चहा आणि बरंच काही भाग ११

Story of friendship

         आपण मागील भागात बघितलं, मेघना आणि आदित्यमध्ये खूप छान मैत्री झाली होती. मेघना आदित्यसोबत सगळ्याच गोष्टी शेअर करायची.मेघना शिवानी सोबत कमीत कमी बोलू लागली. शिवानीला मेघनाचे वागणे खटकत होते. शिवानी वरवर जरी दाखवत असली की मेघनाच्या वागण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाहीये पण आतून शिवानीला मात्र खूप वाईट वाटले होते. मेघनाला शिवानी आणि आदित्य या दोघांत मैत्रीचा बॅलन्स ठेवता येत नव्हता. एका वेळी ती एकाचीच निवड करत होती. मेघना जास्तीत जास्त वेळ आदित्यलाच द्यायची. घरून येताना व जाताना शिवानी व मेघना एकत्र असायच्या पण त्या नावापुरत्याच, त्यावेळी मेघना एकतर आदित्यसोबत फोनवर बोलत बसायची किंवा आदित्य बद्दल शिवानीशी बोलायची. थोडक्यात काय तर मेघनाकडे बोलायला आदित्य सोडून दुसरा विषयच नसायचा.

        शिवानीचा वाढदिवस होता, त्या दिवशी रविवार असल्याने कंपनीला सुट्टी होती. दरवर्षी मेघना शिवानीच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळीच शिवानीच्या घरी शुभेच्छा द्यायला जायची. शिवानी सकाळपासून मेघनाची वाट बघत होती पण मेघना काही शिवानीच्या घरी गेली नव्हती, शिवाय मेघनाचा मॅसेज किंवा कॉल पण नव्हता. आता मात्र शिवानीचा रागाचा पारा खूप चढला होता. शिवानी ठरवते की आता मेघनाशी बोलायचंच नाही.

         मेघना शिवानीचा वाढदिवस विसरलेली असते, तिच्या लक्षातच नसते की आज शिवानीचा वाढदिवस आहे. त्या दिवशी दुपारी मेघनाला आदित्यचा कॉल येतो,

आदित्य--- हॅलो मेघना, काय करत आहेस?

मेघना--- आत्ताच ब्रेकफास्ट करून झाला.

आदित्य--- अगं ही तर जेवायची वेळ आहे आणि तु ब्रेकफास्ट करतेस.

मेघना--- सुट्टीच्या दिवशी माझं असच असतं, उशिरा झोपेतून उठायच, निवांत अंघोळ करायची मग ब्रेकफास्ट करायचा, माझं दुपारच जेवण तर कधी कधी चार वाजताही होतं.

आदित्य--- आई काही बोलत नाही का?

मेघना--- बोलते ना पण तीच बोलण मनावर कोण घेतंय. माझं सोड तु फोन सहजच केला होता का?

आदित्य--- तुझ्याकडे एक काम होत, माझ्या आईचा उद्या वाढदिवस आहे सो मला तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायच आहे,आज संध्याकाळी तु माझ्यासोबत गिफ्ट घ्यायला येशील का?

मेघना--- आईला विचारून सांगते.

आदित्य--- मला मॅसेज कर.

          आदित्यशी बोलून झाल्यावर मेघना आईकडे परमिशन मागायला जाते. आईला मेघना व आदित्यच्या मैत्री बद्दल कल्पना असल्याने आई मेघनाला आदित्यसोबत जाण्यासाठी परमिशन देते सोबतच मेघनाला सांगते की तुझ्याकडूनही आदित्यच्या आईला काहीतरी गिफ्ट घेऊन देशील. मेघनाला आईची आयडिया आवडते.

           ठरल्याप्रमाणे आदित्य मेघनाला घ्यायला तिच्या घरी येतो त्यावेळी आदित्य मेघनाच्या आईला भेटतो. आदित्य घरात आल्याबरोबर मेघनाच्या आईच्या पाया पडतो. मेघनाच्या आईला आदित्य खूप आवडतो. मेघना आदित्य सोबत गिफ्ट घेण्यासाठी जाते. मेघना निघून गेल्यानंतर मेघनाच्या आईला शिवानीचा फोन येतो, शिवानीला मेघना कुठे आहे याचा अंदाज घ्यायचा असतो, शिवानीला doubt असतो की मेघना आदित्य सोबतच असेल,

शिवानी--- हॅलो काकू, शिवानी आहे का? तिचा फोन लागत नाहीये म्हणून तुमच्या फोनवर फोन केला.

