चहा आणि बरंच काही भाग १६

Story of friendship

     आपण मागील भागात बघितलं, शिवानी व मेघनाची भेट मॉलमध्ये आदित्य व शाल्मली सोबत होते. शाल्मली व शिवानी मध्ये मस्त गप्पा होतात, मेघना शाल्मली सोबत फारशी काही बोलत नाही.

      शिवानी आणि मेघना मॉल मधून शॉपिंग करून बाहेर पडतात.

शिवानी--- मेघना आजचा दिवस मस्त गेला. मूव्ही, शॉपिंग शिवाय शाल्मली सोबत मस्त गप्पा झाल्या. शाल्मली US मधून शिकून आली असली तरी तिच्यात ATTITUDE अजिबात दिसले नाही. भारी मुलगी आहे, साधी सरळ.

(शिवानी एकटीच बडबड करत होती, मेघना मात्र खूप शांत होती)

शिवानी--- मेघना तुझं लक्ष कुठे आहे? मी शाल्मली बद्दल बोललेलं तुला आवडलं नाहीये का?

मेघना--- शिवानी शाल्मली व आदित्य मध्ये खूप छान बॉंडिंग दिसतेय, शाल्मली आदित्यला कशी आदू आदू करत होती आणि आदित्य शालू शालू, मला वाटतंय मी आदित्यचा विचार माझ्या मनातून काढून टाकावा, जितक्या लवकर आदित्यचा विषय डोक्यातून काढेल ते माझ्यासाठी चांगलंच असेल.

शिवानी--- अगं अस का बोलत आहेस?

मेघना--- मला वाटतंय की आदित्यला शाल्मली आवडत असेल.

शिवानी--- आवडत असेल आणि आवडते यात खूप फरक आहे, तुझ्यात आणि आदित्य मध्ये छान मैत्री आहे ना तर त्याच नात्याने त्याला शाल्मली बद्दल काय वाटत हे विचार म्हणजे सर्वच क्लिअर होईल.

मेघना--- You are right शिवानी, मी आदित्यला डायरेक्ट विचारते, म्हणजे माझ्या मनातील शंकेचे निरसन होईल.

शिवानी--- That's like a good girl.

      मेघना ठरवते की शाल्मली बद्दल आदित्यला काय वाटतंय हे त्यालाच विचारुयात. दुसऱ्या दिवशी कंपनीत गेल्यावर मेघना आदित्यला सांगते की कंपनी सुटल्यावर चहा प्यायला जाऊया.ठरल्याप्रमाणे आदित्य व मेघना कंपनी सुटल्यावर आदित्यचा आवडता चहा प्यायला जातात.

आदित्य--- मेघना आज चहा पिण्याची लहर कशी काय आली?

मेघना--- असंच, खूप दिवस झाले आपण सोबत चहा प्यायला आलोच नाही ना.

आदित्य--- होना, शाल्मली आल्यापासून तर आपल्या निवांत गप्पाही होत नाहीये.

मेघना--- शाल्मलीचा स्वभाव मस्त आहे, attitude बिलकुल नाहीये.

आदित्य--- हो खूप बिनधास्त मुलगी आहे, तुला सांगू मेघना तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचे सोल्युशन असते, कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी ती तो सॉल्व्ह करायला सोल्युशन शोधूनच काढते.

मेघना--- तुमची लहानपणापासून बॉंडिंग अशीच आहे का?

आदित्य--- नाही, लहान असताना आमच्यात खूप भांडणं व्हायची, दहावीच्या सुट्टीत ती आमच्या घरी आली होती तेव्हा आमच्यात मैत्री झाली होती आणि ती आजपर्यंत टिकून आहे. आम्ही एकमेकांशी सगळं काही शेअर करतो म्हणजे ती तिच्या अफेअर, ब्रेकअप बद्दल सर्व सांगते, आम्ही एकमेकांपासून काहीच लपवून ठेवत नाही, मी कॉलेजमध्ये असताना ती एकदा माझ्यासोबत कॉलेज मध्ये आली होती तेव्हा माझ्या सर्व मित्रांना वाटायच की ती माझी गर्लफ्रेंड आहे.

मेघना--- शाल्मलीला बॉयफ्रेंड आहे का?

आदित्य--- होता, आत्ता नाहीये, US मध्ये असताना एक सिनिअरला पटवल होतं, तो भारतीयच होता का तर म्हणे अभ्यासात मदत होईल म्हणून, ती वेडी आहे.

मेघना--- तुला शाल्मली आवडते का? तुमच्यात काही आहे का?

आदित्य--- शाल्मली मला आवडते पण एक मैत्रीण, गाईड, सल्लागार म्हणून, आमचं नात जे मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे अस आहे.

मेघना--- तुमच्या दोघांत एवढी छान बॉंडिंग आहे तर मग तुम्ही मैत्रीच्या नात्याला पुढे नेण्याचा विचार का करत नाहीत?

आदित्य--- मेघना माझ्यासाठी प्रेम आणि मैत्री ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

मेघना--- एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायची सुरुवात मैत्रीपासूनच होते ना.

आदित्य--- हो नक्कीच, मी शाल्मलीचा विचार त्या दृष्टीने केलाच नाहीये आणि भविष्यात करेल की नाही ते आताच नाही सांगू शकत.

मेघना--- बरं मला सांग, शाल्मली सोडून तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी येऊन गेली आहे का किंवा आहे का?

आदित्य--- आज तुला झालं तरी काय? माझी अगदी कडेकोट चौकशी चालू आहे.

