Login

सवतीला दिलेले ते वचन भाग 5 अंतिम

Te Vachan
भाग 5
सवतीला दिलेले वचन


सुमित्रा अरूणचा हात घट्ट करत तर कधी सैल करून हात सोडवायला बघत.शेवटी तिने तो त्याचा हात सोडला.

सुमित्रा,"अरुण मी इथेच असेन तुझी वाट बघत तुझीच सुमित्रा म्हणून ,तेच प्रेम ,तीच आस आणि वाटेकडे डोळे लावून.."
आईने अरुणाला तिचा हात सोडायला लावला.

अरुण श्रुतीचे लग्न लागले..

अरूणच्या पत्रिकेतील योग खरा ठरला ,आणि त्याचे दुसरे लग्न झाले.

श्रुती अरुण सोबत लग्न झाल्यामुळे खुश तर होती कारण तिचा आणि सुभद्राचा प्लॅन यशस्वी ठरला ह्याचा जास्त आंनद झाला होता.


श्रुती खूप हट्टीपणा वर उतरली होती .

काही महिने गेले, अरुण दर वेळी सुमित्राला भेटायला जाऊ शकत नव्हता आईच्या वचनामुळे

ती हळूहळू अरूणच्या खूप प्रेमात पडत गेली पण तो मात्र कधीच तिच्या जवळ आला नाही..

श्रुती,"अजून किती दिवस लांब राहशील तू ?"

अरुण,"तुझ्या जवळ मी कधीच येणार नाही,तू प्रेम करशील पण,ते प्रेम फक्त सुमित्राचे आहे हे लक्षात ठेव."


जवळजवळ 6 महिन्यातच श्रुती आई होणार याची बातमी मिळाली..श्रुती आई आणि अरुण बाबा होणार म्हटल्यार आता त्याला होणाऱ्या बाळासाठी तरी श्रुतीवर प्रेम करावे लागेल असे अरुण च्या आईला आणि श्रुतीला वाटले,पण नाही झाले तसे काही. त्याला फसवून त्याला बाप होण्याची खेळी केली ह्या मुळे तो अजूनच दूर गेला.. श्रुतीला आई झाल्यानंतर चे डिप्रेशन ह्यात तिच्या मागे सोरायसिस चा भयानक आजार लागला.


श्रुतीचा आजार शेवटच्या स्टेप पर्यंत गेला होता. तिचे काही चान्स नव्हते वाचण्याचे.

श्रुती, "आई अहो पहा मला देव माझ्या कर्माची शिक्षा देत आहे आणि तिचा श्राप लागला तर नसेल ना ."

आई,"श्रुती माझा हा स्वार्थी डाव होता, त्रास मला व्हायला हवा होता ,तुझ्या वाट्याला का हे."

श्रुती,"आई मला माफी मागायची आहे तिची.."

आई सुमित्राला घरी बोलावून श्रुतीच्या रूम मध्ये घेऊन जाते.

श्रुती धडपडत सुमित्राच्या हाताला हातात घेते आणि तिची माफी मागते ," खुप दुःख दिले ग मी तुला ,एक सुख आले होते तुझ्या आयुष्यात ते ही मला बघवले नाही ,ते ही मी हिसकावून घेतले आणि तुमची ताटातूट केली. पण आता मला माझी चूक भरुन काढायची आहे. एक लहान वेडी बहीण समजून, मोठ्या मनाने मला माफ कर. मी भरकटत होते, मला खरं प्रेम काय असते कधी कळलेच नाही. प्रेम हिसकण्यात नसते, त्यागात असते, मला कळले आहे.

सुमित्रा,"तू जे वागलीस ते एक वेड होते. अरुण बद्दल प्रेम होते, म्हणून तू तसे वागली.त्यात तुझा दोष नाही. केले मी तुला माफ."

श्रुती, "तू आणि अरुण पुन्हा एक व्हा आणि आपल्या घरी चला म्हणजे मी पाप मुक्त होईल."

श्रुती अरींची माफी मागते आणि त्याला आणि सुमित्राला जवळ घेऊन हातात हात देते.

पुढे ते तिघे बाळाला घेऊन घरी येतात. सुमित्रा आणि श्रुती चांगल्या मैत्रिणी म्हणून रहातात. श्रुतीची तब्येत ठीक होत नाहीच. तिला रोहितकडे लक्ष देता येत नाही. ,म्हणून ती सुमित्राकडून एक वचन घेते की तूच त्याची आई हो आणि त्याला आई सारखे प्रेम दे. सुमित्रा वचन देते की मीच त्याची आई होईल. त्यासाठी मला मूल ही होऊ देणार नाही.

हे वचन ऐकून श्रुती भरून पावते आणि सुमित्राच्या मांडीवर अखेरचा श्वास घेते.

रोहित जसा जसा मोठा होत जातो तसे तसेत्याला वाटू लागते की सुमित्राच माझ्या आईच्या मरणाला कारणीभूत आहे.तिच्यामुळेच आईचा संसार तुटला. ती ह्या जगातून गेली.

मोठा झाल्यावर तो घर सोडून जातो आणि आजीकडे राहू लागतो. त्याचे लग्न ही होते आणि तो आपल्या लग्नाला सगळ्यांना बोलवतो पण सुमित्राला बोलवत नाही. त्याचा सुमित्राला खूप त्रास होतो.

एक दिवस रोहित काहीतरी कामाचे पेपर शोधत असतो तेव्हा त्याला त्याच्या त्याचे आईचे, त्याच्यासाठी लिहिलेले पत्र सापडते. त्यात लिहिलेले असते की तुझ्या मोठ्या आईला त्रास होईल असे वागू नकोस. मी आधीच तिला खूप त्रास दिला आहे,तिला तुझ्या बाबांपासून दूर केलेच आणि मी त्यांच्याशी लग्न केले. त्यात तू झालास तेव्हा माझी तब्बेत खूप खराब राहत होती. मला तुझी काळजी घेता येत नव्हती. सुमित्राच तुझं खाणं पिणं, शी सू करत होती. हे जग सोडून जातांना त्या आईने तुझा हात हातात घेतला आणि मला वचन दिले की ती तुझ्या प्रेमाखातर, मुलांत अंतर येऊ नये म्हणून ती तिचे मुल होऊ देणार नाही. त्या माऊलीचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तिचं तुझ्यावर खूप जीव आहे. तू आता हे समजण्या इतका मोठा झालाच आहेस. आयुष्यातकोणत्या ही वळणावर तिला एकटे सोडू नकोस. तिला दुखवू नकोस. तुझ्या वागण्याचा तिला काही त्रास होईल, असे वागू नकोस, तिला तू खूप प्रेम दे, जसे तिने तुला , आम्हाला सर्वांना दिले.

ते सगळं वाचून रोहितला त्याची चूक कळते. आपण किती मोठा गुन्हा केला आहे , ते समजते. तो आपल्या मोठया आईकडे जातो आणि तिची माफी मागतो. शेवटी ती आईच असते. सुमित्रा त्याला माफ करते.

"आपल्या घरी रहायला ये ,घर तुझी वाट बघत आहे आणि आम्ही ही"

आज सगळे पुन्हा सोबत आले होते..सुमित्राचे एकटेपण दूर झाले होते.

🎭 Series Post

View all