तनु..
दिसायला सावळी , नाकी डोळी नीटस टोकदार अशा नाकाची . ओठ गुलाबी डोळे पाणीदार बोलके जणु काही तरी सांगतायत , गाल तर जणु काही वर आलेले .अंग काठी नाजुक सडपातळ अशी , केस तर जणु काही देवीची च देन आहे अशी . ढुंगण च्या खाली लांब सडक वेणी घातली तर गाई च्या शेपटी सारखी सतत हलत राहणारी . केसांची एक बट गालावर येणारी . तिचे ते सौंदर्य पाहुन कोणी हि जिव लावेल तिच्यावर , प्रेमात पडेल असे . अंगावर तर कपड्यांचा अता पता नाही , कारण ४ घरात धुणी भांडी करणारी .
नुकतीच कोवळ्या वयातुन , तारुण्यात प्रवेश करणारी फक्त १२ वर्षांची आमची हि तनु. खरच तिचे ते रूप डोळ्यात सामावून घेणार होते. तनु च्या घरी गरिबी जणु काही पाणी भरते आहे अशी . दोन वेळचे जेवण हि त्यांच्या दिवस भरात केलेल्या कामावर आवलंबुन असे.
तनु ला वडील नव्हते . घरी इन मीन फक्त 3 माणसे ति, तिची बहीण , आणि आई . तिची आई तस मिळेल ते काम करायची म्हणजे दगड फोडणे असो किंवा धुणीभांडी , किंवा मग अंगावर धान्याचे पोते घेऊन घरात पोहचवने . जस एखाद गडी माणुस करत तस , बहीण लहान असल्यामुळे तिला घरा कडे ठेऊन त्या दोघी माय आणि लेक काम करायचे . तनु चे काम नीट आणि स्वच्छ आणि , सगळ्यात जास्त ईमानदारी मध्ये असल्या मुळे तिला दोन पैसे जास्त मिळायचे .
तनु तिच्या कमी वया मध्ये मोठ्या माणसा सारखे वागायची , तस तर मोठी माणसे ही चुकतात समजुतीने ने वागायला . पण तनु चे कौतुक करावे तितके कमी होते. तनु आमच्या कडे सकाळी ७ वाजताच हजर व्हायची . तिचे तसे १ तासात काम आवरून व्हायच ,तिचे आमच्या कडे लादी आणि भांड्यांच काम असायच . तिला गरज आहे म्हणुन आई ने मुद्दाम तिला ठेवलेले घर कामाला , पण आई तिला जास्त काही काम ठेवायची नाही .तिचे काम आवरून झाले की माझि आई तिला चहा आणि त्या सोबत खायला बिस्कूट द्यायची .
गरीबाची मुलगी तिला चहा बिस्कूट खायला दिले की ति इतकी खुश व्हायची की , तिच्या त्या चेहऱ्यावर चे हसू पाहुन कोणाच्या ही डोळ्यांत पाणी येईल . माझि आई तिला गरीबाची पोर म्हणुन कधिच वागवले नाही , आई तिला माझे थोडे जुने झालेले कपडे द्यायची. खरे तर माझे कपडे कधि फाटके नसायचे कंडीशन चांगली होती कपड्यांची. पण थोडे जुने झालेले असायचे एवढेच काही होत .नाही तर आई तिला वर्षातुन दिवाळ सन आल की नवे कपडे घेऊन द्यायची , मि तर मुलगा होतो .माझे दिलेले कपडे घातले की ति अजून जरा छान दिसायची , मि तसा काही मोठा नव्हतो तनु पेक्षा वर्षांनी मोठा होता .पण माझे शर्ट नि पँट तिला नीट व्हायची .
एक दिवस तनु आजारी पडली थोडा ताप आला होता . त्या मुळे आमच जणु काही घर च आजारी पडलय अस वाटल मला. कारण माझि आई तिच्या साठी खुप काळ्जी करायची, तिने खुप टेन्शन घेतले होते .मि आईला नाईलाजाने तनु च्या घरी घेऊन गेलो .
बिचारी तनु त्या तुटलेल्या लोखंडी खाटेवर पडुन होती .ति थंडीने उडत होती अंग खुप ताप ले होते , तनु चा चेहरा पूर्ण कोमेज्ला होता . घरात चूल ही पेटली नव्हती त्यांच्या, कारण पैसे नव्हते काही करून खायला ...