मेघना--- just curiosity, सांग ना.

आदित्य--- मी कॉलेजमध्ये असताना एक मुलगी मला आवडायची, फर्स्ट क्रश म्हणू शकते पण तिला आधीच बॉयफ्रेंड असल्याने आणि शिवाय ती स्मोकही करायची त्यामुळे आमच्यात पुढे काही गेलंच नाही.शाल्मली नंतर जर मी कुणा मुलीशी मैत्री केली असेल तर ती फक्त तूच आहेस.

मेघना--- तु लव्ह मॅरेज करणार आहेस की अरेंज?

आदित्य--- मला लव्ह मॅरेज करायला आवडेल पण ती मुलगी आईला आवडली पाहिजे.

मेघना--- आणि आईला नाही आवडली तर

आदित्य--- नाही करणार.

मेघना--- काकूंना शाल्मली आवडत असेल तर.

आदित्य--- शाल्मली चांगलीच आहे, जर आईला ती आवडली तर करेन मी तिच्याशी लग्न.

मेघना--- अजून तुझ्या आयुष्यात अस स्पेशल कोणी आलेलं नाही असं म्हणावं लागेल.

आदित्य--- अस नाही म्हणता येणार, स्पेशल व्यक्ती आलीही असेल पण स्पेशल वेळ नाही आली अस म्हणावं लागेल.

मेघना--- चला निघुयात का? घरी जायला उशीर होईल.

आदित्य--- चालेल, माझ्या बद्दल सर्व काढून घेतलंत, आता तुझ्या बद्दल कधी सांगशील?

मेघना--- पुढील वेळेस

आदित्य--- आता सोडतो पण पुढच्या वेळेस तुला गुपचुप सर्व सांगावं लागेल.

       आदित्य मेघनाला घरी सोडतो व आपल्या घरी निघून जातो. मेघना घरी गेली तर तिच्या घरी पाहुणे आलेले होते, मेघनाची मावशी आणि मेघनाची मावस बहीण आलेल्या होत्या.

मेघना--- अरे सुलू मावशी, विद्या दीदी केव्हा आलात? येण्याआधी काहीच कळवलं नाही.

विद्या--- आपल्याच घरी येण्याआधी कळवावे लागत का?

मेघना--- तस नाही ग दीदी, पण तुम्ही न कळवता कधी येत नाही म्हणून विचारलं?

विद्या--- नोकरी काय म्हणतेय?

मेघना--- मस्त, मावशी तु कशी आहेस?

सुलू मावशी--- मी मजेत, आम्ही रात्री इथेच आहोत, तु फ्रेश होऊन ये मग निवांत गप्पा मारू

मेघना--- हो आलेच मी.

      मेघना रुममध्ये फ्रेश व्हायला निघून जाते, तिच्या पाठोपाठ विद्याही तिच्या रुम मध्ये जाते.

विद्या--- मेघना आत येऊ ना.

मेघना--- अगं दीदी येणा, परमिशन कसली घेत आहे?

विद्या--- आता तु मोठी झाली आहेस, प्रत्येकाची प्रायव्हेट स्पेस असतेच ना.

मेघना--- दीदी माझं सोड, वैभव जिजू काय म्हणत आहेत?

विद्या--- वैभव मस्त आहे, पुढच्या महिन्यात लग्न आहे लक्षात आहे ना.

मेघना--- बास का दीदी, तुझं लग्न मी कशी विसरेन? शॉपिंग झाली का?

विद्या--- हो जवळजवळ सर्वच झाली आहे, थोडीफार बाकी आहे.

      दोघींच बोलणं चालूच असतं तेवढ्यात मेघनाच्या फोनवर आदित्यचा फोन येतो, मेघना फोन उचलते, दोन तीन मिनिटे फोन चालतो व मेघना फोन बंद करते.

विद्या--- कोण होत ग मेघना?

मेघना--- माझ्या ऑफिस मधला कलीग आहे आदित्य, मी येताना त्याच्या गाडीत आले तर माझं आयकार्ड गाडीतच विसरले हे सांगायला फोन केला होता.

विद्या--- आदित्य म्हणजे वैभवचा मित्रच ना.

मेघना--- हो बरोबर

विद्या--- आदित्य तुला रोज घरी सोडतो का?

मेघना--- नाही ग, आज आम्ही कंपनी सुटल्यावर चहा प्यायला गेलो होतो म्हणून त्याने सोडलं.

विद्या--- तु कधीपासून चहा प्यायला लागलीस?

मेघना--- आदित्य सोबत मैत्री झाल्यापासून

विद्या--- बरं, आदित्य फक्त मित्रच आहे की अजून काही

मेघना--- दीदी तु पण ना, आमच्यात फक्त मैत्रीच आहे बाकी काही नाही.

विद्या--- मी वैभवला आदित्य बद्दल माहिती विचारून ठेवते, तु जर त्याच्या प्रेमात असली तर सांग मी आणि वैभव तुला मदत करू शकतो.

मेघना--- दीदी खरच तस काही नाहीये

विद्या--- असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

मेघना--- दीदी चल आपण खाली जाऊया, मला मावशी सोबत गप्पा मारायच्या आहे.

विद्या--- हो का, तु माझ्या प्रश्नापासून पळत आहेस, ठीक आहे जे तु, मला वैभवसोबत थोडं बोलायच आहे.

मेघना--- ओके, मी तुला डिस्टर्ब नाही करणार.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all