तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 5

प्रत्येकाच्या आयुष्यात आहे एक गडद रहस्य.


तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 5

मागील भागात आपण पाहिले की पूर्वाने स्केचसाठी प्रियांकाची मदत घेतली. तिकडे आणखी एक निष्पाप बळी गेला. रागिणी आणि बिल्ला जखमी झाले. आता पाहूया पुढे.

रागिणी अशोकच्या बाहुत कोसळली. तरीही शुध्दीवर होती. तिने तिच्या डॉक्टरांचा नंबर सांगितला. डॉक्टरांना सूचना देऊन गाडी वेगाने निघाली. रागिणी वेदनेने विव्हळत होती. अशोक तिला धीर देत होता. पहिल्यांदाच पुरुषाचा आश्वासक स्पर्श तिने अनुभवला होता.


"कमल,त्या दोन मुलांना गिऱ्हाईक भेटल. तशी तुझी मुन्नी पण आवडली हाय त्यांना." चिकना क्रूर हसला.

"मेरे मुन्नी को नही बेचना. तुझ्या नरडीचा घोट घील मी." कमल चवताळली.

"काय बोलली. साली,अभी गला छाटून फेकून दिल गटारात."
रामपुरी तिच्या गळ्याला लावत त्याने तिला धमकावले.

कमल आगतिक झाली. तरीही मुन्नी आणि ह्या दोन पोरांना वाचवायचा तिचा निर्धार पक्का होता. तिने गळ्याचा चाकू बाजूला हटवला.

"आई हाय ना. जरा बहकली होती. चल मेरेको कितना मिलेगा."
कमलने हळूच मादक हसत त्याच्या छातीवर बोट ठेवले.

त्याने तिला तसेच जवळ ओढले. स्वतः ला त्याच्या स्वाधीन करताना कमल काहीतरी ठरवत होती.


प्रियांकाने फोटो तयार करून सेंड केला.

"बिल्ला,हा तर बिल्ला आहे. रेड लाईट एरियातील एक दलाल. त्याने इतकी मोठी हिंमत का केली असेल?"

पूर्वाचे विचारचक्र चालू झाले.

त्याबरोबर तिने खबऱ्याला मॅसेज केला. बिल्ला सापडणे फार अवघड नव्हते.



इकडे मांडीवर घुसलेला चाकू बिल्लाने उपसला. जवळपास एक इंच खोल जखम होती. त्याने व्हिस्कीची आख्खी बाटली रिकामी केली. लगेच चिकनाला फोन लावला. चिकना बाहेर पडताना पोलिसांची माणसे घुटमळत असताना पाहून तो सावध झाला. त्याने तिसऱ्या साथीदाराला बिल्लाकडे पाठवले.



समीर देशमुख गाडी वेगाने दामटत होता. कॉलेजमध्ये मस्तीत केलेली चूक त्याला प्रचंड महाग पडली होती. त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वावर मुलीच नाहीतर मुलेही भाळून जात. सौम्या मेहरा हे त्यातील एक नाव.

सौम्याच्या घरी त्याचे जाणे येणे वाढले. तिथेच त्याला भेटली सौम्यची सावत्र आई. प्रसिद्ध मॉडेल नित्या मेहरा. तिची नजर समीरला आवडली नव्हती. परंतु सौम्या त्याला हवी होती. त्याच नादात घात झाला आणि एक दिवस दारूच्या नशेत नित्याने तिचा डाव साधला.

आजही समीर तिच्यासाठी एक खेळणे होता. तिच्या आंबटशौकीन स्त्री आणि पुरुष मित्रांना खुश करणारे एक खेळणे.

समीर एका एकांतात असलेल्या बंगल्याजवळ थांबला. आजची रात्र त्याला इथेच घालवावी लागणार होती. शाल्मलीने अनेक फोन करूनही त्याने फोन उचलला नाही. फक्त एक मेसेज केला.

"एक महत्वाचे काम आहे. यायला उशीर होईल."

खरे तर समीर नित्याला सहज संपवू शकत होता. परंतु त्यानंतर त्याचे आयुष्य उद्वस्त झाले असते. त्यामुळे तो सगळे सहन करत होता.

नित्याला समीर कायमचा हवा होता. त्यासाठी शाल्मली आणि चिंटूला संपवायला हवे. पण त्यांना बाजूला करताना समीरला समजता कामा नये. यासाठीच तिने एक मोठी योजना आखली होती.


