Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 8

Read Later
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 8
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 8

मागील भागात आपण पाहिले नित्या मेहराचा खून झाला आणि त्याचा आरोप पुर्वावर आला. तसेच स्नेहा आणि मयूर दोघेही आजूबाजूला कोणीतरी रडत असलेले पाहून घाबरले. सचिनवर हल्ला झाला. नित्याच्या ताब्यात असलेले व्हिडिओ आणि फोटो मिळवायचे समीरने ठरवले. आता पाहूया पुढे.


इन्स्पेक्टर पूर्वा खुनाच्या गुन्ह्यात फरारी आरोपी जाहीर. मीडिया अक्षरशः धिंडवडे काढत होता.

"गाईझ,आपल्याला आता लगेच बंगला सोडायला हवा. जसा आहे तसा."
अशोक अगदी पुर्वासारखे निर्विकार राहून बोलला.

"अरे,पण का? आपण काय?"
दिव्याचे बोलणे अर्धवट टाकून प्रियांका,मनोज,सचिन तिघांनी महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू घेतल्या.

झोपलेल्या मुन्नीला अशोकने उचलले आणि मनोज गाडी घेऊन आला. त्याक्षणी सावली बंगल्याला टाळा लावून सगळे बाहेर पडले. यांची गाडी बाहेर पडत असताना एकापाठोपाठ एक चॅनलच्या गाड्या आत शिरत होत्या.

"सर्वांनी आपापले नंबर बंद करा. नित्या मेहरा अतिशय मोठी आणि वेगळी आसामी आहे. पूर्वा आपल्यासोबत नाही. आधी वकील गाठायला हवा."
मनोजने सूचना दिली.

अशोक फोन बंद करणार इतक्यात त्याला रागिणी मॅडमचा आभाराचा मॅसेज दिसला. त्याने तात्काळ रागिणीला फोन लावला.

"मला तुमची मदत हवीय. कुठे भेटू शकाल तेही सुरक्षित."

अशोकने विचारले.

"लोकेशन पाठवते,तिथे थांबा. मी शूट संपवून येईल."
अशोकने लोकेशन दुसऱ्या नंबर वर कॉपी केले आणि सर्वांनी आपापले मोबाईल बंद केले.


समीर शाल्मलीला काहीही न सांगता बाहेर पडला. ड्रायव्हरला घरी पाठवून त्याने स्वतः ची गाडी न घेता कॅब बुक केली. अर्धा रस्ता पार झाल्यावर त्याने कॅब सोडली आणि टॅक्सी करून नित्याच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर पोहोचला.

त्याला नित्याची बेडरूम माहीत होती. समीरने सगळीकडे शोधले. परंतु कुठेच काहीही ठेवलेले नव्हते. समीर निराश झाला. समोरच्या भिंतीवर नित्याचे भव्य पोट्रेट टांगलेले होते.

"यू बिच."

समीरने तिच्या पोट्रेट वर तिथला फ्लॉवर पॉट फेकून मारला काच फुटली आणि मागचा कागद फाटला. समीर बघतच राहिला.

मागे एक गुप्त कपाट होते. समीरने कपाट उघडले. आतमध्ये काही डी.व्ही. डी. मोबाईल सेल,सिम कार्ड आणि लॉकरची चावी होती. समीरने सगळे सामान बॅगेत भरले. समीर जायला निघणार इतक्यात त्याच्या पाठीवर रिव्हॉल्वर लावलेला त्याला जाणवला.


अशोक सर्वांना घेऊन लोकेशनवर पोहोचला. उच्चभ्रू वस्तीत असलेल्या काही निवांत जागांपैकी एका ठिकाणी रागिणीचा बंगला होता. अशोक आणि सर्वजण आत आले.


"अशोक पूर्वा कशी असेल? तिला काही झाले नसेल ना?" प्रियांका म्हणाली.

"माहीत नाही. पण आपले खाजगी नंबर तिच्याकडे आहेत. पूर्वा जोवर आपल्याला संपर्क करत नाही आपल्याला मीडियासमोर येता येणार नाही."
अशोकने समजावले.


" पण त्यामुळे आपला शोध सुरू होईल ना!"

मुन्नी पहिल्यांदा बोलली.

सगळेजण हसले. तेवढ्यात सचिनचे डोळे चमकले.

"दिव्या,तुझ्या ब्लॉगवर एक कोकण भेटीचा ब्लॉग लिही. त्यात आपले मागच्या वर्षीचे फोटो टाक. फक्त तुझे एकटीचे फोटो नकोत. ग्रुप फोटो ज्यात पूर्वा नाही."

सचिन तिला समजावत होता.

"येस,त्यामुळे आपल्याला काही वेळ मिळेल."

मनोजने सचिनला शाबासकी दिली. दिव्याने लगेच ब्लॉग लिहिला आणि पोस्ट केला.


दुपारी वॉचमन काका जेवण करत होते. तेवढ्यात मयंक आला.

"काका,झाले का जेवण? हे बघा आईने खीर पाठवली आहे."
मयंकने खिरीची वाटी समोर धरली.

