ताटाखालचे मांजर

Tata Khalche Manjr


शिल्पा थोडी कामात ढिल्ली होती.. तिला नौकरी मुळे घरात वेळ देता येत नव्हता.. मग काय तिच्याबद्दल नेहमीच घरात टोमणे दिले जात होते.. इतर जावा सासूबाईला नको नको ते ऐकवत असत..

राधिका, "आई आम्ही सोबत रहात होतो तेव्हा तर तुम्ही आम्हाला कधीच मदत केली नाही,आणि आज तुमची लाडकी शिल्पा जरा काय चार पैसे आणून देते तुम्हाला तर तुम्ही तिची सगळी ठेप ठेवत आहात, तिला घर कामात सगळी मदत करत असतात.. आता कसे तुम्ही हे सहन करून घेतात..तुमचा म्हणजे आमच्यावर जीव नाही ,सगळे काय ते प्रेम छोट्या मुलावर आणि उरलेले छोट्या लाडक्या सुनेवरच?" गमतीने म्हणून टोला लगावला..

राधिका सगळ्यात मोठी सून ती आणि तिचा नवरा काही महिन्यांपूर्वी सासू सासऱ्यांसोबत एकत्र रहात होते.. सोबत छोटा दिर ही होता.. त्याचे लग्न झाले नव्हते..

राधिका कामात चपळ आणि हुशार होती, तिला कोणते काम सांगायची गरज लागली नाही..त्यात बाजूच्या घरात सासूबाईंच्या मोठया जाऊ बाई ही रहात.. मग त्यांची सून आणि राधिका मिळून घरातली कामे करत..ह्या दोन घरांची एकच चूल होती, स्वयंपाक एकच असत पण फक्त रहायला वेगळे होते..

राधिका मुळात हुशार कामसू असल्याने सासूबाईला तिने कधीच कामात भाग घेऊ दिला नाही, मग त्यांनी फक्त वर वरची कामे करून सुनांना मदत करायची हे त्यांचे आप आपसात ठरले होते, त्यात नातवंड असल्याने ह्या दोघी आज्या मुलांना शाळेत नेऊन ,आणून करण्याची कामे करत..म्हणून सासू सुना मध्ये कधी तक्रार झाली नव्हती..

राधिका साधी सरळ जेमतेम दहावी पास होती, घरातल्या कामात स्वतःला व्यस्थ करून घेत तिने लग्नानंतर काही वर्षे एकत्रित काढली, सासूबाई तिला कोणत्या गोष्टी त टोकत नसे..तिला हवे तसे ती करत ..सगळा कारभार तिला सोपवला होता असे ही नाही पण तिला संसाराची एक हौस होती. त्यात आपल्या नवऱ्याची आवड आणि निवड जपताना ती सासू सासऱ्यांची आणि लाडक्या दिराची ही आवड निवड जपत होती.

आई जशी तशी सासू नसणार हे तिला समजत होते. ती तिच्या वागण्यातून सासूबाईला त्यांचा मान पान ही सांभाळून त्यांच्या मनाप्रमाणे रहात होती.

राधिकेने त्यांचा विश्वास जिंकला होता. सगळे कसे छान सुरळीत चालू होते.. तीला कसला जाच त्रास नव्हता पण आता छोट्या दिराचे लग्न होणार आणि नवी सून येणार, आणि त्यांना ही स्वातंत्र्य हवे असणार. नवे जोडपे आहे तर त्यांना ही आता एक वेगळी रूम हवी असणार ,तश्यात हे घर छोटे पडत होते..

तीन जोडपे कसे मोकळे राहू शकणार ह्या विचाराने, आता त्यांनीच हे घर सोडून दुसरी कडे जाण्याचा निर्णय घेतला होता..तशी ही तिच्या नवऱ्याला रोज ऑनलाइन मीटिंग असत आणि त्याला आवाजाचा नेहमीच त्रास असल्याने तो बऱ्याचदा घर बदलून टाकू आपण आणि सगळेच दुसऱ्या नवीन घरात जाऊ..आई बाबा आणि लहान भावाला एक वेगळी खोली असेल असे घर पाहू.. वाटले तर कर्ज ही काढू. पण त्याचा पगार हा कर्ज काढून घरासाठी पुरता पडणार नव्हता, त्यात इतर खर्च ही महत्वाचे होते. हे घर विकून असे फार पैसे येणार नव्हते.