कमल,कल रात इन तीन बच्चे लोकांना तयार ठेव. त्यांना विकायचे आहे."
चिकना विकट हसत म्हणाला.

"ठीक हाय. पण आज रात मजा करू. सब दल्ले लोकांना दारू आणि मटण सोबत .."

कमल त्याच्याजवळ जात म्हणाली.

तो गेल्यावर तिने मुन्नीला जवळ बोलावले.

"मुन्नी,आज रात्री ह्या दोन पोरांना घेऊन पळून जा."

कमल रडत होती . तिने भरपूर पैसे आणि दागिने मुन्नीला एका पिशवीत भरून दिले.


"हुरे! हुरे! कम ऑन मयंक."

सोसायटीत क्रिकेटची मॅच रंगात आली होती.

अचानक बॉल जोरात मयंकच्या डोक्यावर आदळला.

"मयंक! अरे लवकर पाणी आणा."
मुले घाबरली.

इतक्यात सत्येन पुढे झाला.

"बाजूला व्हा! त्याच्याभोवती गर्दी करू नका."

सत्येन पटकन मयंकच्या तोंडावर पाणी मारत बोलला. त्याने पटकन मयंकला बेंचवर झोपवले. पाणी मारल्यावर मयंक शुद्धीवर आला. तोपर्यंत मयंकचे आई बाबा धावत आले.

"थँक्यू सत्येन. आज तू किती पटकन मदत केलीस." मयंकचे बाबा त्याचे हात हातात घेऊन बोलले.

"अरे,ही छोटी मुले मला खूप आवडतात." सत्येन हसला.

मयंकला काळजी घ्यायला सांगून सत्येन फ्लॅटवर जायला निघाला. तेवढ्यात अशोक आणि फिरोज रागिणीला घेऊन आत आले.

"अरे,काय झाले रागिणी मॅडमना?" सत्येन मदतीला धावला.

"काही नाही. शूट करताना अपघात झाला." अशोकने पटकन त्याला बाजूला सारत लिफ्टचे बटन दाबले.

"काही मदत लागली तर सांगा. शेजारच्या फ्लॅटमध्ये आहे."

सत्येन जाताजाता म्हणाला. फिरोज आणि अशोक रागिणीला घेऊन आले.


पूर्वा घरी जायला निघाली. रात्रीचे जवळपास अकरा वाजत आले होते. प्रियांका आज लवकर आल्याने घरी दिव्या आणि प्रियंका दोघी छान गप्पा मारत होत्या. अशोक आणि फिरोज दोघांनी डॉक्टर आणि रागिणीचा सेक्रेटरी यांच्याकडे तिला सोपवले आणि घराची वाट धरली.


चिकना आणि त्याचे सगळे दलाल आज खुश होते. लागेल तितकी दारु मिळणार होती. वर पोरी आणि मटण सोबतीला. रात्रीचा अंमल चढू लागला आणि दारूचाही.

मुन्नी हळूच मयूर आणि स्नेहाकडे गेली. त्यांना दोघांना सोडवले.

"माझ्या मागुन हळूच या." मुन्नी एका अंधाऱ्या बोळातून दोघांना घेऊन बाहेर पडली.



मयंक शुद्धीवर आला.

"मयंक अरे जपून. आज तो सत्येन नसता तर? किती मदत केली त्याने."
आई ओरडत होती.

"काय? त्याने का केली मदत? मॉम तो मला संशयित वाटतो. किती गोड वागतो मुलांशी. तोच नसेल ना सिरीयल किलर?"

मयंक शंका विचारत होता.

"गधड्या,हॉलिवूड चित्रपट पाहून डोके बिघडले आहे. चल जेवायला घे." मयंकची आजी ओरडली.



मुन्नी आणि दोन्ही मुले वाचतील? बिल्ला सापडेल का? खरच सत्येन संशयित असेल?

त्या भागाच्या शेवटी टाका

पुढील सर्व भाग सबस्क्रिप्शन मध्ये असून सबस्क्रिप्शन साठी खालील नंबर वर gpay करून सबस्क्रिप्शन घेऊ शकता, त्याच नंबरला आपला मेल आयडी पाठवा.
8087201815

वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all