Login

सवतीला दिलेले ते वचन भाग 1

Te Vachan
सवतीला दिलेले ते वचन!
भाग 1


आईने अचानक ठरवले आज आपल्या मुलाला फोन करू आणि विचारू मी असे काय,कुठले पाप केले आहे की तू मला आई म्हणून आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आनंदाच्या क्षणी तुझ्या सुखात सहभागी होण्यास पात्र नाही समजले.

त्या स्वगत म्हणाल्या ,"मी खरंच किती कर्म दळीदरिद्री की मला माझ्या घरच्यांनी विसरावे? मुलाने ही विसरावे? मुलाने जाणून बुजून आपल्याला लग्नाला बोलावले नाही.आई म्हणून काहीच मान दिला नाही की मान द्यावासा वाटला नाही?मनापासून तो किती दूर गेला आहे, हे त्याने याआधी दाखवून दिलेच होते. पण लग्नाला न बोलावून त्याने सिद्दी केलेच आहे."

आज तिला नवऱ्याची खूप आठवण येत होती. सगळे जग जरी विरोधात होते तरी मात्र त्याने कधीच साथ सोडली नव्हती.

सुमित्रा बाई मुलाच्या ह्या वागण्यावरून खूप हळहळल्या होत्या. दुःखी झाल्या होत्या.कोणाला सांगू शकत नव्हत्या की बोलू शकत नव्हत्या. मन खूप खिन्न झाले होते..आज ह्या बातमीने त्या ह्या जगात पुरत्या एकट्या पडल्या आहे, हे त्यांना जाणवले होते.


सुमित्रा अरुण टिकेकर हिला अरुण टिकेकर ह्या प्रेमळ,दयाळू, स्वाभिमानी, जिद्दी, माणसाने तिची साथ एका खडतर प्रवासात दिली. तिच्या विरान आयुष्यात प्रेमाचा अमीट वर्षाव केला होता.जगाचा विरोध असून ही त्याने सुमित्रासोबत लग्न केले. सारे नजर लागण्याजोगे होते.

अरुण सतत तिचाच विचार करत असे. आपण असू नसू, पण सुमित्रा नेहमी सुखी, आनंदी राहावी असेच त्यांना वाटत होते.
तिला आपल्या माघारी पुन्हा अनाथाचे ते जीवन येऊ नये हीच एक इच्छा होती. तिच्या चेहऱ्यावर आंनद बघण्यासाठी तो काही ही करायला तयार होता,अट एकच ती आंनदी रहावी. तिच्या सुंदर चेहऱ्यावर हसू रुपात आपण तिच्या जवळ असायला हवे. मग आत्मा बनून तिला आपण सोबत जगलेल्या आठवणी आठवण करून द्यायच्या , तिचे हसणे पाहून तृप्त व्हायचे, असे तो विचार करत.

अरुण,"सुमित्रा मी तुला असे काय देऊ की ज्याने तू माझ्या आठवणीत सदैव आंनदी राहशील?"

सुमित्रा,"तू असे काय रे बोलतोस, कुठे जाणार आहेस तू असा माझ्यापासून की तुझ्या आठवणींसोबत मला दिवस काढावे लागतील? नको रे बाबा तो आंनद जो तुझ्यासोबत नाही. तुझ्याविना एक क्षण ही माझी जगण्याची इच्छा नसेल."

"झाली का तू परत भावुक? मी सहज म्हणालो आणि तू डोळ्यातून टीप गाळून मोकळी. काय ग कशी ग तू अशी? जरा तरी धीट हो. हा एक सोडला तर मला तुझे सगळे गुण आवडतात. हे तुझ्या डोळ्यातील अश्रू मला नेजमी कमजोर करतो."

ते ऐकून रडणारी सुमित्रा अजूनच हळवी झाली. तिने अरुणाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, " मी तुला कुठेच जाऊ देणार नाही, माझ्या आयुष्यात आलेला तू माझा खरा खुरा आंनद आहेस रे."

त्याने ही ती मिठी अजूनच घट्ट करत तिला सांगितले,"मी तुला कुठेच सोडून जाणार नाही वेडे.पण सगळेच आपल्या मनासारखे तर होत नाही, हे माहीत असायला पाहिजे. सगळं स्वीकारायला मनाची तयारी होते."

"तू आज का रे अश्या गोष्टी करतोस? मला खूप भीती वाटते रे. नको तू असे काही बोलत जाऊ. जर तू पुन्हा असे बोललास तर माझे हृदय बंद पडेल आणि ह्याच मिठीत मी जीव सोडून जाईल."

" ठीक आहे ,तू म्हणशील तसेच होऊ दे. आपले प्रेम बघून किंवा तुझ्या या धाकाने देवाला ही नमते घ्यायला लागू देत."

"तू असाच मला हसवत रहा. तुला असे जोक छान जमतात तू तेच करत जा. मनाला दुखावून जाईल असे बोलत जाऊ नकोस."

"मी तुला काहीतरी देणार आहे. आपण सोबत बसून ते वाचत जाऊ. आपण दोघे वेडे कसे होतो, आठवून हसत जाऊ."

तिला त्याचे बोलणे आवडले नाही. तिला तो सोडून काहीच नको होते.

सुमित्राला त्याने पहिल्यांदा कसे कुठे पाहिले? तिचा कसा ध्यास लागला, हे एका पत्राद्वारे लिहून ठेवले होते.

