालं?

मेघना--- मी बोलले त्याच्यासोबत, त्याचे उत्तर असे होते की त्याच्यात व शाल्मली मध्ये मैत्रीच्या पलीकडे व प्रेमाच्या अलीकडे असे नाते आहे. मग आता मी काय समजायचे, आदित्य व शाल्मलीत खूप छान बॉण्ड आहे.

शिवानी--- आदित्य फिल्मी आहे वाटतं.

मेघना--- का?

शिवानी--- मूव्हीतला डायलॉग मारला म्हणून म्हणाले.

मेघना--- ओके, आदित्यच्या मनात काय चालू आहे तेच कळत नाहीये, मला माझं प्रेम आदित्यवर लादायच नाहीये. आणि शिवाय आदित्य त्याच्या आईला पसंत असलेल्या मुलीशीच लग्न करणार आहे.

शिवानी--- ओके, मला तुला काही तरी सांगायचंय.

मेघना--- काय बोल ना.

शिवानी--- काल माझी पनवेलची आत्या घरी आली होती, तिच्या पुतण्याचं स्थळ घेऊन आली होती.

मेघना--- अरे वा, काय करतो मुलगा?

शिवानी--- कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केल्यानंतर US मध्ये जाऊन MS केलं आहे आणि आता तिथेच जॉब करत आहे.

मेघना--- वाव, एवढं ऐकूनच तु फ्लॅट झाली असशील. 

शिवानी--- तुला तर माझा US बद्दलचा क्रेज माहीतच आहे, मागच्या महिन्यात माझ्या आत्याच्या मुलीच लग्न होत त्यावेळी त्याने व त्याच्या आई वडिलांनी मला बघितलं आणि स्वताहून आत्त्याकडे माझ्यासाठी विचारलं.

मेघना--- मस्तच ना म्हणजे विषय फायनल झाला म्हणायचं.

शिवानी--- आपलं नशीब एवढं भारी आहे का सगळं आपल्या मनाप्रमाणे व्हायला, बाबा म्हणत आहेत की एकुलत्या एक मुलीला एवढ्या लांब का द्यायच? तुला तर माहीतच आहे की माझे बाबा माझ्या बाबतीत किती हळवे आहेत.

मेघना--- तु बाबांना समजवायच ना.

शिवानी--- मी बोलायच्या आधी माझ्या आत्याने बाबांना खूप समजावलं आहे, ती बोलली की हा मुलगा माझ्यापुढे लहानाचा मोठा झालेला आहे, संस्कारी, सुस्वभावी,निर्व्यसनी आहे आणि शिवाय तो पुढील दोन वर्षांनी भारतात परतणार आहे, तेव्हा कुठे जाऊन बाबा तयार झाले.

मेघना--- मग आता पुढे काय?

शिवानी--- येत्या रविवारी मुलगा व त्याच्या घरचे लोक आमच्याकडे येणार आहेत, मग बघू पुढे काय काय होईल 

मेघना--- शिवानी मस्तच ना.

शिवानी--- बाबांच्या इच्छेविरुद्ध मला लग्न नाही करायचय, बाबा आत्ता तर हो म्हणाले पण मुलाला भेटल्यावरच फायनल निर्णय घेणार आहेत.

मेघना--- डोन्ट वरी, काका रेडी होतील, कुठलेही मुलीचे वडीलआपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करतात.

शिवानी--- हो ते आहेच, बघू आता काय होईल.

        कंपनीत आल्यावर मेघना आणि शिवानी त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. कामात अडचण आल्यावर ती अडचण सोडवण्यासाठी मेघना आदित्यकडे गेली.

मेघना--- आदित्य ह्या फाईल मध्ये काय एरर येत आहे जर बघ ना.

आदित्य--- ते बघतो मी, पण मला हे सांग काल एवढी कशात बिजी होतीस की गुड नाईटच्या मॅसेजला रिप्लाय केला नाहीस.

मेघना--- अरे घरी पाहूणे आलेले होते.

आदित्य--- मग एक मॅसेज करायला कितीसा वेळ लागतो?

मेघना--- माझी मावशी व दीदी खूप दिवसांनी घरी आल्या होत्या, त्यांच्याशी गप्पा मारता मारता खूप वेळ झाला मग तुला मॅसेज करायच राहून गेलं.

आदित्य--- तुझ्यासाठी पाहुणे जास्त महत्त्वाचे आहेत वाटतं, मी मॅसेज करायला विसरलो तर लगेच नाराज व्हायच आणि तु विसरलीस तर तुला काम होतं.

मेघना--- चिडचिड करण्यापेक्षा पनिशमेन्ट सांग.

आदित्य--- माझ्यासोबत शॉपिंगला यायचं.

मेघना--- शॉपिंग, काय विशेष?

आदित्य--- वैभवच लग्न आहे सो त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय आणि माझ्यासाठीही जरा चांगले कपडे घ्यायचेय, त्याच्या लग्नात एखादी मुलगी पटली तर बघू.

मेघना--- मी पण असणार आहे त्या लग्नात.

आदित्य--- माहितीये मला, तुला पटवायची काही गरज आहे का? 

मेघना--- म्हणजे?

आदित्य--- तु पटायची असती तर एवढ्या दिवसात पटलीच असती.

मेघना--- तु पटवण्याचा कधी प्रयत्न केलास का?

तेवढ्यात सिनिअर ऑफिसर तिथे येतात आणि मेघना व आदित्यला रागवायला सुरुवात करतात, आदित्य , मेघना हे ऑफिस आहे कॉलेज कट्टा किंवा कँटीन नाही, मी केव्हाच तुमच निरीक्षण करतोय, मी आल्याचे तुमच्या लक्षात आले नाही, तुमची जी काही थेरं चालू असतील ती ऑफिसच्या बाहेर, असलं काही इथे खपवून घेतलं जाणार नाही.

आदित्य--- (रागात) एक मिनिटं सर, तुम्ही सिनिअर आहात म्हणून तुमचं काहीही बोलणं मी ऐकून घेणार नाही, आमची थेरं चालू आहे म्हणजे? आम्ही काय करत होतो? एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसलो होतो की काही आक्षेपार्ह करत होतो, मेघनाला एक फाईल मध्ये एरर येत असल्याने ती माझ्याकडे घेऊन आली होती, सर कंपनीचे नियम आम्हालाही कळतात पण तुमचं असलं काही बोलण मी खपवून घेणार नाही.

सिनिअर--- तुला कळतंय का की तू कोणाशी बोलत आहेस? याचे परिणाम काय होतील याची जरा जरी कल्पना आहे का?

आदित्य--- तुम्ही करून करून काय करणार? नोकरीवरून काढून टाकणार, बरोबर ना, तुम्ही काय करू शकता याची मला पूर्ण कल्पना आहे पण मी तुम्हाला आमची माफी मागायलाच लावणार आणि मगच शांत बसणार तोपर्यंत नाही. तुम्ही तुमच्या केबिन मध्ये काय काय करतात हे पूर्ण कंपनीला माहीत आहे आणि हे मला शिकवत आहेत.

     आदित्यचा चेहरा रागाने लालबुंद झालेला होता तर मेघना खूप घाबरलेली होती, ऑफिस मधील सर्व सहकारी जमा झाले होते, सिनिअर ऑफिसर आदित्यकडे रागाने बघत तेथून निघून जातो.आदित्यला त्याचे सहकारी पाणी प्यायला देतात व शांत बसवण्याचा प्रयत्न करतात तर शिवानी मेघनाला त्यांच्या डेस्ककडे घेऊन जाते

©®Dr Supriya Dighe

         

🎭 Series Post

View all