"काय ग डॉक्टर कडे घेऊन गेली होती का हिला ? "( आईने तनु च्या आईला विचारल ).
"नाही कवा नि कुठ घेऊन जाणार , आमास नि लय पैका ची तकलीफ हाय ..तवा न्हाई घेउन गेलव हिला .."( तनु ची आई बोलते )
माझ्या आई ने काळजी पोठि आणि माणुसकी म्हणुन तिच्या कडचे पैसे काढुन तनु च्या आईच्या हथाथ दिले ..
"घे हे पैशे आणि तिला आधि खायला दे नि डॉक्टर कडे घेउन जा औषध पाणी कर आणि लागलेच काही पैशे तर नक्की सांग मला मि देईन तुला .."( आईला तनु ची ही हालत बघवत नव्हती , सारखे आईच्या डोळ्यांत पाणी येत होत )
काय करणार शेवटी ति आई ना मग ति कोणाची ही असुदे , तिच काळीज हलूण निघत .
आई घाई घाई ने घरी आली तिने एका टोपात पटकन तांदळाची पेज लावली , आणि डब्या मध्ये भरून मला तनु च्या घरी घेउन जा सांगितले .
दुसऱ्या दिवशी आई तनु च्या घरी तिला बघून आली , तनु चा ताप आता जरा उतरला होता . आई ची त्या रात्रीची काळजी पाहुन , मला खुप आचार्य वाटले .
जशी तनु बरी झाली त्या दिवसा पासून तिने परत काम करायला चालु केल होत .काय करणार घरात बसुन कोण पैशे देणार म्हणुन.
"अगं तनु बाळ जरा आराम करायचा ना !" ( माझि आई तनु ला बोलते तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत )
"मि काम न्हाई केल तर आम्हांस नि पैका कोण दिल ?" ( तनु आईला बोलते )
आईने तिला कामावर येऊ नकोस , फक्त येऊन दोन घास खा नि महिन्याचे पैसे घे असे सांगुन दिले . कारण आईला तिची ही धडपड पाहवत नव्हती , तसे तर आधि पासून आई तिला काही काम ठेवत नव्हती .
हे ऐकुन तनु च्या डोळ्यांत पाणी आल , आणि तेव्हा तिने आईला काकी अस आवाज ना देता " माय "असा आवाज दिला (आणि आईला तिने घट्ट मिठी मारली )
ह्या नंतर आई तिचा सगळ छोटा मोठा खर्च उचलत होती ..
अशातच एक दिवस सकाळ पासून तनु माझ्या आईला भेटायला आली नव्हती , आई दुपार पर्यंत तिची वाटे कडे नजरा लाऊन बसली होती .शेवटी आई ने न राहून मला तनु च्या घरी जाऊन बघायला सांगीतल , की काही प्रॉब्लेम तर नाही ना, तनु ठीक तर आहे ना . आईच्या जीवाची सारखी घालमेल होत होती .
मि तनु च्या घरा कडे जाऊन पाहिले तर घराला कुलूप होते .मि आजू बाजूच्या त्यांच्या त्या झोपड्यांन मध्ये ही पाहिले , विचारपूस ही केली पण तनु ची काही बातमी नव्हती . मि घरी येऊन आईला सगळ सांगीतल आई खुप काळजीत आली , पण मग मीच न राहून आईची समजूत काढली .
"अगं आई ssss कदाचित ति लोक दुसरी कडे काम बघायला गेली असतील , येतील परत तु नको काळजी करू आपण जरा वाट पाहू ..(मि वाट पाहू बोललो तरी खर पण रात्र व्हायला आली होती रात्रीचे १० वाजले होते )
मला ही जरा काही तरी विचित्र घडतय अस वाटू लागल होत मनाला , सकाळ पर्यंत वाट बघू अस मनाला समजुन सांगितल..
