
ते चार दिवस
आजच्या कथेत आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया....
सुंदर आणि सुशिक्षित अशी आजच्या कथेची नायिका..... तीच नाव रसिका.,ती एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करायची, तिला स्वतः ला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायचे नव्हते.. एवढं शिक्षण घेतलेलं मग त्याचा उपयोग पण व्हावा असं तिला वाटायचं..
रसिकाच नुकतंच लग्न झालेलं, लग्न करून आपल्या सासरी आलेली रसिका आज खूप विचारात होती. लग्नाला जेमतेम महिना झाला होता. अमर म्हणजे रसिकाचा नवरा, सरकारी कार्यालयात उच्च पदावर कार्यरत होता, रसिका आणि अमर च अरेंज मॅरेज, सुशिक्षित घराणं आणि मुलगा पण उच्च पदी नोकरीला होता म्हणून रसिकाच्या आई वडिलांना स्थळ आवडले, आणि रसिका ला सुद्धा अमर आवडलेला, आणि सासरच्यांची रसिका च्या नोकरी करण्यावरून हरकत नव्हती, त्यांना पण नोकरी करणारी सून हवी होती म्हणून ती या लग्नाला तय्यार झाली, अमर ला सुद्धा रसिका आवडली होती...रसिकाच्या सासरचे सगळेच प्रेमळ, तिची काळजी घेणारे, प्रत्येक वेळी तिला समजून घ्यायचे. रसिकाला सासू पण स्वभावाने प्रेमळ, अगदी आई सारखी समजून घेणारी मिळाली...म्हणजे अस तिला वाटायचं आजपर्यंत.... त्या सुशिक्षित होत्या.... मग त्या अस का वागल्या असतील माझ्याशी., असा विचार करून करून तीच डोक दुखायला लागलं.
डोक दुखतयं म्हणून ती तिच्या खोली मध्ये खाली चटई वर लोटली...विचार करता करता तिला झोप लागली...
सगळच तर छान होत मग आज अचानक आपल्या रसिका ला काय झालं असेल??
तर झालं असं की आज रसिकाची मासिक पाळी आली, पहिला दिवस आजचा, तिने तिच्या आईंना सांगितलं की आज तीच पोट खूप दुखतय म्हणून ती आज ऑफिस ला जाणार नाही, आज घरीच आराम करते., तर आईंनी विचारल का ग काय झालं अचानक पोटात दुखायला, तेव्हा तिने सांगितलं आज पाळी आलीय म्हणून नाही जात..., एवढं बोलताच सासूने तिला ऑर्डर द्यायला सुरुवात केली, पुढचे तीन दिवस तु स्वयंपाक घरात यायचे नाही, पाण्याला हात लावायचा नाही, आपल्या खोलीत पण खाली झोपायचे, इकडे तिकडे फिरायच नाही, हे ऐकुन रसिकाला चक्कर यायला लागली, कारण हा असा मूर्खपणा ती पहिल्यांदा ऐकत होती., तिने सासुंना म्हटले, आई आता कोण पाळत हे सगळ, आता सगळच चालतं सगळीकडे, आणि हे नैसर्गिक आहे, यात काही नवीन नाही.. मी पाप नाही केले की तुम्ही मला अस बोलत आहात... तुम्हाला ही आलच असेल ना हे.... तर आई म्हणाल्या आमच्या कडे नाही चालत हे, विटाळ म्हणतो आम्ही याला, माझ्या सासूला सुद्धा नव्हत चालत काही, त्या सुद्धा मला तीन दिवस कुठेही हात लावू द्यायच्या नाही.. तुला जेवढं सांगतेय तेवढं कर आणि आपल्या खोलीत जा, मी चटई काढून देते त्यावर झोप.. रसिकाला पोटात दुखत होत म्हणून ती जास्त काही न बोलता खोलीत गेली, तिच्या मागोमाग सासू पण गेली, तिने चटई काढून दिली आणि त्यावर रसिका ला बस म्हणून सागितलं, काही लागलं तर आवाज दे, पण हलू नको इथून एवढं तिला बजावलं. आणि त्या गेल्या..
रसिका ला अचानक जाग आली आणि तिला तिची आईची आठवण आली की आईकडे अशा वेळी कधीच अशी वागणूक मिळाली नव्हती उलट ती समजून घ्यायची, काळजी घ्यायची..पण रसिका ला आपल्या सुशिक्षित सासू कडून अशी अपेक्षा नव्हती... तिने मनाशी ठरवलं की आता त्यांना नीट समजून सांगायचं, कारण आता जर मी नाही बोलले ते नेहमी साठी अशी वर्तणूक असेल, आई मनाने खूप प्रेमळ आहेत..त्या नक्की समजतील याची तिला खात्री आहे....
सायंकाळी सहा च्या सुमारास ती खोलीतून बाहेर आली, अमर पण साडेसहा पर्यंत यायचा, तो आला की आईंना आणखी सोप्या पद्धतीने समजून सांगण्यास मदत होईल म्हणून तिने सासूंना आवाज दिला, आई इकडे या ना तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे..