"काळ जाईल पण तरी हे माझे पत्र जेव्हा वाचशील तेव्हा जसा काळ असेल तशी तुझी वेगवेगळी प्रतिक्रियाअसू शकते. म्हणजे तूझ्या सोबत मी नसलो आणि तू कधी एकटीच असली तर तुला माझी आठवण येऊन तू रडत असशील ,ह्या पत्राला कवटाळून घेशील जणू तू मला कवळटाळून रडत आहेस ,किंवा मी कुठे बाहेर गावी गेलो आहे आणि तुला माझी आठवण येत असेल ,आणि माझी सोबत हवी हवी वाटत असेल तर तू लाजून हे पत्र तुझ्या दोन्ही हाताने तुझ्या लाजेने गुलाबी झालेले चेहऱ्यावर घेऊन तुझा चेहरा त्यात लपवशील. काही असो तू कधीच रडणार नाहीस हे पत्र वाचतांना ह्याची काळजी घे, वचन दे, नाहीतर मला शांती मिळणार नाही. तुला माहीतच आहे तुझे अश्रू मी सहन करू शकत नाही, मी स्वर्गातून तुझ्या कडे येण्यासाठी देवाला विनंती करेल...माझा आत्मा तडफडत राहील. चल मूळ मुद्द्यांवर येतो म्हणत त्याने पत्र लिहायला सुरू केले होते..

प्रिय सुमी,

"हे सगळे बंध तुझे नी माझे स्वर्गात नाही जुळले ग सुमी आपले हे नाते, हे खूप खूप लहान होतो आपण तेव्हापासून जुळले आहे. मला नेहमीच वाटे ही जागा सारखी सारखी खुणावत आहे हे कळत नव्हते ,हो पण ही जागा खुणावत होती हे नक्की. ...मी आजीला विचारायचो की आजी असे काही असते का, की ह्या वस्तू कडे आपले मन आणि पाऊले आपोआपच वळतात तिथे आपले काही देणे असते का ? तिथे आपले कोणी खरंच असते का ग आपले ?

मग एकदा सहज तिथून जात असतांना एक सुंदर छोटी दोन वेण्या घातलेली मुलगी ,तुझे वय असेल काही 9 वर्षे जवळपास ,मी 12 संपून गेलेला ..तुझे ते सुंदर केस, हसरा गोरा गोरा चेहरा, तू तुझ्या आजोबा सोबत बाहेर खेळायला आलेली ,मग एका पाठोपाठ किती तरी जणी अश्याच खेळत बागडत, उड्या मारत ,गप्पा मारत ,तर काही शांत असलेल्या मुली बाहेर पडत होत्या. मी तर बघतच राहिलो...मी ह्या वास्तुतून पहिल्यांदा कोणी तरी बाहेर पडतांना पहात होतो, आणि मग कळले इथे माणसे रहातात...ते ही इतकी गोड, सुंदर, हसरी, आणि मग वाटले ही वास्तू तर किती छान आहे, असेच काही असेल जोडलेले काही नाते ,ते म्हणजे माणुसकीचे..तुला तर मी सगळ्या मुलींमध्ये शोधतच होतो..पण तू पुन्हा दिसलीच नाहीस तेव्हा...ना नंतर कधी...पण तू कायमच आठवणीत राहिलीस...पुन्हा पहावे म्हणून रोज यायचो मी पण पुन्हा कधीच नाही दिसली ती मुलगी."

तिने पुन्हा एक पत्र काढले, किती तरी पुरवण्या होत्या त्या, त्याने तिच्यासाठी मुद्दाम लिहूनच ठेवल्या होत्या. तो जेव्हा तिच्यापासून दूर गेला होता आणि ती एकटीच पडली होती तेव्हा त्याने तिच्यासाठी खास हे पत्र लिहिले होते..त्याने मनातले आज लेखणीतून तिच्यापर्यंत जाणून पोहचवले होते. सगळा सुवर्णकाळ तिच्या सोबत कायमस्वरूपी एक ठेवा रुपी ठेवायचा असे तर ठरवले नव्हते पण तो तिच्यासाठी एक ठेवा म्हणूनच राहिला, सुखाचा मलम जाहला होता. त्याची उणीव जाणवली की कधी तरी ते सगळे पत्र काढून बसायचे आणि वाचायचे.. रडून कधी तर कधी हसून ती ते वाचून काढायची..त्याचे पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले शब्द आठवायची आणि अश्रू गाळणे बंद आता, आता फक्त तू म्हणशील ते करेन मी म्हणत झोपी जायची.

सुमित्रा आपली दुःख सांभाळून अरुण शिवाय हे आयुष्य जगत होती. तिच्या एकटेपणासाठी त्या आठवणीच तिचा आधार होता. ती काही पत्र वारंवार वाचत. त्यात तिला हसवण्यासाठी खास गोड आणि मजेशीर किस्से त्याने लिहिले होते. ज्यात ती कशी त्या अनोळखी अरुण सोबत खडूस आणि अकडू सारखी वागत असत. तो तिच्या आश्रमात दुरुस्तीचे काम करत. त्याला कोणी इथे काम दिले? असेच तिला वाटत. तिने त्याची खुद्द तक्रार ही केली होती. पण तरी तो पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करेन तर मीच करेन म्हणत पुन्हा रुजू झाला होता . मग तिने त्याचे तोंड ही बघणार नाही अशी शपथ ही घेतली होती. पण आश्रमातील सगळ्या योजनेची देखरेख करत ते गुरूजी अचानक आजारी पडले. अरुणच्या कामावर देखरेख, हिशोब बघायची वेळ तिच्यावरच आली. त्याच्या मनासारखे झाले म्हणून तो खुश होता तर तिच्या मनाविरुद्ध झाले म्हणून ती नाखूष होतीच. त्याला बघावे लागेल, बोलावे लागेल म्हणून तिची चिडचिड सुरू असायची


क्रमशः..
0

🎭 Series Post

View all