Feb 26, 2024
नारीवादी

तू अजून ही तरुण आहेस

Read Later
तू अजून ही तरुण आहेस
तू अजून ही तरुण आहेस

सकाळी तिने केस मोकळे सोडले आणि ते वाऱ्यावर उडू लागले..एका क्षणात तीला आपल्या कॉलेजच्या त्या रंगेबेरंगी दिवसात जणू असल्या सारखी नाचू लागली होती.. वाऱ्यावर उडणारे केस, ती ओढणी..ती हळूच बिलगणारी झुळूक.. किती सारे मोहणाऱ्या आठवणी.. तो आंनद वेगळाच होता तिच्यासाठी... क्षण भर विसरून गेली होती की आपण आता चाळीशी पार करून पुढे आलो आहोत...
त्यात केसांशी खेळतांना नेमका एक पांढरा केस दिसला..आणि क्षणात तिला आठवण झाली आपले आता वय झाले आहे...ते दिवस गेले आणि आता पुढचे म्हतारपण साजरे करायचे आहे असे हा पांढरा चमकणारा केस सांगून गेला आहे.
नवरा बाजूला उभा होता ,तो तिचे हे अचानक बदललेले वागणे पाहून म्हणाला,काय ग काय झालं, अशी अचानक का येऊन बसली आहे इथे.. का तू केस बांधले लगेच...उडू दे की ते वाऱ्यावर जरा ,छान वाटत होते ते तसे उडताना आणि ते उडत असताना तू ही छान मोहरली होतीस आनंदाने.. मला ही तुला किती दिवसांनी आंनदी पाहून खूप छान वाटले होते...तुला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तू तुझ्या गॅलरीत असेच केस मोकळे सोइन उभी होतीस.. वाऱ्यावर तुझे असेच हे केस उडत होते...क्षण भर मी ही हरवलो होतो तुझ्या ह्या मोकळ्या काळ्या भोर केसांत.. किती रम्य दिवस होते ते...रोज मग तुला पाहूनच मी पुढे ऑफिसला जायचो...तू दिसली नाहीस असा एक ही दिवस जायचा नाही माझा...सवयच लागली होती मला तुझी...हळूहळू तुझ्या ह्या केसांमुळे मी तुझ्यात गुंतत गेलो होतो ...तुला ही नंतर नंतर माझे वागणे समजले होते जणू...तू ही मग मुद्दाम ते केस बांधून माझी गम्मत बघायची...ह्या रोजच्या खेळात तू ही माझ्यात गुंतत गेली होतीस...मग फार ताणून नको म्हणून तू पुन्हा मोकळे केस सोडून माझ्या जाण्याचा वेळेस गॅलरी मध्ये येत.. आज पुन्हा ते दिवस आठवले मला..

ती...अरे बघ ना ह्यात आज एक पांढरा केस सापडला..त्याने मला माझ्या वयाची आठवण करून दिली.

तो...असे किती पांढरे केस सापडले सांग बरं

ती...अरे एकच सापडला, तरी तो ही खूप आहे वयाची आठवण करून देण्यासाठी

तो.. त्या एका केसाकडे नको बघू त्या कित्येक काळ्या केसांकडे बघ.. ते काय आठवण करून देत आहेत ते बघ.. फक्त एक केस जर म्हतारपणाची आठवण करून देत असेल तर हे कैक काळे केस तरुणपणात घेऊन जाणार नाहीत का..? एका कडे नाही बघायचे . इतर हजारो काय सांगत आहे ते पहायचे.. ते म्हणत आहे तू अजून तरुण आहेस.. तुला अजून ही म्हतारपण इतक्या सहज येणार नाही..आमच्या रंगावर नको जाऊ तू, तुझे मन तरुण ठेव , आम्ही काय आज ना उद्या बदलू पण मन नाही बदलणार जर ते तरुण असेल तर..सांग ह्या केसांना तू अजून ही तरुण आहेस..

©®अनुराधा आंधळे पालवे

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//