आई: तु कशाला बाहेर आलीस मी खोलीत आले असते, बघ इकडे तिकडे हात लावू नकोस, बोल तुला काय बोलायचे आहे..?
रसिका: आई मी सरळ मुद्द्यावरच येते, तुम्ही एवढ्या शिक्षित आहात तरी सुद्धा अशा गोष्टी पाळता,? इतक्या खालच्या दर्जाचा विचार करता? का?? तुम्हीच विचार करा या कलयुगात या गोष्टी कोणी पाळत का?, उलट लोकांची अशी विचार धारणा आहे की हे नैसर्गिक आहे, देवानेच दिलंय, हे लक्षात घ्या.
आई: हे बघ रसिका मला कुठलाही वाद नकोय मी तुला सांगितल्याप्रमाणे कर.
रसिका: मला एक गोष्ट मात्र खरी सांगा, अमर ची आजी गेल्यावर त्या चार दिवसात कोण करायचं आपल्या घरी सगळी कामं?
आई: अर्थात मीच!! मग कोण करणार!!
रसिका: मग तेव्हा विटाळ नाही व्हायचा का??
तेव्हा बर सगळ चालायचं तुम्हाला, मग आता मी आले तर माझं का नाही चालत, मी पण तुमच्या सारखीच स्त्री आहे..
आई: अग तेव्हा कोणी नव्हत ना करायला, आता मी आहे ना मग नको तु वावरायला या दिवसात...!
रसिका: अहो आई, तुम्हाला कळत कस नाही आहे मी काय म्हणतेय ते!! स्त्री ला पूर्णत्व यानेच येत.. तेव्हाच ती तुमचा वंश वाढवू शकते....इतकी साधी सोपी गोष्ट तुम्हाला कळत नाहीये... या शिवाय एक स्त्री अपूर्ण आहे..!!
तेवढ्यात अमर येतो आणि आल्या आल्या रसिका ला आलिंगन देतो, मग विचारतो,
काय ग रसिका आज तू घरी कशी?? आणि काय गप्पा चालल्यात तुमच्या या वेळी???
आई: अरे अमर!!! तिच्या दूर रहा, काय करतोय, तिला पाळी आलीय, तिच्या चार दिवस दूर रहा.
अमर: काय?????? काय आई काय बोलतेय तु? यात काय नवीन आहे? सगळ्यांचं स्त्रियांना असत ते, त्या शिवाय त्या अपूर्ण आहेत!! आणि काय लांब रहा लांब रहा करतेय? यात लांब राहण्या ऐवजी या काळात स्त्रियांना समजून घ्यावं लागत, त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना हवं नको बघावं, त्यांची पुरेपूर मदत करावी... कारण या तीन दिवसात त्यांना असह्य वेदना होतात, त्यांचे मुड बदलतात, कधी रागावतात पण, म्हणून त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते... आणि तुझं काय चाललंय की दूर राहा...
रसिका अमरचे शब्द ऐकून अगदी सुखावली.. किती समजूतदार नवरा मिळाला होता तिला... किती काळजी होती त्याला तिची... आणि महत्वाचे म्हणजे दोघांचे विचार अगदी जुळणारे....
आई: बस झाल तुमच्या दोघांचं पुराण.... समजले मला सुद्धा.... रसिका बेटा क्षमा कर मला!!! मी नको नको ते तुला बोलले.. मला कळली माझी चूक, तुझच घर आहे..तु आता तुझ्या घराची काळजी घे... मी असेलच नेहमी तुझ्या पाठीशी..!!
रसिका: धन्यवाद आई! तुम्ही समजून घेतल..
आई: कस नाही घेणार ग? इतकी समजूतदार मुलगी मिळलीये मला तुझ्या रूपाने....किती छान समजून सांगितलं... आणि त्यांनी रसिकाच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला..
अमर: चला मग झालं का दोघींचं!! आता मला भूक लागलीय, आई दे ना काहीतरी ..
रसिका: अरे नको, आई ला कशाला त्रास देतोय, मी आणते..
आई: अग रसिका, तुझं पोट दुखतयं ना?.. मग तुम्ही दोघं पण बसा इथे, मी आणते चहा नाष्टा!!
थोड्या वेळात आई तिघांसाठी चहा नाष्टा घेऊन आल्या... तिघांनी छान गप्पा मारत चहा नाश्ता केला.... रसिका आईंकडे बघत होती आणि मनातच हसली, की जर आज वेळीच ही गोष्ट मी प्रेमाने समजून नसती सांगितली तर आयुष्यभर असच सुरू असत...
कलयुगात पण अशा गोष्टींना वाव मिळते याचच नवल वाटतयं..पण मैत्रिणींनो आता ही अशीच चित्रे तुम्हाला खूप ठिकाणी दिसतीलच ..... त्याबद्दल लोकांचे विचार बदलावे म्हणून हा छोटासा प्रयत्न!!
जगाला बदलण्यापेक्षा आधी स्वतः चे विचार बदलावे.. स्वतः मध्ये बदल करावे.!!!