वॉचमन काकांनी खीर खाल्ली. त्यावेळी मयंक मुद्दाम त्यांच्याशी गप्पा मारत बसला. थोड्याच वेळात वॉचमन झोपेच्या स्वाधीन झाला. मयंक हसला. त्याने मास्टर की काढली आणि गुपचूप लिफ्टचे बटन दाबले. दुपारच्या वेळी सोसायटी पूर्ण रिकामी असे. मयंक शिताफीने सत्येनच्या फ्लॅटमध्ये शिरला.


त्याने भराभर काही दिसते का? तपासायला सुरुवात केली. सगळीकडे शोधत असताना काहीच सापडत नव्हते. तेवढ्यात मयंकची नजर दुसऱ्या बेडरूममधील पार्सलवर गेली. सर्जिकल उपकरणे? मयंकने पटकन फोटो काढले आणि विद्युत वेगाने तो बाहेर पडला. त्याने चावी गुपचुप ठेवून दिली आणि स्वतः च्या घरी आला.


"गुपचुप बॅग खाली ठेव आणि डोक्याच्या मागे हात ठेवून वळ."

समीरला रिव्हॉल्वर आणि एका स्त्रीचा आवाज ऐकून आश्चर्य वाटले.

तो मागे वळला.

"इन्स्पेक्टर पूर्वा ? तू एक फरार आरोपी आहेस. मला गुपचूप जाऊ दे."

समीर पुर्वाच्या डोळ्यात पहात बोलला.

थाडकन गोळी त्याच्या कानाला घासून भिंतीत शिरली.

"नेम चुकला नाही. हा फक्त इशारा होता. तसेही हे माझे सर्विस रिव्हॉल्वर नाही. त्यामुळं तुला ठोकले तरी फरक पडणार नाही."

पूर्वा निर्विकार होऊन बोलली.

"प्लीज मला इथून जाऊ दे."
समीर विनवणी करत होता.

"बदल्यात मला काय मिळेल?"

पुर्वाने विचारले.

" तुला काय लागेल ती मदत मी करेल."

समीरने आश्वासन दिले.

"मला नित्याचा पोलिसांच्या ताब्यातील फोन हवा आहे. सोबत तिच्या लॉकरमध्ये जे सापडेल ते मला दाखवायचे. कबूल?"
पूर्वा परत त्याला पारखत होती.


समीरने होकारार्थी मान हलवली.

"आणि एक,जर गद्दारी केलीस,तर मला इथे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये परवा रात्रीच्या पार्टीचे फुटेज आहे."

पूर्वा शांतपणे उत्तरली.

समीर शांत झाला.

"मिस्टर समीर घाबरु नका. मला ह्यातून बाहेर पडायला मदत करा. त्यानंतर सगळे व्हिडीओ तुमचे. आता मला तुमच्या एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन चला."

पुर्वाने पटापट त्याला पुढील योजना समजावली आणि दोघेही तिथून बाहेर पडले.


रागिणीने बंगल्यातील नोकर लोकांना सुट्टी दिली होती. बंगल्यात कोणीच नव्हते.

"हा परिसर किती भकास वाटतो ना? भौतिक सुविधाना मानवीस्पर्श आणि वावर नसेल तर तो गंध आणि उत्साह जाणवत नाही."

दिव्या उदास होत म्हणाली.

"खरं आहे. तुला आठवत? स्टेशन बाहेर भीक मागायची,चोऱ्या करायच्या तरी ते जग जिवंत होते."
सचिन म्हणाला.

जुन्या आठवणी जागवत सर्वांनी मिळून जेवण बनवले.

तेवढ्यात अशोक म्हणाला, "तुम्हाला काही आवाज येतोय का?"

सगळेजण गप्प झाले.

" लहान मूल रडत आहे कुठेतरी."
मनोज बोलला.

सगळेजण बाहेर धावले. परंतु त्या वीस बंगल्यांच्या कॉलनीत शोध घेणे सोपे नव्हते. शिवाय आवाज यायचा बंद झाला होता.


"मयूर,इकडे काहीतरी आहे. आपल्याला आता स्वतः ला हेल्प करावी लागेल."

स्नेहा म्हणाली.

तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. खाण्याचे पार्सल टाकून दरवाजा बंद झाला.

" थांब मी खिडकपाशी जाऊन बघतो."

असे म्हणून मयूर खिडकीजवळ गेला.

एक झडप उघडी होती. परंतु बाहेर अजून खुडबुड चालू असल्याने दोघे गप्प बसून खाऊ लागले.रागिणीचे शूट रात्री नऊ वाजता संपले. तिने तिच्या विश्वासातला ड्रायव्हर घेतला आणि गाडी बंगल्याकडे धावू लागली. परंतु रागिणी अनभिज्ञ होती की तिच्या गाडीचा पाठलाग होत होता.समीरने इन्स्पेक्टर पुर्वाला फ्लॅटची चावी सोपवली. त्यानंतर त्याने गाडी हळूच चर्नीरोड भागात झालेल्या एका आलिशान टॉवरकडे वळवली. तिसाव्या मजल्यावर असलेल्या पेंट हाऊसचे दार उघडले. समोर प्रियांक उभा होता. समीर अलगद जाऊन कोचवर बसला आणि प्रियांक त्याच्या दणकट बाहुत शिरला.पूर्वा खरा खुनी शोधेल का? रागिणीचा पाठलाग कोण करत असेल? मयूर आणि स्नेहा वाचतील?

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//