Login

ते एकटे आहेत भाग 1

ते एकटे आहेत पण कोणामुळे

ते एकटे आहेत भाग 1

©️®️शिल्पा सुतार

मोठ्या हॉस्पिटल समोर प्रभा काकू, दिलीप काका एकमेकांचा हात धरून रिक्षातून हळूच उतरले. काकांनी पैसे दिले. पैशाच पाकीट नीट आत ठेवल. रिक्षा वाला स्वतः त्यांना हॉस्पिटलच्या दारा पर्यंत सोडून आला. म्हातारे माणस, जेवढी होईल तेवढी मदत प्रत्येक व्यक्ति करत होते.

दोघ हाश हुश्श करत आत बसले. बाकावर बसले. काकूंनी बॅग मधून पाण्याची बाटली काढली. काकांना ग्लासात पाणी दिल.

" तू घे ना." काका बोलले.

" हो घेते."

नर्स बाहेर आली. किती पेशंट आहेत ते तिने बघितल. काका काकूंना बघून तिने कंटाळलेला चेहरा केला. ती आत डॉक्टरांना निरोप द्यायला गेली.

दोन मिनिटांनी काका हळूच उठले रीसेप्शन जवळ गेले. तिथली मुलगी कामात होती. तिने समोर बघितल.

"आमचा नंबर कधी आहे? फोन वर अपॉइंटमेंट घेतली आहे. बघा आमचे दोन नंबर आहेत." काका बोलले.

"काय नाव तुमच?"

काकांनी नाव सांगितल.

" काका तुमचं नाव दिसत आहे लिस्ट मधे . तुमच्या आधी तीन पेशंट आहेत. बसुन घ्या."

"असं कसं? आधी आम्हाला जाऊ द्या. करा काहीतरी."

"तुमच रेग्युलर चेक अप आहे ना. असं करता येणार नाही काका. तो पेशंट आत जाणं महत्त्वाचं आहे. त्यांना कालपासून ताप आहे. इमर्जन्सी आहे. "

"ते आम्हाला माहिती नाही आमचा नंबर लावा. सीनियर सिटीजनला प्राधान्य द्यायला पाहिजे. " काका बराच वेळ तिथे डोकं लावत होते.

शेवटी नर्स आली. तिने काकांना हाताला धरल आणि काकूं शेजारी आणून बसवलं." काका नंबर प्रमाणे आत सोडणार. पेपर वाचत बसा. "

नेहमीच होतं हे काका काकूंच महिन्यातुन एकदा हॉस्पिटलमध्ये येत होते. तसे दोघ बऱ्यापैकी चिडके होते. कोणाच ऐकायच नाही. हट्ट करायचा. इतरांना घालून पाडून बोलायचं. स्वतःला अवाजवी महत्व द्यायचं. अस सुरू होत.

आता काका बाजूच्या माणसाशी गप्पा मारत होते. "तुमचा मुलगा आहे का सोबत? काय होतय तुम्हाला? "

"शुगरचे रीपोर्ट दाखवायला आलो आहे . हा दोन नंबरचा मुलगा. त्याला ऑफिस होत तरी अर्धी सुट्टी टाकून आमच्या सोबत आला. आमची खूप काळजी घेतो. "

"तुम्ही लकी आहात. " दोघ कौतुकाने त्याच्याकडे बघत होते.

"तुमच्यासोबत कोण आहे?" त्यांनीही विचारलं.

"कोणी नाही. आम्ही दोघेच आहोत. मुलगा येणार होता, त्याचा अजून पत्ता नाही. बिझी असतात आमचे मुल. दोघं मुलं उच्चशिक्षित आहेत. चांगल्या नोकर्‍या आहेत. लग्न झाले आहेत. त्यांना मुलं आहेत. ते आमच्या सोबत रहात नाहीत. आम्ही दोघंच असतो. " काका चेहरा पाडून बोलले.

सगळे दोन मिनिटं शांत बसले. बाकीच्यांच्या मनात प्रश्न पडले. याचे मुल किती खराब आहेत. आई वडील एवढे म्हातारे तरी एकटेच हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना गरज आहे या वयात. तेव्हा एकटं पाडलं. असे मुलं असल्यापेक्षा नसलेले बरे.

हेच तर हवा होतं काका काकूंना. त्यांना हवी असलेली सहानुभूती मिळाली होती. काकूंनी हळूच काकांचा हात हातात घेतला. "अहो त्रास करून घेऊ नका. कोणी नसलं म्हणून काय झालं मी आहे तुमच्यासोबत. अजिबात मुलांचा विषय काढायचा नाही."

रिसेप्शनिस्ट नवीन जॉईन झालेली होती. तिला यांची हिस्टरी माहिती नव्हती. हे सगळं ऐकून तिच्या डोळ्यात थोडेसे अश्रू आले.

तेवढ्यात सिस्टर बाहेर आली. "काय झालं? का बरं रडते? " तिने काका काकूंकडे बघितलं." यांची कहाणी ऐकली का तू? "

" हो ना ग बघ ना या वयात ते कसे एकटे ग. दोघे एकमेकांना सांभाळतात. एकटे इकडे तिकडे फिरतात. मला अजिबात आवडल नाही. दोन मुलं आहेत ना त्यांना. चांगले शिकलेले नोकरी करतात. तरी आई-वडिलांना सांभाळत नाही. काय उपयोग अश्या मुलांचा. आई बाबा पोटाला चिमटा घेऊन आपल्या साठी खूप करतात. मुलांना एवढी ही जाणीव नाही. " ती बोलत होती.


🎭 Series Post

View all