पत्र लिहिण्यास कारण की....

Tapal.


स्पर्धा :- गोष्ट छोटी डोंगराएवढी.
विषय :- टपाल.
शीर्षक :- पत्र लिहिण्यास कारण की....



आण्णा - ऊंच धिप्पाड, नाक सरळ धारधार, रंग गोरा, अति नियमात चालणारे व्यक्ती, जून्या विचारांचे. रागीट, कडक स्वभाव. ४० वर्ष पूर्ण संसार झालेला.


आण्णाची पत्नी माई - साधे राहणीमान, शांत, संयमी स्वभाव. घर आणि सरकारी नोकरी करत दोन्ही सांभाळून घेतले आयुष्यभर.


आण्णा - आज आयुष्याच्या संध्याकाळी आण्णा पत्र लिहायला घेतले होते. टेबल, खुर्ची, पत्र, लेखणी आणि आण्णांनी माईसाठी पत्र लिहायला घेतले होते. 40 वर्षांच्या संसारातील असंख्य आठवणी जाग्या झाल्या होत्या. प्रिय माई. माझी मालती कधीच एकदाही एवढ्या मोठ्या कुटूंबात म्हणालो नाही. आज मनापासून म्हणतो प्रिय.... आणि आण्णा लिहित सुटले होते.

आण्णा - लिहतात तुझी संसारात भक्कम साथ लाभली याआधी एकदाही माई तुला सांगितलं नाही आणि आज सांगतो. तुच संसारात खुप केले. सासूबाई आणि सासऱ्यांचे आजारपण, पथ्यपाणी केले. सासूरवास खुपच सहन केला. नणंदबाईना माहेरपण आज पर्यंत दिले. भारीच्या साड्या नणंदबाई साठी घेतल्या. माई तू नोकरी केली. माझ्या नोकरीमध्ये अडचणी आल्यावर तू उभी राहिली. माझ्या नोकरी मध्ये कायम अनंत अडचणी तुझी कुठलीही हौस मौज पुरवली नाही. तुला साडी कधीच मी घेतली नाही. तू दोन मूलाचे शिक्षण केले. मुलीचे लग्न केले. माझा रागीट स्वभाव आयुष्यभर सहन केला. घर चालवले. संसार सुखाचा केला. दोन मुले खुप शिकवली आज परदेशी नोकरी करत आहे मोठ्या पगाराची.


आण्णा - पहिल्यांदा आण्णा आज भावूक झाले.. अश्रूमुळे पत्रातील अक्षर धूसर झाली. तर काही अश्रूमूळे शब्द मिटले.


आण्णा - पत्रात माईची माफी मागत होते. कारण रागाच्या भरात त्यांनी कित्येकदा माईना मारले. हात उगारला." तुला काही कळत नाही. शांत बैस." हे तर वाक्य ठरलेले. माईनी कधीही आण्णाची साथ सोडली नाही म्हणून आण्णांनी माईंचे आभार मानले.


आण्णांनी पत्रात लिहिले - मी कधीही तुझ्या बाजूने उभाच राहिलो नाही. नेहमी माझी आई, वडील, भाऊ, बहीण बरोबर आहे. माई तुझी बाजू कधी समजावून घेतलीच नाही. तू मात्र सणवार, स्वयंपाक पाणी, पै पाहुणा सगळे सांभाळले. आज माझ्या सगळ्या चुकांसाठी मला माफ कर. आण्णा एकटेच घरात टाहो फोडत रडले.


अखेर अण्णांनी स्वतःला कसेबसे सावरले. अण्णांनी सगळे पत्र गोळा केली. पाकीटात घातली.


आण्णा दवाखान्यात आले. माईना दाखल केले होते. माई त्यांच्या कॉट वर निवांत पडलेल्या होत्या. आण्णांनी प्रेमाने आणलेला मोगऱ्याच्या गजरा आणि पत्र लिहिलेले पाकीट माईच्या हाताशी ठेवून माईना जाग येण्याची वाट पहात होते. आण्णाचा डोळा लागला.


माईची झोप तशी सावध असल्याने जाग आली. माई मोगऱ्याच्या गजरा पाहून खूपच आनंदून गेल्या. हाताला पत्राचे पाकीट लागले. माईनी पत्र वाचायला घेतले. आण्णांनी आणलेला पहिलाच गजरा होता हा.. माईना त्याचे खुपच मोल होते.



आण्णाचे आजवर न पाहिलेले रूप माईनी पत्रात पाहून माईच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. आण्णाच्या अश्रूमूळे मिटलेले शब्द भावना सहित माई पर्यंत पोहचले. माईच्या हुंदक्यांनी आण्णांना जाग आली.


माईना दवाखान्यातून सुट्टी मिळाली. माईना बरं वाटायला लागले होते आता. माईना घेऊन आण्णा घरी निघाले. माईनी पत्र ह्रदयाच्या जवळ कवटाळून घेतले. आण्णांनी गजरा माईच्या वेणीत माळला. आण्णाच्या पत्राने, मोगऱ्याच्या सुगंधाने माईंचे आजारपण पळून गेले. दोघे घरी निघाले होते.


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©®12. 10.2022