सकाळ उजाडली , आई रात्र भर झोपली नव्हती सतत तनु चा विचार करत होती .काय झाले असेल कुठे गेले असतील आईच्या जीवाची घालमेल होत होती . ति झोपली ही नव्हती हे तिच्या डोळ्यांवरून समजत होते , तिचे डोळे लाल आणि सुजलेले होते. मि जसा उठलो तसा मला आई ने तनु च्या घरी जाऊन बघायला सांगीतल. मि धावत तनु च्या घरी गेलो ssss तर पाहतो तर काय , तनु ची आई खुप रडत होती त्यांच्या घरात शेजारची लोक जमली होती . मला काही सुचेना मि तसच पळत
आई ला सांगायला गेलो ( मला खुप दम लागला होता आमच घर तिसऱ्या माळ्यावर होत ना )
"आई ssss अगं आई sssss चल तु लवकर तनु च्या घरी."
( दम काढत मि श्वास घेत आई ला बोलतो )
"अरे झाले तरी काय इतक धावत का आलास, काय झाले???? (आई माझ्या पाठीवर हाथ फिरवत बोलते )
"अगं तिथे तनुssss तनु sssss तनु ची आई रड्ते आहे, खुप लोक सगळे जमले तिच्या घरी "..( आई ला सांगत मि बोलतो )
आई जास्त काही न विचारत सरळ चप्पल घालून पळत , तनु च्या घरी पोहचते ..
"काय झाले तनु ची आई , तनु कुठेय .."(आई बोलते तनु च्या आईला )
"काल पासुन पोरीचा काही पत्या न्हाय , आम्ही समद्या ठिकाणी सुधलव . पर कुठ हाय ठाऊक न्हाई .." ( तनु ची आई बोलते रडत रडत , तोंडावर साडी चा पदर कोम्बत )
"अगं पण काल तुम्ही कोणी नव्हता , आम्ही येऊन पाहुन गेलो आणि तनु सकाळ पासुन दिसली नाही .."( आई बोलते )
"तिलाच शूधाया काल सकाल पसूम , मि बाहेर गेली व्हती .."(तनु ची आई बोलते )
"बर तिची तक्रार केलिए का पोलीसात तु ?."( आई विचारते तनु च्या आईला )
"व्हय केलीया तक्रार, पण त्यांचा बी आजून काही जवाब न्हाय ."( तनु ची आई बोलते )
आणि खुप रडायला लागते , हुंदके देत .
"सापडेल ति आपण शोधू तिला सगळी कडे , मि आहे तुझ्या सोबत ".( आई बोलते )
"बर मला एक सांग , ति जिथे जिथे काम करते त्यांच्या जवळ विचारपुस केलीस का तु ." ( आई विचारते तनु च्या आईला )
"व्हय शुध्लव.!" (तनु ची आई बोलते आईला )
"नाही ग पोर खुप लहान आहे , आणि कोणाची कशी नजर आपण नाही सांगू शकत . "
आई बरोबर बोलत होती , कारण तनु दिसायला खुप सुंदर होती .तिचे ते लंब सडक केस . आताच्या ह्या जगात खुप काही चालत कोणाच काही सांगू शकत नाही , आणि गरीब घरची साधी धुणी भांडी करणारी म्हटल्यावर कोणी ही कसा ही वागू शकेल .आणि तिच्या सोबत वाईट काही झाले असेल ह्या आधि तरी तनु कदाचित बोलणार नाही , कारण तिने काही बोलली तर उगाच काम जायच हाथ च. मला ति भेटत नाही म्हटल्यावर मनात नको ते विचार येत होते .मि थोड स्वतःला आवरले .
तनु च्या चौकशी साठी पोलीस मध्ये मध्ये येत होते, आता ३ दिवस होऊन गेले होते तरी तिची काही बातमी नाही .आणि अचानक सकाळीच आमच्या दारावर जोर जोरात थाप पडते , मि गडबडून जागो झालो . पाहिले तर सहा वाजले होते , तितक्यात आई ने दरवाजा उघडला तर दरवाजा वर तनु ची आई होती .खुप रडत होती ( आई ने तिला लगबगीने आत घेतले )
"काय झाले तु इतकी रडते का , तनु ची काही बातमी ?"( आई ने विचारले )
"व्हय ssss पोलीस आले हाय खाली , बोलूव्ल हाय ईस्पितलात." (हुंदके देत आईला सांगते)
"तुमी बी चला ना माझ्या संग , मला लय भ्या वाटतीया ".(पदर पसरत आई समोर )
"अगं होsss हो sss तु अशी विनवणी नको करू मि येते सोबत चल ." .(दोघी लगबगीने धावत खाली गेल्या )
आई हॉस्पिटल मध्ये पोहचते , पोलीस आईला सांगतात की मेडम एक डेड बॉडी भेटली आहे , ओळख पटवण्यासाठी तुम्हाला बोलावलंय . (पोलीस सांगतात )
आई नि तनु च्या आईला एका बंद रूम मध्ये घेउन जातात पोलीस आणि तिथे त्यांना एक सफेद चादर ने झाकून ठेवलेली बॉडी दाखवतात .