मेघनाची आई--- शिवानी मेघना आदित्यसोबत बाहेर गेलीय, आदित्यच्या आईचा वाढदिवस आहे ना सो आदित्यला त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायच होतं.

शिवानी--- ओके.

मेघनाची आई--- तुझं काही काम होत का?

शिवानी--- नाही काकू, सहजच कॉल केला होता.

मेघनाची आई--- बर शिवानी तुला एक विचारु का?

शिवानी--- हो विचारा ना.

मेघनाची आई--- मी आज पहिल्यांदाच आदित्यला भेटले, खूप चांगला मुलगा वाटला, मेघना आणि आदित्यमध्ये काही चालू आहे का?

शिवानी--- काकू या सर्वाची मला कल्पना नाहीये, आदित्य सर स्वभावाने खूप चांगले आहे पण मेघना आणि त्यांच्यात फक्त मैत्री आहे असच वाटतंय.

मेघनाची आई--- असू शकते, अग पण मेघना घरी आली की आदित्यच्या नावाचा जप चालू असतो, आज आदित्य हे म्हणाला, ते म्हणाला हे असंच चालू असत. पहिले तुझ्या नावाचा जप राहायचा आणि आता आदित्यच्या नावाचा जप चालू राहतो.

शिवानी--- काकू तुम्ही मेघनालाच विचारुन बघा ना.

मेघनाची आई--- मी विचारल्यावर ती खरं थोडीच बोलणार आहे, तूच विचारून बघ ना.

शिवानी--- हो विचारेल ना.

मेघनाची आई--- मला सांग मग 

शिवानी--- हो

       शिवानीला मेघनाचा प्रचंड राग येतो. मेघनाला आदित्य सोबत जायला वेळ आहे पण मला एक कॉल करायला वेळ नाहीये. शिवानी ठरवते की उद्या मेघना भेटल्यावर तिच्याशी बोलायचंच नाही.

        दुसरीकडे मेघना आदित्यसोबत मस्त शॉपिंग करण्यात बिजी असते. आदित्य त्याच्या आईसाठी एक साडी आणि पर्स घेतो, मेघना आदित्यच्या आईसाठी एक सुंदर नक्षी असलेला बटवा घेते. आदित्य मेघनाला सांगतो की तुझ्यासाठी काहीतरी घे. मेघना नाही हो करता करता आदित्य मेघनासाठी एक पर्स विकत घेतो. मेघनाला आदित्यची चॉईस खुप आवडते. आदित्य आणि मेघना आपापल्या घरी फोन करून बाहेरच जेवणार असल्याचे सांगतात. दोघेही हॉटेल मध्ये जेवण करतात, आईस्क्रीम खातात. आदित्य मेघनाला घरी सोडतो व स्वतःच्या घरी जातो. मेघना आदित्य सोबत शॉपिंगला जाऊन आल्याने खूप खुश असते.

       मेघना घरी परत आल्यावर मेघनाची आई शिवानीचा फोन येऊन गेल्याचे सांगते. मेघना खूप थकलेली असल्याने दुसऱ्या दिवशी भेटल्यावरच शिवानीला फोन का केला होता? अस विचारायचे ठरवते. इकडे शिवानीला मात्र वाटत असते की मेघनाचा रात्री तरी फोन येईल. शिवानीला खरच खूप वाईट वाटलेले असते. शिवानीचा पहिला असा वाढदिवस होता जेव्हा मेघनाने शिवानीला विश नव्हते केले. शिवानीच्या घरचे सारखे विचारत होते की मेघना का नाही आली म्हणून. शिवानी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन वैतागली होती.

          आदित्यही मेघनासोबत शॉपिंग करून आल्याने खुश होता. आदित्यला हे जाणवू लागले होते की त्याला मेघना आवडू लागली आहे पण तिला आपण आवडत असू का? हा प्रश्न आदित्यला पडला होता. आदित्यला वाटत होते की, मेघनाकडे आपल्या भावना व्यक्त कराव्यात पण दुसरीकडे अस वाटायच की मेघना माझ्याकडे त्या नजरेतून बघत नसेल तर उगाच एक चांगली मैत्रीण गमावून बसायचो.

           शिवानी मेघनाला भेटल्यावर तिचा राग कसा व्यक्त करते आणि मेघना तिला कशी मनवेल हे बघूया पुढील भागात

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all