तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 14

कोण असेल मुख्य सूत्रधार? वाचा अंतिम भागात.

तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 14

मागील भागात आपण पाहिले की सत्येन आणि समीर दोघांनाही एका ठिकाणी पकडले होते. अशोक आणि त्याच्या मित्रांनी पुर्वाला लोकेशनवर बोलावले होते. आता पाहूया पुढे.


चिकना आणि बिल्ला दोघांना ब्लॅक रॅबीटच्या माणसांनी सोडवले.

"तुमच्या हातून गुंगारा दिलेली मुले एका ठिकाणी आहेत. तिथे जाऊन लवकर त्यांना ताब्यात घ्या."

बिल्लाने फोन ठेवला आणि वेगाने निघाला. आता तो रागिणीला सोडणार नव्हता. तिला संपवायचे ठरवूनच बिल्ला निघाला.


"ये पुर्वाबेन,कायतरी गडबड छे."
किंजलने फोन केला.
"किंजल,लवकर बोल. मला आता एका ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे."
पूर्वा घाई करत होती.

"मी तुला डिटेलमंदी पाठवल हाय सगळं. एकदा बघुन घे."
किंजलने फोन ठेवला. सहज चाळा म्हणून किंजल परत एकदा त्या चारही लोकांची माहिती वाचू लागली. तिची नजर एका नावावर स्थिरावली.
"हॅलो,इन्स्पेक्टर सूरज."
पलीकडून आलेली माहिती ऐकून सूरजचे हृदय दुप्पट वेगाने धडकू लागले.


पण आधी समीरला शोधायचे होते. तेवढ्यात स्केचवरून अंगदबाबत माहिती सूरजला मिळाली.

"कदम,आपल्याला आता घाई केली पाहिजे. आता एकही लहान मूल बळी जायला नको."
सूरज घाई करत म्हणाला.


इकडे समीर प्रचंड चिडला होता.
"कोणी आणल इकडे मला? कुणाला मरायच आहे?"
स्वतः ला सोडवायचा प्रयत्न करत समीर ओरडत होता.

पण चिकटपट्टी असल्याने आवाज घशातून बाहेर येतच नव्हता.

तेवढ्यात अंगद आला. त्याने हळूच एक सुरा समीरच्या मांडीवर ठेवला.
"ह्याच शरीराचा प्रचंड अभिमान आहे ना तुला?"
असे म्हणत त्याने सरकन सुरा ओढला.

समीर प्राणांतिक वेदनेने विव्हळत होता. दुसरा वार करणार इतक्यात अंगदच्या डोक्यात कोणीतरी जोरात फटका मारला. अंगद खाली पडला. मागे मयंक उभा होता.

"तुझ्यावर लक्ष गेलेच नाही. सत्येन नाही तर तू मारलं आहेस सगळ्या मुलांना."

मयंक प्रचंड चिडून बोलत होता. तेवढ्यात त्याच्या पाठीवर पिस्तूल लावून कोणीतरी उभे राहिले.


"अय पोरा, हिरो बनायच्या नादात आज मरणार तू."
बिल्ला हसत होता.

समीरकडे बघून म्हणाला,"लई चिकना माल. नित्या उगच तुला धरून नव्हती."

तोवर चिकनाने मयंकला बांधले.

"रागिणी, हितच आहे ना?" बिल्ला अंगदला विचारत होता.

डोक्यावरील जखम दाबत त्याने खोलीकडे बोट दाखवले. बिल्लाने लाथ मारून दरवाजा उघडला.

"सापडलीस शेवटी."
त्याने मुन्नी आणि रागिणी दोघांना बाहेर काढले.

तेवढ्यात चिकना त्याला कानात काहीतरी बोलला.

"रागिणी,आता ह्या समीर आणि तुझा तसला व्हिडिओ पाहिजे. आता हित."
बिल्ला क्रूर हसत होता.

"यु बास्टरड. तुला सोडणार नाही मी."
रागिणी चवताळली.

"बर,तुझा नको. मग ह्या मुन्नीचा काढतो."

त्याने मुन्नीला जवळ ओढले. रागिणीने डोळे बंद केले. मनाचा निर्धार करून ती समीरजवळ पोहोचली.


इकडे मयूर खिडकीच्या झडपेतून बाहेर आला. मयंकने दिलेली लेझर लाईट त्याने चमकावली.

"अशोक,तिकडे बघ. रात्रीच्या दोन वाजता लेझर?"
मनोजने दाखवले.

तेवढ्यात पूर्वा पोहोचली. तिला पाहताच दिव्या आणि प्रियांका पळत जाऊन तिला बिलगल्या. सगळेजण लेझरच्या दिशेने निघाले.
इतक्यात चिकनाने चमकणारी लाईट पाहिली.

"साला,आता हे पोरग मरणार."
त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर असणाऱ्या मयुरवर पिस्तूल रोखला.

स्नेहाने सगळी ताकद लावून चिकनाच्या पायावर चावा घेतला. नेम हुकला आणि दचकून मयूर खालच्या झाडीत पडला.

"साली,आधी तुला मारून टाकतो."

चिकनाने पडलेले पिस्तूल शोधायचा प्रयत्न केला. तोपर्यंत स्नेहाने खिडकीतून खाली उडी मारली.



खालच्या झुडुपात दोघांना खरचटले होते. तरीही तसेच दोघेजण खाली उतरले.