आणि ति बॉडी बघताच तनु च्या आईची पायाखालची जमीन सरकते , आणि ति कोसळून जमिनीवर पडते . तिची पूर्ण पणे शुध्द हरपते , आई बॉडी पाहुन जोर जोरात रडू लागते . कारण ति बॉडी असते एका निरागस तनु ची . (आई स्वतःला सावरत बॉडी ची ओळख पटवून तनु च्या आईला घेउन रूम मधून बाहेर पडते ) आईला जाऊन बराच वेळ झाला होता , सकाळचे १० वाजले होते .मि आईची वाट पाहत खिडकीवर बसुन होतो , तितक्यात ऍम्ब्युलन्स चा आवाज येतो .मि तडक धावत धावत खाली येतो आणि पाहतो तर काय , एका स्ट्रेचर वर कपड्यात लपेट्लेलि (गुंडाळलेली ) ति तनु असते .मला पाहुन धक्काच बसतो , डोळे पाण्याने भरतात माझे , पायात जणु त्राण च राहत नाही माझ्या . तनु च प्रेत तिच्या घरात घेउन जातात , शेजारी पाजारी सगळीच जमली होती . तनु ची धाकटी बहीण तर खुप रडत होती बहिणीला सांगत होती.
"ताई ग ssssss अगं उठ ना ग .....नको ना अस झोपून रहूस. खेळ ना माझ्या सोबत."
तिला पाहुन तर मला खुप रडायला येत होत . तिची आई तर काहीच बोलत नव्हती एकटक तनु च्या प्रेताकडे पाहत होती .साधं ति रडत ही नव्हती , बायका तिला रडवन्या साठी खुप प्रयत्न करत होते .पण काहीच अर्थ नव्हता , तनु च प्रेत जेव्हा चादरी तुन बाहेर काढण्यात आल तेव्हा तिचा चेहरा खुप विचित्र झाला होता , तिचे केस तर पूर्ण काढुन तिच मुंढन केलय अस वाटत होत , शरीरावर चटके दिले आहेत अस समजत होते.खुप काही विचित्र जाणवत होते , शरीरावर खुप जखमा होत्या . प्रेत जास्त वेळ ठेऊ शकत नाही अस डॉक्टर म्हणाले होते .म्हणुन तिच प्रेत त्यावर सोपस्कार करून उचलून शव वाहिनी मध्ये घालून स्मशानात घेउन जाण्यात आले. मि जाणाऱ्या ऍम्ब्युलन्स कडे पाहत राहिलो खुप वेळ झाला तरी तिची आई बोलायला तयार नव्हती .जणु ति तिच्या मध्ये नव्हती हरवुन बसली होती स्वतःला .आई ने मला तनु च्या लहान बहिणीला वरती घरी घेउन जायला सांगितले , मि तिला माझ्या घरी घेउन आलो तिला शांत केल , थोड फार खायला दिल . आईने तनु च्या आठवणी सांगुन तिच्या आईला रडवायला लावल . तिची आई तनु करत जोरात हुंदका फोडते आणि खुप रडू लगते .आई कडून समजत की तनु ज्या ठिकाणी कामाला जायची तिथे खुप अघोरी प्रकार व्हायचे आणि तनु चे केस खुप मोठे होते म्हणुन तिला अघोरी कामासाठी वापरण्यात आल . आणि त्यात तिचा बळी गेला .
मला ऐकुन खुप वाईट वाटले .आज तनुला जाऊन खुप महिने झालेत आई तिची नव्याने कामाला लागलि आहे आणि तिच्या धाकट्या बहिणीला आई संभाळते माझि आम्ही तिला दत्तक घेतलय .आता ति चांगल्या शाळेत जाऊन शिकते आहे . पण तनु च्या आठवणीने आजून ही सोबत आहेत आमच्या. त्या मोठ्या सुंदर केसांनी तिचा घात केला ...