श्याम साठी शिल्पाचे स्थळ राधिकेच्या आईने सुचवले होते.

राधिकाच्या मामाची मुलगी असल्याने तिला शिल्पा जाऊ म्हणून पसंत होतीच, पण एक चांगली समजूतदार मुलगी जशी तिच्या दिरासाठी योग्य असेल तशीच अगदी शिल्पा होती, कुठे नाव ठेवण्यासारखी नव्हती,एकुलती एक मुलगी ,असल्याने थोडे लाड जास्त झाले होते. घरकामाचा थोडा ही अनुभव नव्हता पण फक्त शिक्षण चांगले असल्याने आणि तिला नौकरी असल्याने ती दिरासाठी अगदी योग्य होती. राधिकाला सासूबाईला स्वभाव माहीत होताच, त्या अगदी मवाळ स्वभावाचा असल्याने त्या ही कधी शिल्पाला कसल्या प्रकारे त्रास होऊ देणार नाही हे तिला चांगलेच माहीत होते.. म्हणूनच हे स्थळ करण्यासाठी तीने पुढाकार घेतला होता.. अगदी काहीच हुंडा न घेता साध्य पद्धतीने लग्न लावून शिल्पा घरात छोटी जाऊ म्हणून आली होती..

शेवटी ती काही केले तर जाऊ होती..बहिणीचे नाते ह्या नव्या नात्या नंतर मागे पडले होते..

जशी शिल्पा घरात सून म्हणून आली तशी राधिका हळूहळू तिच्यावर अधिकार गाजवायला पहात होती. शेवटी राधिका काही केल्या तिच्या आत्याची मुलगी होती, फार कधी मने जुळली नव्हती त्या दोघी बहिणीची पण आपली बहीण आहे अन ती जरा तरी आपल्या हिशोबात राहील, जर इतर कोणी आणली तर ती आपल्यावर रुबाब दाखवेल ह्या हेतून ही शिल्पा ह्या घरची सून म्हणून आणली होती..

शिल्पा शिकलेली होती, म्हणून तिचे वागणे बोलणे आणि राहणीमान राधिकाच्या तुलनेत सुशिक्षत होते.. बोलणे एकदम नम्र होते..प्रेमाचे होते..कोणी काही बोललेले तरी कधी ती उलटून बोलत नसे.. आणि म्हणून ती सगळ्यांना आवडू लागली होती.. काही दिवसात तिला नौकरीचे पत्र आले होते.. पगार ही चांगलाच होता. तिला नवऱ्याच्या ऑफिस मध्येच नौकरी लागली होती. तिथे तिचे काम पाहून आणि शिक्षण पाहून नवऱ्या पेक्षा एक पद मोठे दिले होते. मुख्य म्हणजे शिल्पाला तिच्या शिक्षणाचा आणि पैशाचा कधीच गर्व नव्हता. ह्या मुळे ती राधिका पेक्षा सरस भरत होती. घरात तिचा पगार आला की तिने पहिला पगार सासूबाईंच्या हातात दिला होता. तिला तिच्या आई बाबांनी तसे सांगितले ही होते, "आता इथून पुढे ते तुझे घरचे आहेत, तर त्यांना तुझा पगार देत जा "

आईच्या ह्या बोलण्यामुळे शिल्पाने तिचा पहिला पगार सासूबाईंच्या हातात देऊन त्यांचे मन एका क्षणात जिंकले होते. तसे ती परीक्षेत जणू पास झाली होती..आणि पास झाल्यामुळे सासबाईने तिला तिचा पगार परत तर दिलाच पण सोबत त्यांना त्यांच्या सासूबाईने दिलेली नथ ही दिली होती.. सासूबाईंच्या नजरेत आता शिल्पाचे स्थान मोठे झाले होते..

