
चांदण्यांनी भरलेले आकाश अन शीतल असा चंद्र...!!
यांच्याशिवाय तर रात्रीच्या तारांगणाची अन मनमोहक
सौंदर्याच्या उपमांची कल्पना केवळ अपूर्णच...
चंद्र अन चांदण्याशिवाय अपूर्ण असलेले हे तारांगण मात्र एकमेकांच्या
अस्तित्वाच्या अनुपस्थिती मध्येच आपले अस्तित्व प्रकट करू शकतात.
कलेकलेप्रमाणे जसा चंद्र आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो,
तसे-तसे चांदण्याचे अस्तित्व हळू हळू लुप्त होत जाते. पौर्णिमेला उरतो तो फक्त चंद्र!
आपल्या सौंदर्याने अनेक मनांस भुरळ पाडणारा तो रजनीनाथ..!!
अगदी त्याचप्रमाणे अमावास्येला चंद्राच्या अनुपस्थितीत राहते फक्त चांदण्यांनी खाचोखाच भरलेले आकाश..!! टीमटीमत आपल्या कडे नजर खेचणारे अन अस्तित्वाची जाणीव करून देणारे अतिसुंदर असे तारांगण..!!