"मयूर,चल पोलिसांना आणू." स्नेहा पळणार इतक्यात मयुरने तिचा हात पकडला.

समोर चिकना पिस्तूल धरून उभा होता. पूर्वा आणि तिचे मित्र अजून बरेच लांब होते. सचिनने पुर्वाला पिस्तूल मागितले. त्याने आपले नेमबाजीचे कसब आजमावले आणि सायलेंसर असलेल्या पिस्तुलातून गोळी सुटली. बरोबर चिकनाला मणक्यात गोळी लागली आणि तो कोसळला.

त्याबरोबर दोन्ही पोरे रस्त्यावर धावली. दिव्या आणि प्रियांका दोघींनी त्यांना जवळ घेतले.

"मुन्नीदिदी आत आहे. तिला वाचव ना ताई."
स्नेहा रडू लागली.

"दिव्या,प्रियांका तुम्ही दोघी ह्या मुलांना घेऊन बाहेर थांबा. आम्ही चौघे आत जातो."

पुर्वाने सूचना दिली.

"पूर्वा,तू आणि अशोक समोरून जा. मी आणि मनोज मागच्या बाजूने येतो."

सचिन असे म्हणून पुढे निघाला.


"रागिणी,चल त्याचे कपडे नाहीच. आता तुझे उतरव."

बिल्ला हसत होता.

अंगद उठून आत गेला. स्नेहा आणि मयूर नव्हते. बाकीची मुले मात्र अर्धवट नशेत होती. मी तर सगळ्यांना पाण्यात औषध देत होतो. तेवढ्यात गोळी झाडण्याचा आवाज झाला आणि बिल्ला कोसळला. अंगद गुपचूप आत लपला. पूर्वा आत आली.

"समीरला सोडव." तीने रागिणीला सूचना दिली.

रागिणी पुढे जायच्या आधीच. मनोज आणि सचिनला गन पॉइंटवर दोन जण घेऊन आले. पुर्वाला आणि अशोकला मागे कोणीतरी असल्याचे जाणवले.

"इन्स्पेक्टर पूर्वा,तुझा शोध संपला. तुला ब्लॅक रॅबीटला भेटायचे आहे ना?"

समोरून एक महिला बोलली.

त्यासरशी समीर हादरला.

"शाल्मली तू? पण का? कशासाठी?"

"हो,मीच. तुला आठवत? आज जसा प्रियांक गुंतला आहे तसाच तुझ्या ह्या नशिल्या शरीरात आणखी एकजण गुंतला होता. प्रोफेसर हेमंत."
शाल्मली पुढे आली.

"पण कॉलेज संपल्यावर आम्ही वेगळे झालो." समीर चिडला.

"त्याचा वापर करून डिग्री मिळवली. माझा भाऊ होता तो. तू सोडल्यावर डिप्रेशन आले त्याला आणि त्याने स्वतः ला."
शाल्मलीने रागाने चाकू समीरच्या मांडीत रोवला.


"पण तुम्ही लहान मुलांना का मारत होता?"
पूर्वा चिडली.

तेवढ्यात अंगद बाहेर आला.

"पूर्वा,त्याचा टॅटू बघ. हाच आहे तो." सचिन ओरडला.

"हो,माणसाचे वय वाढायची प्रक्रिया थांबवायची औषधे बनवीत होतो आम्ही. उंदरावर प्रयोग झाले. पण माणसांवर करायची परवानगी मिळेना. मग अशी भटकी,भिकारी मुले पळवून प्रयोग करायचो. दुष्परिणाम होऊन मुले आजारी पडत. मग त्यांना मारावे लागते."

अंगद थंड आवाजात बोलत होता.

"अग पण श्लोक तुझा पोटचा मुलगा. त्याला का पळवत होते? समीर संतापला.


"ते तुला सांगायला बांधील नाही."
शाल्मलीने पिस्तूल रोखले. तेवढ्यात तिच्या हातावर गोळी झाडली गेली.

पोलिस फोर्स घेऊन सूरज आत शिरला.

"कदम सगळ्यांना ताब्यात घ्या." पूर्वा ओरडली.

"कदम,मी तुमचा बॉस आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन लगेच बाहेर पडा. बाकी सगळे आहे तसे राहू द्या. फक्त शाल्मली आणि अंगद इथेच असू दे."
सूरजने सूचना दिली.

"गुन्हेगार सापडला आहे. आता काय गरज ह्या सगळ्याची." पूर्वा चिडली.

"ट्रस्ट मी. निदान आतातरी. तेव्हा नाही ठेवलास विश्वास पण आता थांब."

बाकीच्यांना घेऊन कदम बाहेर पडले. शाल्मली आणि अंगद ह्यांना समीरच्या समोर ठेवून पूर्वा आणि सूरज दोन बाजूंना लपले. पहाटेचे साडेतीन वाजले होते. इतक्यात एक गाडी बाहेर थांबली. हातात एक बंदूक. संपूर्ण काळे कपडे घातलेली एक व्यक्ती आली.

"वेल डन शाल्मली. आता आपल्या दोघींची टार्गेट पूर्ण होतील."

इतक्यात हॉलमधील दिवे लागले. पूर्वा आणि सूरज बंदूक रोखून उभे होते. ब्लॅक रॅबीटच्या मुख्य सूत्रधारावर.


कोण असेल ती व्यक्ती? समीर, प्रियांक एक होतील? सगळ्यांच्या आयुष्याला काय वळण लागेल?
पाहूया अंतिम भागात.
वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all