शिल्पा ने ही नको नको म्हणत पगार घेतला जरी होता तरी, त्यातून तिने सगळ्यांना बाहेर घेऊन जाण्याचे ठरवले होते आणि सगळ्यांना त्यांच्या आवडीचे असे कपडे घेऊन दिले होते तर आईला आणि मोठया वहिनीला पैठण्या घेऊन दिल्या होत्या..तिच्या नवऱ्यासाठी एक सोन्याची अंगठी घेतली होती..सगळ्यांचे मन अगदी तृप्त केले होते.

इकडे सगळे खुश होते की राधिकाची बहीण आणि तिने निवडून श्याम साठी आणलेली बायको अगदी सोन्या सारख्या मनाची आणली होती..जसे शिल्पाचे कौतुक करत होते तसे राधिकेचे ही कौतुक होत होते.. दोन्ही सुना अगदी खरे सोने आहेत असे म्हणत होते.. आमचे काही पुण्य असावे म्हणून अश्या सुना आम्हाला मिळाल्या ..

पण कुठे तरी राधिका शिल्पावर ताव खात होती, तिला आता शिल्पा ला आपण सून म्हणून आणले यात चूक तर केली नाही ना असे वाटत होते.. तिला ताटा खालचे मांजर म्हणून आणले होते पण तिने तर माझी सगळी निराशा केली..सगळा भाव ती खाऊन गेली..मला कधी मिळणारा मान आता तिला मिळत आहे हे तिला बघवत नव्हते..

शिल्पाला घर काम येत नव्हते ,मग सासूबाई आता तिला सगळ्या कामात मदत करत होत्या, तिला सकाळी डबा करून देत होत्या ,ती येईपर्यंत सगळा स्वयंपाक तयार करून दोघी मस्त चहा करून गप्पा मारत असत, तर राधिका मुद्दाम काही कामाला हात लावत नसत..ती आता एका खोलीत जाऊन बसली की बाहेर येत नसत.. तिला शिल्पा चे हाल कसे होतील आणि ती कशी आलेली अडचण दूर करेन माझ्याशिवाय हे दुरून पहात असत..

शिल्पा आता कामात थोडी सराईत झाली होती, म्हणून ती सोपे सोपे काम करून बाकी कामात आईची थोडी मदत घेत होती..मग राधिका आली काय आणि नाहीच आली तरी त्यांना फार फरक पडत नसे..उलट सासू बाई म्हणत अग तिने खप काम केले आहे, आता काही दिवस इथे असेपर्यंत तिला जरा सासर सुख घेऊ दे, तिला तशी ही ह्या अवस्थेत आरामाची खूप गरज आहे..मी आहे म्हणून तरी ती बिनधास्त बसू शकते पण नवीन घरी तिला कोणी अशी बसू देणार नाही ,मग सगळे तिला करावे लागणार बघ..मला तर तिने ती लग्न होऊन आल्या पासून कधी ही कोणते ही काम करू दिले नाही...मला जो आराम मिळाला तो तिच्या येण्याने मिळाला होता... माझी राधिका गुणाची आहे ग..फक्त कधी कधी ती चिडते इतकेच नाही तर तिचे मन खूप चांगले आहे, तू तिच्या हातचे कधी जेवून बघ तू बोट चाटतच राहशील .. सासूबाई आपले असे कौतूक करत होत्या हे पाहून राधिकाला खूप बरे वाटले आणि तिने शिल्पा बदलले चे मनातले साठलेले सगळे राग लोभ दूर सावरले..

ती आज खोलीतून बाहेर आली आणि आईच्या हातावून सगळे काम काढून घेतले आणि त्यांना म्हणाली, "चला तुम्ही दोघी आज मी माझ्या हातचा स्वयंपाक
करणार आहे "

आईला जुनी राधिका परत मिळाली होती, ती रुसली तर किती तरी दिवस त्यांचे मन लागत नव्हते.. पण आज त्या भारी खुश होत्या..

दोघी सुनांना त्या जीवापाड जपत होत्या,पण कोणी रुसली की त्यांना चुकल्या सारखे वाटत होते.. कधी ही त्यांनी दोंघींची तुलना केली नाही..कारण दोघी ही आप आपल्या जागी उत्तम होत्या, गुणी होत्या..


टीप... घर टिकवायचे असेल तर कधीच दोन सुनांमध्ये तुलना करू नका... हो ना